rice
rice  
ॲग्रोमनी

तांदळाच्या विक्रमी निर्यातीची यंदा शक्‍यता

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर : देशात यंदा भाताचे चांगले उत्पादन होण्याची शक्‍यता असल्याने यंदाच्या आर्थिक वर्षात (२०२०-२१) देशातून विक्रमी १४० लाख टन तांदळाची निर्यात अपेक्षित आहे. थायलंड व व्हिएतनाम या भात उत्पादक देशात यंदा दुष्काळी परिस्थिती बनल्याने या देशांत तांदळाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. याचा फायदा भारतीय तांदळाला होणार असल्याचे तांदूळ उद्योगातील सूत्रांनी सांगितले. गेल्या वर्षी भारतातून केवळ ९९ लाख टन इतकी निर्यात झाली होती. ती गेल्या आठ वर्षांत कमी होती. यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ४१ लाख टनांची वाढ होण्याचा कयास आहे. भारत मुख्यत्वे इराण, इराक व सौदी अरेबिया या देशांना बासमती तांदळाची निर्यात करतो. तर प्रामुख्याने बांगलादेश, नेपाळ, बेनिन आणि सेनेगल या राष्ट्रांना नॉन बासमती तांदूळ निर्यात करतो. परंतु या वेळी आफ्रिकन देशांकडूनही नॉन बासमती तांदळाला मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे.

थायलंड, व्हिएतनाममधील कमी पावसाचा भारताला लाभ जगातील सर्वांत मोठ्या तांदूळ निर्यातदार देशांच्या यादीत भारताच्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या थायलंडमध्ये या वर्षी अत्यल्प पाऊस झालेला आहे. त्यामुळे तेथील तांदळाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटेल. परिणामी, थायलंडची जागतिक बाजारातील तांदळाची निर्यात त्यांच्या मागील अनेक वर्षांतील निर्यातीपेक्षा खूप कमी म्हणजेच ६० ते ६५ लाख टन इतकी होईल. त्याचबरोबर जागतिक क्रमवारीत थायलंड पाठोपाठ तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या व्हिएतनाममध्येही प्रमुख तांदूळ उत्पादित क्षेत्रात असमाधानकारक पाऊस झाल्याने दुष्काळजन्य परिस्थिती आहे. त्यामुळे तेथीलही तांदूळ उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट होणार आहे. याचा अनुकूल परिणाम भारतीय तांदळाच्या मागणीवर होण्याची शक्‍यता सूत्रांनी व्यक्त केली. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत ४२ टक्के निर्यात वाढ होण्याचा अंदाज आहे.

प्रतिक्रिया यंदा भारतीय तांदळाला चांगले दिवस आले आहेत. स्पर्धात्मक देशात उत्पादन घटल्याने आपल्या देशातील तांदळाला मागणी वाढण्याची शक्‍यता आहे. सकारात्मक परिणामामुळे यंदा निर्यातीत उच्चांक होईल, असे सध्याचे चित्र आहे. या निर्यात वाढीमुळे देशात परकीय चलन मोठ्या प्रमाणावर वाढेल. - राजेश शहा, वरिष्ठ उपाध्यक्ष, फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र (फाम)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT