संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
ॲग्रोमनी

सुताचे दर वाढले

Chandrakant Jadhav

 जळगाव ः देशांतर्गत सूतगिरण्यांसमोर कापूस टंचाई वाढली आहे. सूत उत्पादनात या हंगामात १० ते १५ टक्के घटीचा अंदाज असून, दाक्षिणात्य भागातील काही मिल दर्जेदार सुतासाठी कापसाची (रुई) आयात वाढवत आहेत. परिणामी या हंगामात आयातही पाच लाख गाठींनी वाढून ती २५ लाख गाठींपर्यंत पोचेल. सुताचे दर मागील २५ ते ३० दिवसांत किलोमागे १५ ते २५ रुपयांनी वधारले आहेत. ६० ते ६४ काउंटच्या सुताला ३१० रुपये प्रतिकिलोपर्यंतचे विक्रमी दर मिळत आहेत. 

सुताची निर्यात सध्या चीन, बांगलादेशात होत आहे. देशात पाच हजार कोटी किलोग्रॅमपेक्षा अधिक सूत उत्पादनाचा अंदाज सप्टेंबर २०१८ मध्ये कापूस उद्योग क्षेत्रातील विविध जाणकार, संस्थांनी व्यक्त केला होता. परंतु उत्पादनात घट येईल, अशी स्थिती आहे. कारण देशातील मिलसमोर कापूसटंचाईचे संकट घोंगावत आहे. देशातील मिलना (नॉन मिल वापरासह) ४०० लाखपेक्षा अधिक कापूसगाठींची (एक गाठ १७० किलो रुई) गरज आहे. परंतु मागील हंगामातील ४२ लाख गाठींचा शिलकी साठा व या हंगामातील अपेक्षित असलेले सुमारे ३०५ लाख गाठींचे उत्पादन यामुळे देशांतर्गत मिलची गरज पूर्ण होत नसल्याची स्थिती आहे. बाजारात आजघडीला २७५ लाख कापूसगाठींची आवक झाली असून, मागील हंगामाच्या तुलनेत ही आवक सुमारे ४५ लाख गाठींनी कमी आहे. अर्थातच देशातील कापूसगाठींच्या उत्पादनात सुमारे ५० लाख गाठींची घट निश्‍चित मानली जात आहे. 

सुताचे सौदे मध्यंतरी रखडले होते. परंतु जागतिक बाजारातील घडामोडी लक्षात घेता बांगलादेशसह चीनने भारतीय रुई, सुताची आयात वाढविली. यामुळे दरांवरील दबाव दूर झाला. गुजरात, महाराष्ट्र, तेलंगणमधील सूतगिरण्यांना कापूसटंचाई कमी जाणवत आहे. परंतु दाक्षिणात्य व उत्तर भागातील तमिळनाडू व लगतच्या भागातील सूतगिरण्यांना ही टंचाई अधिक अडचणीची आहे. कारण या भागात कापसाची लागवड कमी होते.

देशात होणाऱ्या कापूस लागवडीपैकी ६५ ते ७० टक्के लागवड ही महाराष्ट्र, तेलंगणा व गुजरातेत मिळून होते. या भागातील मिल्स कापूस पुरवठा करून घेत आहेत. देशातील खंडीचे (३५६ किलो रुई) दर ४६ ते ४७ हजार रुपये असे आहेत. ४० काउंटच्या सुताचे दर २१० ते २१५ रुपये प्रतिकिलो आणि १० ते १२ काउंटच्या सुताला १६० रुपये प्रतिकिलोपर्यंतचे दर मिळत आहेत. 

अधिक लांब धाग्याची रुई तेजीत देशात प्रसिद्ध असलेल्या तमिळनाडूमधील सुवीन प्रकारच्या रुईचे दर प्रतिखंडी ८० हजार रुपयांपर्यंत पोचले आहेत. या खंडीला या हंगामात आतापर्यंत मिळालेले हे विक्रमी दर आहेत. तिची लांबी ३७ मिलिमीटरपर्यंत आहे. या रुईचे उत्पादन सुमारे सात हजार गाठी एवढेच झाले आहे. मध्य प्रदेशातील डीसीएच या ३४ मिलीमीटर लांब धाग्याच्या रुईचे दर प्रतिखंडी ६१ हजार  रुपयांपर्यंत आहेत. या रुईचे सुमारे साडेतीन लाख गाठी उत्पादन हाती आले आहे. गुजरातमधील शंकर-६ व महाराष्ट्रातील २९ मिलिमीटर लांब धाग्याच्या कापूस गाठींचे दर ४६ ते ४७ हजार रुपये प्रतिखंडी असे आहेत. 

देशातील लांब धाग्याच्या कापूसगाठींचे दर व परदेशातील पिमा व गिझा प्रकारच्या कापूस गाठींचे दर यात खंडीमागे पाच ते सहा हजार रुपयांचा फरक आहे. देशात लांब धाग्याच्या कापसाचे उत्पादन मूळात कमी असल्याने पिमा व गिझा प्रकारच्या कापूसगाठींची आयात दाक्षिणात्य व उत्तरेकडील काही मिल्स करून घेत आहेत. तसेच २९ मिलिमीटर लांब धाग्याच्या कापूसगाठींची आयातही मिल्स करीत असून, पाच लाख गाठींची आयात पूर्ण झाली आहे. तर सात लाख गाठींच्या आयातीसंबंधीचे सौदे झाले आहेत. या हंगामातील आयात यामुळे वाढणार आहे, अशी माहिती मिळाली. 

सुताचे दर टिकून आहेत. आपल्याकडील मिल्ससमोर कापूसटंचाई अधिक नाही. परंतु रुईचे दर जसे वाढले आहेत, त्या तुलनेत सुतालाही दर मिळाले पाहिजेत. यामुळे मिल्सचे नुकसान कमी होऊ शकते, असे उंटावद होळ (जि. नंदुरबार) येथील लोकनायक जयप्रकाश नारायण सहकारी सूतगिरणीचे कार्यकारी संचालक  राजाराम पाटील यांनी सांगितले.   प्रमुख देशांमधील  अपेक्षित सूत उत्पादन

  •  चीन - सात हजार कोटी किलोग्रॅम
  •  भारत - ४ हजार ७५० कोटी किलोग्रॅम
  •  बांग्लादेश - दोन हजार कोटी किलोग्रॅम
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

    APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

    Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

    Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

    Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

    SCROLL FOR NEXT