The need for a budget for farming companies
The need for a budget for farming companies 
ॲग्रोमनी

शेतकरी कंपन्यांसाठी अर्थसंकल्पाची गरज

मिलिंद आकरे, हेमंत जगताप

शेतकरी कंपनी सुरू करण्यापूर्वी जसे व्यवसायाची निवड महत्त्वाची असते, तसे कंपनी कायद्यानुसार काही नियम व मार्गदर्शक तत्त्वे पाळणे गरजेचे असते. यामध्ये प्रामुख्याने अर्थसंकल्पाची मांडणी व नियोजन अत्यंत महत्त्वाचे असते.  शे तकरी उत्पादक कंपनीची नोंदणी झाल्यानंतर व्यवसाय आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू होते. प्रामुख्याने शेतकरी उत्पादक कंपनीची नोंदणी करण्यापूर्वी कोणता व्यवसाय कंपनी करणार आहे, याबाबत नियोजन करावे लागते. यावरच शेतकरी कंपनीच्या प्रगतीचा पाया रचलेला असतो. शेतकरी कंपनीच्या भौगोलिक क्षेत्रातील पीक परिस्थिती, सिंचन सुविधा, प्रक्रिया उद्योगांची रचना, बाजार व्यवस्था, पीकनिहाय मूल्यसाखळी हे घटक महत्त्वाचे आहेत. यासोबतच शेतकरी व त्यांची सामाजिक वर्तणूक, राजकारणातील सक्रिय शेतकरी संचालकांचा शेतकरी कंपनीतील प्रभाव, निर्यातदार-व्यापारी-आडतदार यांची पार्श्‍वभूमी असणारे संचालक, कृषी पदवीधर, कृषी अभियंता, इतर क्षेत्रांतील कृषिविषयक माहिती असणारे लोक, सामाजिक क्षेत्रातील मंडळी, खासगी किंवा शासकीय क्षेत्रातील निवृत्त अधिकारी अशा प्रकारचे अनेक घटक शेतकरी कंपनीच्या प्रगतीसाठी कारणीभूत असतात. यामध्ये प्रामुख्याने संचालक मंडळींचा मागील अनुभव, चिकाटी, आर्थिक परिस्थिती, शेतकरी कंपनीच्या प्रगतीबाबत आस्था, संचालकांचे समाजातील स्थान इत्यादी बाबीदेखील तितक्याच महत्त्वाच्या असतात.  शेतकरी कंपनी चालविणे ही एक सामाजिक जबाबदारी असून, ती खासगी क्षेत्राच्या पद्धतीने शिस्तबद्ध नियमानुसार चालविणे अत्यंत गरजेचे असते. शेतकरी कंपनीचे नेतृत्व करणाऱ्या संचालक समिती व सीईओच्या कामगिरीनुसार कंपनीचा आलेख बदलत असतो. शेतकरी कंपनी सुरू करण्यापूर्वी जसे व्यवसायाची निवड महत्त्वाची असते, तसे कंपनी कायद्यानुसार काही नियम व मार्गदर्शक तत्त्वे पाळणे गरजेचे असते. यामध्ये प्रामुख्याने अर्थसंकल्पाची मांडणी व नियोजन अत्यंत महत्त्वाचे असते.   महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाची कामगिरी व योगदान  समाजातील समुदाय आधारित संस्थांची (शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, सहकारी संस्था, महिला बचत गट व त्यांचे संघटन) क्षमता बांधणी करण्याचे सूक्ष्म नियोजन महामंडळामार्फत करण्यात येत आहे. आतापर्यंत ऑनलाइन व प्रत्यक्ष अशा दोन्ही पद्धतींनी मार्गदर्शनाच्या मालिका राबविण्यात आल्या आहेत. शेतकरी कंपनीच्या रूपाने पर्यायी बाजारपेठेची निर्मिती हा खरा उद्देश आहे. त्यातून विविध पिकांच्या मूल्यसाखळ्या व बाजारांचा अभ्यास करून विक्रीचे मॉडेल तयार करणे अपेक्षित आहे. त्यानुसार शेतकरी कंपनीचे प्रत्येक वर्षीचे अर्थसंकल्प तयार होणे गरजेचे आहे. ते बनविण्यासाठी सनदी लेखापालाची मदत घ्यावी. सर्वच सभासदांना अर्थसंकल्प संपूर्ण समजेलच असे नाही. परंतु ढोबळ मानाने त्यांना राबविण्यात येणारे उपक्रम, येणारा खर्च आणि त्यातून कंपनीला होणारा फायदा हे पहिल्या टप्प्यात समजले पाहिजे. त्यानंतर विविध प्रशिक्षणांच्या माध्यमातून संचालकांची क्षमता बांधणी शेतकरी कंपनीने करावी. जेवढे जास्त संचालक या क्षेत्रात तज्ज्ञ होतील, तेवढे शेतकरी कंपनीच्या प्रगतीच्या दृष्टीने फायद्याचे ठरते.   महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ शेतकरी कंपनीचे अर्थसंकल्प व व्यवसाय आराखडा यावर प्रशिक्षणाचे मॉडेल तयार करीत आहे. त्यातून शेतकरी कंपनी संचालक व सीईओ यांना प्राथमिक स्तरावर प्रशिक्षण देण्यात येत आहे. नाबार्ड पोपी (Producer Organisation Promoting Institution) व रिसोर्स सपोर्ट एजन्सी या सारख्या काही योजनांच्या साह्याने विनामूल्य किंवा मूल्य घेऊन क्षमता बांधणी करता येते.  अर्थसंकल्प व शेतकरी कंपन्यांसाठी अर्थसंकल्पाचे महत्त्व 

  • अर्थसंकल्प तयार करणे हा प्रत्येक संस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचा विषय असतो. कारण एखाद्या संस्थेच्या संसाधनांचा प्रभावीपणे उपयोग करून निश्‍चित लक्षांक आणि उद्दिष्टे साध्य करण्याची ही एक पद्धत आहे. 
  • हे विशिष्ट कालावधीचे (सामान्यतः एक वर्ष) आर्थिक विश्‍लेषण असते. त्यातून संस्थेने केलेल्या नियोजनाप्रमाणे पुढे जाण्यासाठी पुरेशी आर्थिक संसाधने आहेत की नाही, याचा ताळमेळ घालावा. अचूक, अंदाजित आणि नियोजित अर्थसंकल्प संस्थेची प्रगती ठरवतो.
  • अर्थसंकल्प ही एक महत्त्वपूर्ण योजना असून, ती संस्थेच्या कामगिरीच्या मूल्यांकनास चालना देते, उत्पन्न आणि खर्च नियंत्रित करण्यात मदत करते, कोणत्याही अपेक्षित आणि अनपेक्षित खर्चामध्ये बचत करते, पद्धतशीरपणे समस्यांचे निराकरण करते आणि महसूल व भांडवलाची संसाधने फायद्यात आणण्याचे काम करते.
  • - प्रशांत चासकर,  ९९७०३६४१३०. (कृषी व्यवसाय पणन व्यवस्थापक, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्या, साखर संकुल,‍ शिवाजीनगर, पुणे)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Crop Insurance : पीकविम्याचे बदल शेतकऱ्यांच्या किती फायद्याचे?

    Weekly Weather : कमाल, किमान तापमानात वाढ; उष्णतेच्या लाटेची शक्यता

    Mahabeej Seed : महाबीजने बियाण्यात साधली विक्रमी वाढ

    Unseasonal Rain : नगरसह नेवासा, पारनेर, शेवगावमध्ये वादळी पाऊस

    Summer Groundnut Sowing : उन्हाळी भुईमुगाची लागवड यंदा कमी प्रमाणात

    SCROLL FOR NEXT