Soybean area in Madhya Pradesh is projected to decline
Soybean area in Madhya Pradesh is projected to decline 
ॲग्रोमनी

मध्य प्रदेशात सोयाबीनचे क्षेत्र कमी होण्याचा अंदाज

टीम अॅग्रोवन

नागपूर : मध्य प्रदेशात पिवळं सोनं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोयाबीनच्या लागवडीत यंदा बियाणे तुटवड्यामुळे अडचण निर्माण झाली आहे. राज्यात नऊ हजार ते १२ हजार रुपये प्रतिक्विंटल या दराने सोयाबीन बियाण्याची विक्री होत असून त्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. या कारणामुळे मध्य प्रदेशात या वर्षी सोयाबीन खालील क्षेत्र कमी होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. 

देशातील सर्वाधिक सोयाबीन उत्पादक राज्य म्हणून मध्य प्रदेशची ओळख आहे. मात्र, यावर्षी राज्यातील शेतकऱ्यांना बियाणे टंचाईचा सामना करावा लागत आहे. परिणामी मध्यप्रदेशचे कृषिमंत्री कमल पटेल यांनी शेतकऱ्यांनी सोयाबीन वगळता इतर पिकांकडे वळण्याचा सल्ला दिला आहे. 

मध्य प्रदेशमध्ये गेल्या हंगामात ५८ लाख हेक्‍टरवर सोयाबीनची लागवड करण्यात आली होती. या वर्षी हे क्षेत्र ६३ लाख ७४ हजार हेक्‍टरपर्यंत राहील, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. राज्यात बियाणे बदल दर ३२ टक्के आहे. त्यानुसार २० लाख हेक्टरवरील पेरणीसाठी बियाणे लागणार आहे. याचा अंदाज घेतल्यास तब्बल १६ लाख क्विंटल बियाण्याची गरज राज्याला आहे. मात्र, राज्यात तुटवड्याआड १०,००० ते १२,००० रुपये क्विंटल दराने बियाणे विकल्या जात आहे. 

या महागड्या बियाण्याच्या दर्जाबाबत देखील शेतकरी साशंक आहेत. त्यातच या वर्षी पावसाने उघडीप दिल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येणार आहे. अशा वेळी शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च दुपटीने वाढणार असला तरी त्याची भरपाई होण्याची शक्यता कमी असल्याचे सांगितले जाते. अशा संकटातून सावरण्यासाठी शेतकऱ्यांनी आधीच सोयाबीन क्षेत्र कमी करून इतर पिकांकडे वळण्याचा सल्ला मध्यप्रदेशची कृषिमंत्री कमल पटेल यांनी दिला आहे. 

चीनकडून वाढली आयात या वर्षातील पाच महिन्यांच्या कालावधीत (जानेवारी ते मार्च) चीनने ३८२.३ लाख टन सोयाबीन आयात केले आहे. जे मागील वर्षाच्या तुलनेत ४४ टक्के अधिक आहे. 

उत्पादकता खर्चाची होणार नाही भरपाई यावर्षी केंद्र सरकारने सोयाबीनचे हमीभावात ७० रुपयांची वाढ केली आहे. या वर्षी ३९५० रुपये प्रतिक्विंटल दर निश्चित करण्यात आला आहे. मात्र, एक हेक्टर क्षेत्राचा उत्पादन खर्च काढल्यास त्यामध्ये ५ हजार रुपयाचे बियाणे, ५०० ते ७०० रुपयांचा युरिया, कल्टीवेटर १५०० रुपये, कीडनाशक १५०० रुपये, मजुरी १००० कापणी १२०० ते १५०० त्यानुसार दहा हजार पाचशे रुपये खर्च होणार आहे. 

जीएम बियाण्यासाठी तेलदरात वाढ देशात सध्या ४० टक्के खाद्यतेलाची आयात केली जाते. भारतात २३ ते २४ दशलक्ष टन खाद्य तेलाचा वापर आहे. उत्पादन अवघे नऊ दशलक्ष टन आहे. १५ दशलक्ष टन खाद्य तेलाची आयात केली जाते. मात्र, त्यानंतरही मध्य प्रदेशच्या कृषिमंत्र्यांनी तेलवर्गीय सोयाबीन खालील क्षेत्र कमी करून इतर पिकाकडे वळण्याचा सल्ला शेतकऱ्यांना दिला आहे, अशी स्थिती राहिल्यास देशात तेलाचे दर वाढते राहतील. हा जीएम बियाण्याचे समर्थन करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा रंगली आहे. मध्य प्रदेशमध्ये यावर्षी ६० हजार हेक्‍टरवर सोयाबीन लागवड होण्याची शक्यता आहे. या तुलनेत महाराष्ट्रात सोयाबीन खालील क्षेत्र ४३ लाख हेक्टरपर्यंत राहते. देशांतर्गत एकूण लागवडीच्या ८९ टक्के क्षेत्र एकट्या मध्य प्रदेशमध्ये आहे.

देशात आणि मध्यप्रदेश मध्ये सोयाबीन खालील क्षेत्र कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, ती निव्वळ अफवा आहे. शेतकऱ्यांकडे घरचे बियाणे आहे. याचाच वापर या हंगामात केला जाईल. त्यामुळे क्षेत्र कमी होणार नाही. - डी. एन. पाठक, कार्यकारी संचालक,  सोयाबीन प्रोसेसर असोसिएशन ऑफ इंडिया (सोपा)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drip Irrigation : ठिबक सिंचनासाठी ‘जीएसआय’ प्रणालीचा वापर

Agriculture Success Story : हवामान बदलाला सुसंगत शेती वरकड बंधूंची...

Rice Research : ‘बी१’ जीवनसत्त्व अधिक असलेला भात विकसित

Waghad Project : ‘वाघाड’ने घडविला कायापालट

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

SCROLL FOR NEXT