Sugar export agreement at 57 lakh tonnes
Sugar export agreement at 57 lakh tonnes 
ॲग्रोमनी

साखर निर्यातीचे करार ५७ लाख टनांवर

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर : देशातल्या साखर निर्यातीचे करार आता ५७ लाख टनांच्या वर गेले आहेत. ऑगस्ट अखेर ५५ लाख टन साखर प्रत्यक्षात निर्यात झाली. सप्टेंबर महिन्याअखेर आणखी ५ ते ६ लाख टन साखरेचे करार होण्याची अन्न मंत्रालय अपेक्षा आहे.

अन्न मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोविडच्या साथीतही अन्न मंत्रालय, कारखानदार, आणि वाहतूकदार यांच्यात सातत्याने समन्वय राहिल्यानेच निर्यात वेगात होत आहे. जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्टमध्ये निर्यातीत वाढ झाली. यंदा प्रथमच इंडोनेशियन बाजारपेठ खुली झाली. थायलंडमध्ये यंदा दुष्काळामुळे उसाचे उत्पादन घटले. तिथे साखरेच्या उत्पादनातही घट झाली.

इंडोनेशिया आणि मलेशिया हे प्रामुख्याने थायलंडच्या साखरेवर अवलंबून असतात. पण तिथे साखर उत्पादनात घट झाल्याने या देशांनी भारतीय साखरेला पसंती दिल्याचे सूत्रांनी सांगितले. याचबरोबर इराणनेही संपूर्ण हंगामात भारतीय साखरेला मागणी नोंदविली. मध्यंतरी इराणकडून मागणी घटली. परंतु ऑगस्टमध्ये अन्य देशांकडून मागणी वाढल्याने निर्यातीचा वेग कायम राहिला. यापूर्वी २००७-८ ला ४० लाख टन साखर निर्यात झाली झाली होती. यानंतर यंदाच्या वर्षात होत असलेली ही सर्वाधिक निर्यात आहे.

यंदाची निर्यातीची गती व पुढील वर्षी होणारे जादा उत्पादन याचा अंदाज पाहता केंद्र सरकार पुढील वर्षीही ६० लाख टनांचा निर्यातीचा कोटा देण्याच्या तयारीत आहे. अद्याप याबाबत अधिकृत निर्णय नसला तरी निर्यात होऊ शकते हे लक्षात आल्याने यंदाचाच कोटा पुढील वर्षी नक्की मिळेल, असा विश्वास साखर उद्योगातील सूत्रांनी व्यक्त केला. तशा हालचाली केंद्रीय पातळीवर सुरू आहेत.

यंदाच्या हंगामात ५५ लाखांपर्यंत प्रत्यक्षात साखर निर्यात झाली ही भूषणावह बाब आहे. सध्या चांगल्या प्रतीच्या साखरेला आंतरराष्ट्रीय बाजारात २४०० रुपये प्रतिक्विटंल इतका दर आहे. निर्यात कोटा शिल्लक असणाऱ्या कारखान्यांनी जास्तीत जास्त साखर निर्यात करावी. — अभिजित घोरपडे, साखर निर्यातदार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : कोकणात उन्हाचा चटका ठरणार तापदायक

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

SCROLL FOR NEXT