sugar bag
sugar bag  
ॲग्रोमनी

साखर विक्रीचा दबाव कायम 

Raj Chougule

कोल्हापूर : साखर विक्रीच्या दबावाखाली आलेल्या कारखान्यांनी आता नाइलाजास्तव कमी किमतीत साखरेची विक्री सुरू केली आहे. महाराष्ट्रात साखरेची विक्री २९५० पासून ३१५० रुपये प्रति क्विंटल दराने सुरू असल्याचे काही कारखाना प्रतिनिधींनी सांगितले. किमान विक्री मूल्य ३१०० रुपये असले तरी या दराला मागणी नसल्याने कारखानदार हवालदिल झाल्याचे चित्र याही महिन्यात कायम राहिले. 

जानेवारीच्या शेवटच्या सप्ताहातही कारखानदारांवर साखर विक्रीचा दबाव कायम राहिला. जानेवारी संपत आला तरी जानेवारीच्या कोट्याची साखर विक्री करण्यासाठी देशातील कारखान्यांची केविलवाणी धडपड सुरूच राहिली. यामुळे साखर दरातही वाढ झाली नाही. 

दरम्यान, केंद्राने गुरुवारी (ता.२८) फेब्रुवारी महिन्यातील साखर विक्री कोटा जाहीर केला. फेब्रुवारी महिन्यासाठी १७ लाख टन विक्रीचे उद्दिष्ट केंद्राने दिले आहे. जानेवारीच्या तुलनेत किमान ३ लाख टनांनी हा कोटा घटविल्याने कारखान्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. ५४८ कारखान्यांना हा कोटा विभागून दिला आहे. गेल्या दोन महिन्यांचा आढावा घेतल्यास केंद्राने गेल्या वर्षीच्या तुलनेत कोट्यात घटच केलेली आहे. इतके असूनही साखर विक्री होत नसल्याने साखर विक्रीचा प्रश्‍न गंभीरच बनतच असल्याचे चित्र आहे. अजूनही शीतपेय उत्पादक कंपन्या साखरेची मागणी नोंदवत नसल्याने कारखानदारांपुढे बल्क विक्रीची समस्या उभी ठाकली आहे. 

कोटा कमी आल्याने बाजारात काही प्रमाणात तरी सकारात्मक वातावरण राहील, अशी अपेक्षा साखर उद्योगाची आहे. यंदाचा हंगाम सुरू होऊन चार महिने झाले आहेत. साखर उत्पादन द्रुतगतीने होत असल्याने चिंतेत भर पडली आहे. कोणत्याही परिस्थितीत साखरेचे किमान विक्री मूल्य वाढविल्याशिवाय बाजारात तेजीचे वातावरण राहणे अशक्‍य असल्याचे साखर उद्योगातील सूत्रांनी सांगितले. केंद्राने केलेली कोट्यातील घट व फेब्रुवारीत लागणारी उन्हाळ्याची चाहूल कारखानदारांना साखर विक्रीसाठी फायदेशीर ठरेल असा अंदाज असला, तरी शिल्लक साठ्याचा दबाव हा हंगाम संपेपर्यंत कायमच राहील अशी भीती आहे.  साखरेचे जानेवारीतील दर (रुपये/क्विंटल) 

राज्य किमान कमाल
महाराष्ट्र २९५० ३१५० 
कर्नाटक ३०७५ ३१५०
उत्तर प्रदेश ३१०० ३२१५ 
गुजरात ३१०० ३१५० 
तमिळनाडू ३१०० ३२५० 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation : 'शिरसाई'चे दहा दिवसांचे उन्हाळी आवर्तन

Cotton Bales Production : खानदेशात यंदा २५ टक्के कापूसगाठी निर्मितीत घट

Paddy Procurement : भरडाई रखडल्याने २१ लाख क्‍विंटल धान गोदामातच

Water Scarcity : ‘हर घर नल से’ नाही, तर टँकरमधूनच पाणी

Banana Market : रावेरातून केळीची रेल्वेने वाहतूक सुरू

SCROLL FOR NEXT