वाशी, नवी मुंबई ः येथील निर्यात सुविधा केंद्रामधील निर्यात प्रक्रियेचा शुभारंभ करताना अमेरिकन कॉरंटाईन इन्सपेक्टर  डॉ. वेदपाल मलिक आणि निर्यात सुविधा केंद्रातील तज्‍ज्ञ.
वाशी, नवी मुंबई ः येथील निर्यात सुविधा केंद्रामधील निर्यात प्रक्रियेचा शुभारंभ करताना अमेरिकन कॉरंटाईन इन्सपेक्टर डॉ. वेदपाल मलिक आणि निर्यात सुविधा केंद्रातील तज्‍ज्ञ. 
ॲग्रोमनी

आंबा निर्यातीला सुरवात

टीम अॅग्रोवन

पुणे  ः महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या वाशी (नवी मुंबई) येथील निर्यात सुविधा केंद्रामधून १६ टन आंबा अमेरिकेला पाठविण्यात आला. हंगामातील ही पहिली कंन्साईमेंट असून, यंदा अमेरिकेसह विविध देशांत सुमारे ३७ हजार टन आंबा निर्यातीची शक्यता निर्यात विभागाचे सरव्यवस्थापक डी. एम. साबळे यांनी व्यक्त केली. 

अमेरीकन कॉरंटाईन इन्सपेक्टर डॉ. वेदपाल मलिक यांच्या देखरेखीखाली निर्यात करण्यात आली आहे. डॉ. मलिक म्हणाले,‘अमेरिकेमध्ये भारतीय वंशाचे नागरीक माेठ्याप्रमाणावर असून, आंबा हंगाम सुरू झाल्यावर ते भारतीय आंब्याची वाट पहात असतात. यामुळे मेक्सिकन आंब्यापेक्षा भारतातील आणि विशेषतः काेकणातील आंब्याला विशेष मागणी असते. यामुळे पणन मंडळाने जास्तीत जास्त आंबा निर्यातीसाठी प्रयत्न करावेत.

दरम्यान निर्यात सुविधा केंद्रातून रशिया, इटली, इंग्लड, फ्रान्स, स्वित्झर्लंड या देशांमध्येदेखील ४० टन आंबा निर्यात करण्यात आल्याचे साबळे यांनी या वेळी सांगितले. के. बी. एक्स्पाेर्ट, रेन्बाे इंटरनॅशनल, काैशल काॅन्टीनेंटर या निर्यातदारांकडून निर्यात करण्यात आली. या वेळी अपेडाचे पी. पी. वाघमारे, निर्यातदार असाेसिएशनचे उपाध्यक्ष ईक्राम हुसेन, पणन विभागाचे एस. डी. वाघमाेडेआदी उपस्थित हाेते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

River Pollution : पाताळगंगा नदीत दूषित पाणी

Animal Husbandry : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागातील ८७ पदे रिक्त

Water Scarcity : वरणगावात १५ दिवसांआड पाणीपुरवठा; नागरिक त्रस्त

Landslides : जम्मू-काश्मीरमध्ये भूस्खलनामुळे घरे कोसळली; ५०० हून अधिक लोकांचे स्थालांतर

Wrestling : आणि कुस्ती शौकीनांच्या ह्रदयाची धडधड वाढायला लागते

SCROLL FOR NEXT