ॲग्रोमनी

कांद्यावर ८५० डॉलर किमान निर्यातमूल्य

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली/नाशिक : देशांतर्गत दरावर नियंत्रण मिळविण्यासाठी केंद्र सरकारने अखेर कांद्यावर ८५० डॉलर प्रतिटन इतके किमान निर्यातमूल्य (एमईपी) लावले आहे. बुधवारीच केंद्रीय अन्नमंत्री रामविलास पासवान यांनी तसे संकेत दिले होेते. डिसेंबर २०१७ पर्यंत हे निर्बंध लागू असणार आहेत.  केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाचे महासंचालक यांनी या संदर्भातील अधिसूचना काढली आहे. या निर्णयाबाबत बोलताना लासलगाव येथील कांदा निर्यातदार नितीन जैन म्हणाले, ‘‘देशातील दक्षिणेतील राज्यांतील कांद्याचे पावसाने नुकसान झाले आहे. या स्थितीत देशांतर्गत बाजारातील कांद्याची आवक दरवर्षीच्या नोव्हेंबरच्या तुलनेत ५० टक्क्यांनी कमी आहे. मुंबईच्या बाजारात ही ५० च्या ऐवजी २० गाड्यांची आवक होत आहे. ही परिस्थिती पाहता देशातील प्रत्येक राज्यात कांद्याची मागणी वाढली आहे. केंद्राने एमईपी ८५० डॉलर केल्याचा या स्थितीत कांद्याच्या दरावर विशेष परिणाम होणार नाही. येत्या काळात कांद्याची आवक जेव्हा वाढेल. निर्यात कमी होईल. त्या वेळी प्रतिक्विंटल सरासरी ५०० रुपयाने दर उतरण्याची शक्यता आहे. तूर्तास आता तरी या निर्णयाचा बाजारावर विशेष परिणाम होणार नाही.’’  शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक नाही. बाजारातील अावक निम्म्याने घटली आहे. या परिस्थितीमध्ये सरकारने ग्राहकांना खूश करण्यासाठीहा निर्णय घेतला आहे. मात्र, त्याचा बाजारावर काही परिणाम होणार नाही, यातून सरकारचे शेतकरी विरोधी धोरण दिसून येते, अशी प्रतिक्रिया लासलगाव बाजार समितीचे संचालक राजेंद्र डोखळे यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Storage : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Green Hydrogen Project : हिमाचल प्रदेशच्या झाकरीत देशातील पहिला हरित हायड्रोजन प्रकल्प

Sustainable food : कार्बन फूटप्रिंट की शाश्‍वत अन्न?

Mumbai APMC Scam : संजय पानसरे यांना न्यायालयीन कोठडी

Elephant Issue in Germany : हत्तींवरून दोन देशांमध्ये रणकंदन

SCROLL FOR NEXT