सोयाबीन
सोयाबीन 
ॲग्रोमनी

सोयाबीन वधारण्याची शक्‍यता

Vinod Ingole

नागपूर  ः बाजारात हंगामातील नव्या सोयाबीनची आवक सुरू झाली असून, २७३६ रुपये प्रतिक्‍विंटलने सोयाबीनचे व्यवहार होत आहेत. हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीनची खरेदी सुरू असली, तरी येत्या काळात दर वधारण्याची शक्‍यता असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.  बाजारात खरीप हंगामातील सोयाबीन येणे सुरू झाले आहे. सोयाबीनची आवक ४ ऑक्‍टोबर रोजी ३३६४ क्‍विंटल, तर ७ ऑक्‍टोबर रोजी २९९४ क्‍विंटल झाली. त्यानंतर सरासरी तीन ते साडेतीन हजार क्‍विंटल अशी दररोजची सोयाबीन आवक आहे. सोयाबीनची खरेदी २६८१ ते २७३६ रुपये प्रतिक्‍विंटलने केली जात आहे. हमीभावापेक्षादेखील कमी दर सोयाबीनला मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. सद्या सोयाबीनला अपेक्षित मागणी नसल्याचे कारण यामागे व्यापारी देत आहेत. सोयाबीनला उद्योजकांकडून माणगी वाढल्यानंतर दरही काहीसे वधारतील, अशी अपेक्षा व्यापाऱ्यांना आहे.  भुईमूग शेंगाचे दर बाजारात स्थिर आहेत. ३००० ते ३५०० रुपये प्रतिक्‍विंटलने भुईमूग शेंगाचे व्यवहार होत असून, ९० ते १०० क्‍विंटलची सरासरी आवक होत आहे. टोमॅटोचे दर २२०० रुपये प्रतिक्‍विंटलवरून २५०० रुपये प्रतिक्‍विंटलवर पोचले आहेत. टोमॅटो दरात वाढ होण्याची शक्यता नाही. टोमॅटोची सरासरी आवक १०० क्‍विंटल आहे. गवार शेंगांचे व्यवहार १५०० ते ३००० रुपये प्रतिक्‍विंटलने होत असून, आवक १२० क्‍विंटलची आहे. हिरवी मिरचीदेखील बाजारात येण्यास सुरवात झाली असून, २२० क्‍विंटलची आवक आहे. ३००० ते ४००० रुपये प्रतिक्‍विंटल असा मिरचीचा दर आहे. शिमला मिरचीचे दर ४००० ते ५००० रुपये प्रतिक्‍विंटल असून, आवक ११० क्‍विंटलच्या घरात आहे. फ्लॉवरची आवक २०० क्‍विंटलची असून, १२०० ते १५०० रुपये प्रतिक्‍विंटलने व्यवहार होत आहेत. पालकाच्या दरात चढ-उतार गेल्या आठवड्यात अनुभवले गेले. १२० ते १३० क्‍विंटलची आवक पालकाची असून, ३५०० ते ४००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर ५ ऑक्‍टोबर रोजी पालकाला मिळाला होता. त्यानंतर आता दर २००० ते २५०० प्रतिक्‍विंटल असे आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disaster Relief Fund : रायगडमध्ये आपत्ती बचावासाठी हजार कोटी

Water Issue : शेतीसाठी ‘धनपूर’ धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा

Orchard Planting : एक हजार हेक्टरवर सांगलीत फळबाग लागवड

Onion Market : कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पुन्हा धुळफेक; सरकारने दिलेली ९९,१५० टन निर्यातीला परवानगी जुनीच

Fertilizer Demand : चोपडा तालुक्याला २७ हजार टन खतांची गरज

SCROLL FOR NEXT