कच्ची साखर
कच्ची साखर 
ॲग्रोमनी

तीन लाख टन कच्च्या साखरेची आयात होणार

सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : दक्षिण भारतात साखरेचे दर नियंत्रणात राखण्याचे कारण देत केंद्र सरकारने तीन लाख टन कच्ची साखर आयात करण्यास परवानगी दिली आहे. अर्थात, त्यासाठी २५ टक्के आयात शुल्क आकारले जाणार आहे. 
खुला परवाना धोरणांतर्गत ही कच्ची साखर आयात केली जाणार असल्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयातर्फे जाहीर करण्यात आले आहे. कच्ची साखर शुद्धिकरणातून शुभ्र साखर तयार करण्याची क्षमता असलेल्या रिफायनरी व कारखान्यांना ही आयात करता येईल.
तुतीकोरीन, काराईकल, चेन्नई, मंगळूर, काकीनाडा, गंगावरम आणि विशाखापट्टण या बंदरांमार्फत कच्ची साखर आयात करता येईल, असेही सरकारने कळविले आहे.
 केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे देशभरातील साखरेच्या दरावर फारसा परिणाम होणार नसल्याची प्रतिक्रिया राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी दिली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Interview with Dashrath Tambale, Director of Atma : सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेतीची सक्ती नाहीच...

Rural Story : जागरण

Sugarcane Management : खोडवा उसाचे व्यवस्थापन

Agriculture Processing Industry : प्रक्रिया उद्योगात तयार झाली ओळख

Hanneborg Farm : नॉर्वेमधील ग्राहकांची ‘हॅनेबॉर्ग फार्म’ला पसंती

SCROLL FOR NEXT