भारतातील पाच कडधान्यांच्या हमीभावावर अाक्षेप
भारतातील पाच कडधान्यांच्या हमीभावावर अाक्षेप 
ॲग्रोमनी

भारतातील पाच कडधान्यांच्या हमीभावावर अाक्षेप

वृत्तसेवा

वॉशिंग्टन : भारतात पाच कडधान्यांना दिल्या जाणाऱ्या हमीभावाविरोधात जागतिक व्यापार संघटनेकडे (डब्लूटीओ) अमेरिका आणि कॅनडा हे देश संयुक्त तक्रार नोंदविणार आहेत. ‘माहिती संकलन’ या कथित सबबीखाली अविश्‍वसनीय तपशील सदस्यांना छाननीसाठी भारताने दिला असल्याचे या दोन्ही देशांनी म्हटले आहे. अमेरिकेच्या कृषी विभागाने (यूएसडीए) दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे. अमेरिका आणि कॅनाडातील सूत्रांनुसार भारतातने सातत्यपूर्ण हरभरा, तूर, उडीद, मूग आणि मसूर पिकांचे हमीभाव ‘माहिती संकलन’च्या सबबीखाली दिले आहेत. डब्लूटीओच्या कृषी सूत्रानुसार हिशेब केला असता, कडधान्यांना मिळणारे भारतातील बाजार आधार मूल्य हे ‘व्यापार अव्यवहार्य समर्थ’ हे मान्यता पातळीपेक्षा खूप अधिक आहे. डब्लूटीओच्या कृषिविषयक समितीची २६-२७ फेब्रुवारीस बैठक होत असून, भारत आपल्या धोरणांची अंमलबजावणी कशी करतो, यावर जोरदार चर्चा अमेरिकेला अपेक्षित आहे. याबाबत आक्षेप

  • हमीभाव देताना वापरण्यात आलेला एकूण उत्पादनाचा तपशील
  • चलनविनिमय आणि प्रत्यक्ष दरातील गणिते
  • जागतिक व्यापार संघटनेच्या मान्यता सूत्रासाठीची अपूर्ण माहिती  
  • जागतिक व्यापार संघटनेच्या कृषी विषय समितीकडे (सीओए) भारतातील पाच कडधान्यांना मिळणाऱ्या हमीभावाविरोधात अमेरिकेने १२ फेब्रुवारीस प्रतिसूचना सादर केली असून, यात कॅनडा सहयोगी देश आहे.’’ - रॉबर्ट लायथिझर, व्यापार प्रतिनिधी अमेरिका, - सोनी परड्यू, कृषी सचिव, अमेरिका

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Bachchu Kadu : देशात धर्म नाहीतर शेतकरी संकटात, बच्चू कडूंचा विरोधकांवर 'प्रहार'

    Water Scarcity : आडातच नाही, तर...

    Agriculture Department : राज्याला मिळेना विस्तार संचालक

    POCRA Subsidy : ‘पोकरा’चे अनुदान लाटण्यासाठी बोगस बिले सादर केल्याचा संशय

    Tomato Cultivation : अकोले, संगमनेरमध्ये टोमॅटो लागवडीत घट

    SCROLL FOR NEXT