Agricultural Gold Loan Scheme  Agrowon
ॲग्रोमनी

शेतकऱ्यांसाठी कृषी सुवर्ण कर्ज योजना

विविध कृषी निविष्ठा, कृषिपूरक व्यवसाय आणि यंत्रसामग्रीसाठी बँकेद्वारे ‘कृषी सुवर्ण कर्ज योजना’ सुरू करण्यात आली आहे. या योजनेमध्ये शेतकऱ्यांना आपल्याकडील सोने बँकेत तारण ठेवून कर्ज घेता येते. याचा शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होऊ शकतो.

टीम ॲग्रोवन 

शेतकऱ्यांना हंगामात विविध शेतीकामांसाठी तसेच कृषिपूरक व्यवसायासाठी भांडवलाची आवश्यकता असते. बँकेतून शेतजमिनीवर कर्ज घेण्याची प्रक्रिया अधिक किचकट आणि वेळकाढू असल्याचे बऱ्याच शेतकऱ्यांचा अनुभव असतो. त्यासाठी कृषी सुवर्ण कर्ज योजना शेतकऱ्यांना आणि कृषी उद्योजकांना नक्कीच फायद्याची ठरू शकते.

भारतातील विविध खासगी तसेच शासकीय बँक आणि इतर वित्तीय संस्थांमार्फत शेतकऱ्यांना सोने तारण ठेवून कर्ज देण्यात येते. या योजनेच्या माध्यमातून शेतकरी आपल्याकडील सोने बँकेत तारण ठेवून त्याबदल्यात कर्ज घेऊ शकणार आहेत. या योजनेअंतर्गत जमीन खरेदी, सिंचनासाठी विविध उपकरणे, यंत्रसामग्री आणि कच्चा मालाच्या खरेदी, पीक लागवडीसाठी निविष्ठांची खरेदी अशा विविध शेतीकामांसाठी सोने तारण कर्ज योजनेच्या माध्यमातून कर्ज मिळते.

  1. या योजनेच्या माध्यमातून बँकांद्वारे पात्र शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर त्वरित कर्ज पुरवठा केला जातो.

  2. कर्ज देतेवेळी बाजारातील सोन्याच्या किमतीच्या आधारावर कर्जाची रक्कम ठरविली जाते.

  3. कर्ज काढू इच्छिणाऱ्या व्यक्तीच्या नावावर शेतजमीन असणे आवश्यक आहे. नावावर शेती असल्याचा पुरावा बँकेत जमा करावा लागतो. या विशेष योजनेचा लाभ फक्त शेतकऱ्यांनाचा घेता यावा, यासाठी अट घालण्यात आली आहे.

  4. कृषी सुवर्ण तारण कर्ज योजनेतील व्याज आकारणी बँकनिहाय बदलत जाते. मात्र सामान्यपणे प्रति वर्ष साधारण ७ टक्के व्याजदर आकारला जातो.

  5. कृषी सुवर्ण तारण कर्जाचा व्याजदर, पात्रता निकष, परतफेडीचा कालावधी, कर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी घेण्यात येणारे शुल्क आणि आवश्यक कागदपत्रे बँकेनुसार काही प्रमाणात भिन्न असतात.

कृषी सुवर्ण कर्ज योजनेची वैशिष्ट्ये (२०२१) -

  • कर्ज रक्कम - १ हजार ते २५ लाख रुपये

  • व्याजदर- ७ टक्के (वार्षिक)

  • परतफेड - सुलभ हप्त्यामध्ये

  • तारण वस्तू - सोन्याच्या दागिन्यांची गुणवत्ता आणि वजनानुसार त्याचे मूल्य ठरविले जाते.

  • कार्यकाळ - १ महिन्यापासून ते ३६ महिने

  • कर्ज प्रक्रियेसाठी घेण्यात येणारे शुल्क - कर्ज रकमेच्या १ टक्का

पात्रता निकष -

  • अर्जदार भारताचा नागरिक असावा.

  • बँकेद्वारे मागणी केलेल्या केवायसी मार्गदर्शक तत्त्वांची पूर्तता अर्जदाराने करावी.

  • वय किमान १८ ते कमाल ६५ वर्षे

  • अर्जदार शेती किंवा कृषी संलग्न व्यवसाय करीत असावा.

  • भारत सरकार किंवा रिझर्व्ह बँकेच्या नियमांतर्गत व्यवसाय करीत असावा.

आवश्यक कागदपत्रे -

  • पासपोर्ट आकाराचा फोटो.

  • योग्यरीत्या भरलेला अर्ज

  • अर्जदाराची केवायसी कागदपत्रे (पासपोर्ट, मतदान कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना, पाणी किंवा वीज बिल)

  • अर्जदाराच्या नावे असलेल्या जमिनीची कागदपत्रे

  • पीक लागवडीचा पुरावा

  • वित्तीय संस्थेद्वारे मागणी केलेली इतर कागदपत्रे

टीप - पात्रता निकष आणि आवश्यक कागदपत्रे ही प्रत्येक बँकेनुसार भिन्न असू शकतात. वर नमूद केलेले कृषी सुवर्ण निकष सामान्य आहेत. सुवर्ण तारण कर्जासाठी प्रत्यक्ष बँकेस भेट देऊन पात्रता निकष आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी.

यासाठी मिळेल कर्ज -

  • पीक लागवड, व्यवस्थापन.

  • शेतीसाठी यंत्रसामग्री, जमीन खरेदी, सिंचन उभारणी.

  • फलोत्पादन, कृषी उत्पादने वाहतुकीसाठी.

  • कृषिपूरक व्यवसाय उदा.

  • दुग्ध व्यवसायासाठी जनावरांची खरेदी, कुक्कुटपालनासाठी कोंबड्या खरेदी, शेड उभारणी

  • मत्स्य व्यवसायामध्ये तलाव बांधणी, मत्स्य खरेदी आणि विपणन सुविधांसाठी.

  • शेळ्या-मेंढ्या खरेदी.

योजनेसाठी पात्रता -

  • सर्व शेतकरी वर्ग

  • कृषी उद्योजक

  • कोणतीही व्यक्ती जी कृषी किंवा संबंधित व्यवसायामध्ये गुंतलेली आहे.

  • पात्र व्यक्तीच्या नावे जमिनीची नोंद किंवा कृषी उपक्रमांचे पुरावे असणे बंधनकारक.

(कर्ज काढू इच्छिणाऱ्या व्यक्तीच्या नावावर शेतजमीन असणे बंधनकारक आहे. अर्जदाराच्या नावे शेती असल्याचा पुरावा बँकेत जमा करावा लागतो. फक्त शेतकऱ्यांनाच योजनेचा लाभ घेता येईल, यासाठी अट घालण्यात आली आहे.)

योजनेचे फायदे -

  • इतर कर्जांच्या तुलनेत कमी कागदपत्रांची पूर्तता करावी लागते.

  • आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर त्वरित कर्ज मंजुरी.

  • कर्जदाराकडील सोन्याच्या शुद्धतेवर आणि बाजार मूल्यानुसार कर्जाची रक्कम ठरविली जाते. त्यामुळे सोन्याच्या किमतीप्रमाणे योग्य कर्ज रक्कम मिळण्यास मदत होते.

  • कमी व्याजदर.

  • तारण ठेवलेले सोने बँकेत पूर्णतः सुरक्षित.

  • सुलभ कर्ज वितरण.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Kisan Installment Date : पीएम किसानच्या हप्त्याची प्रतिक्षा कायम; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा

Agrowon Podcast: उडदाचे भाव दबावातच; बाजरीचे दर स्थिर, कोबी- मेथीचा भाव टिकून, फ्लाॅवर दर तेजीत

Maharashtra Rain: राज्यात पावसाचा जोर वाढणार; विदर्भ आणि कोकणात पावसाचा जोर अधिक राहणार

APMC SIT Investigation: नागपूर बाजार समितीच्या चौकशीसाठी एसआयटी

Cotton Farming : पूर्वहंगामी कापूस पिकाची वाढ जोमात

SCROLL FOR NEXT