सरकारने साखर आयात केली नाही
सरकारने साखर आयात केली नाही  
ॲग्रोमनी

सरकारने साखर आयात केली नाही

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर : सरकारने पाकिस्तानातून कोणतीही साखर आयात केलेली नाही. जर साखर बेकायदेशीर पद्धतीने आलेली असेल त्याचा शोध घेऊन संबंधितावर कारवाई केली जाईल, असा इशारा सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिला आहे. गेल्या दोन दिवसांपासून पाकिस्तानची सुमारे तीस हजार क्विंटल साखर भारतात आयात झाल्याने राजकारण तापले आहे. या पार्श्‍वभूमीवर मंत्री देशमुख यांनी हा खुलासा केला आहे. सध्या साखरेची स्थिती बिकट असतानाच सरकार पाकिस्तानातून साखर कशी आयात करेल, असा सवाल मंत्री देशमुख यांनी केला. आलेली साखर ही दोन महिन्यांपूर्वी आलेली असेल किंवा एखाद्या व्यापाऱ्याने मुद्दामहून ती आणली असेल. यामुळे जर ही साखर बेकायदेशीरपणे आली असेल, तर संबंधितांवर नक्कीच कारवाई करण्यात येईल, असे मंत्री देशमुख यांनी सांगितले. यासाठी व्यापाऱ्यांचे साठेही तपासण्यात येतील, असे श्री. देशमुख यांनी स्पष्ट केले. सध्या साखरेची स्थिती बिकट आहे. आंतराष्ट्रीय तसेच देशांतर्गत बाजारातही साखरेचे दर घसरले आहेत. सरकारने साखर निर्यात व्हावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. टनाला ५५ रुपये अनुदान देण्याचेही जाहीर केले आहे. आयातीवर शंभर टक्के कर लावला आहे. इतका खटाटोप करत असताना सरकार पाकिस्तानची साखर आयात कशी करेल, असा सवाल श्री. देशमुख यांनी केला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT