papaya on the spot per kg 18 rupees
papaya on the spot per kg 18 rupees 
ॲग्रोमनी

पपईला जागेवरच १८ रुपये प्रतिकिलो दर

टीम अॅग्रोवन

जळगाव ः खानदेशात पपईचा हंगाम सुरू झाला असून, काढणी अनेक भागात सुरू झाली आहे. सुरवातीलाच पपईचे दर टिकून असून, शेतकऱ्यांना जागेवरच प्रतिकिलो १८ रुपयांचा दर मिळत आहे.

पपईची लागवड खानदेशात नंदुरबार जिल्ह्यातील शहादा, नंदुरबार व तळोदा भागात अधिक होते. यापाठोपाठ जळगावमधील चोपडा, यावल, रावेर, मुक्ताईनगर आणि धुळ्यातील शिरपूर, धुळे व शिंदखेडा तालुक्‍यातही पपईचे पीक घेतले जाते. 

मागील वर्षी उन्हाळ्यात दुष्काळ भीषण होता. यामुळे पपई लागवडीवर अनेक भागात परिणाम झाला. लागवड सुमारे एक ते दीड हजार हेक्‍टरने कमी झाली होती. सुमारे तीन हजार हेक्‍टरवर पपई आहे. तापी व पांझरा, अनेर नदीच्या लाभक्षेत्रासह सातपुडा पर्वतालगतच्या भागात मात्र शेतकऱ्यांनी पाण्याचा काटकसर करून वापर करून हे पीक जगविले. आजघडीला नंदुरबार, जळगाव, धुळे जिल्ह्यात पीक जोमात आहे. पपईची काढणी आठ दिवसांपूर्वी जोमात सुरू झाली. 

खरेदीसाठी राजस्थान, मध्य प्रदेश, जळगाव जिल्ह्यातील रावेर, धुळ्यातील शिंदखेडा व नंदुरबारमधील शहादा येथील व्यापारी कार्यवाही करीत आहेत. थेट शेतात जाऊन व्यापारी खरेदी करीत आहेत. आठ ते दहा दिवसांपूर्वी प्रतिकिलो २० रुपये दर होता. सध्या प्रतिकिलो कमाल १८ रुपये दर आहे. आगाप लागवडीच्या पपई बागांमधील काढणी वेगात सुरू आहे. दोन-तीनदा आगाप पपई बागांमध्ये काढणी झाली आहे. 

पपईची मागणी राजस्थान, दिल्ली, मध्य प्रदेश, गुजरात व राज्यातही आहे. बाजार समित्यांमध्ये पपईची आवक फारशी नाही. सध्या दर्जेदार फळे निघत असून, थंडी वाढली तर मागणी आणखी वाढेल, असे शेतकरी रोहित पटेल (वडछील, जि. नंदुरबार) म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन वाढले; कापूस, सोयाबीन, मका, हळद तसेच टोमॅटोचे काय आहेत दर ?

Pre-Sowing Tillage : धूळवाफेवरील भातपिकाच्या पेरणीपूर्व मशागतीला वेग

Water Scarcity : जळगाव जिल्ह्यातील पूर्व भागात पाणी टंचाई कमी

Kharif Season : खरिपासाठी पैसा उभा करण्याचे शेतकऱ्यांसमोर आव्हान

Summer Heat : उन्हाचा चटका; पिकांनाही फटका

SCROLL FOR NEXT