honey
honey  
ॲग्रोमनी

मध निर्यातीत मोठी वाढ

मुकुंद पिंगळे

नाशिक: भारतात उत्पादित होणाऱ्या नैसर्गिक मधाला देशांतर्गत व विदेशी बाजारपेठेत मोठी मागणी आहे. २०१३-१४ या वर्षात मधाचे उत्पादन ७६ हजार १५० टन होऊन २८ हजार ३७८.४२ टन निर्यात झाली होती. तर २०१८-१९ मध्ये मध उत्पादनात वाढ होऊन १ लाख २० हजार टनांवर पोचले आणि निर्यात ६१ हजार ३३३ टन झाली. गेल्या पाच वर्षात उत्पादनात ५७.५८ टक्के वाढ झाली असून निर्यात ११६.१३ टक्क्यांनी वाढल्याची माहिती केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी दिली आहे. केंद्रीय कृषिमंत्री श्री. तोमर यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली. मोदी सरकारच्या माध्यमातून हे शक्य झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे. अजूनही मोठ्या प्रमाणात मध उत्पादन हे पारंपरिक पद्धतीने केले जाते. अलीकडील काळात यात बदल होऊन स्थलांतरित स्वरूपाच्या मधमाशी पालन व्यवसायात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. मधाचा उपयोग औषधनिर्मिती, खाण्यासाठी तसेच खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी होत असल्याने बाहेरील देशांमधून मागणी वाढत असल्याचे आशादायी चित्र आहे. त्यामुळे कृषी पूरक व्यवसायास रोजगाराची संधी म्हणून पाहिल्यास अर्थकारणाला मोठा वाव आहे.  चालू वर्षी भारतातून ६१ हजार ३३३ टन निर्यात झाली असून यातून ७३२ कोटी १६ लाख परकीय चलन भारताला मिळाले आहे. त्यामुळे या व्यवसायात प्रशिक्षित मनुष्यबळ निर्मिती होऊन महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार व हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढ होऊ लागली आहे.  फुलोऱ्यानुसार मिळतो मधाला दर  विविध पिके व झाडापासून संकलित होणाऱ्या मधाचे दर वेगवेगळे असतात. फुलोऱ्यानुसार दर ठरत असतो.तुळस, सूर्यफूल, ओवा, शिसम, कोथिंबीर, घोडेघास, मोहरी, लिची तसेच नैसर्गिक रान फुलांच्या फुलोऱ्याचा आधार घेत मधमाश्यांच्या वसाहती तयार करून मध संकलित करण्यावर अनेक तरुण व्यावसायिक पुढे येऊ लागले आहेत. देशातील मध निर्यात (टन)

प्रमुख देश  २०१६-१७    २०१७-१८     २०१८-१९
अमेरिका  ३९०८८  ४२६५४  ५०३५६
अरब एमिरेट्स  १२६९ १७२६  २१००
सौदी अरब  ७७०  २५५४ १८४४
मोरोक्को ३१९ ३५५ १०६४
कतार २३६ ३७०  ५४१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

SCROLL FOR NEXT