द्राक्ष सल्ला
द्राक्ष सल्ला 
ॲग्रोमनी

द्राक्ष बागेतील भुरीनियंत्रणाकडे दुर्लक्ष नको...

डॉ. एस. डी. सावंत

येत्या आठवड्यामध्ये सर्व द्राक्ष विभागामध्ये वातावरण बहुतांशी निरभ्र राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी (विशेषतः नाशिकच्या आसपास) शनिवार रविवारी वातावरण कमी जास्त प्रमाणात ढगाळ राहू शकेल. मात्र, पावसाची शक्यता दिसत नाही. बहुतांश सर्व भागामध्ये कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १७-१८ अंश सेल्सिअसपेक्षा कमी राहील. अशा वातावरणामध्ये भुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यामुळे त्याच्या नियंत्रणाबाबतीत गाफील राहू नका. मागील आठवड्यामध्ये सांगितलेल्या उपाययोजना या आठवड्यासाठीही लागू आहेत. त्यानुसार कार्यवाही करावी .

  • भुरीच्या नियंत्रणासाठी सल्फरचा वापर करावा. त्यासाठी लो ते मेडियम व्हॉल्युम फवारणी यंत्रे वापरल्यास मण्यावर फवारणीचे द्रावण ओघळून येणार नाही. फवारणीवेळी सल्फरचे डाग पडणार नाही, याची दक्षता घ्यावी.
  • सल्फर वापरलेल्या बागेमध्ये जैविक नियंत्रण घटकांचा वापर शक्य तेव्हा करावा. जैविक नियंत्रणामध्ये ट्रायकोडर्मा, बॅसिलस सबटिलीस आणि अॅम्पिलोमायसीस यांचा वापर शक्य आहे.
  • फवारणीद्वारे पोटॅशिअम (०-५२-३४) व कॅल्शियम (कॅल्शिअम क्लोराईड किंवा कॅल्शिअम सल्फेट) चा वापर केल्यास अप्रत्यक्षरीत्या बुरशीनियंत्रणाला फायदा होतो.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

    Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

    Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

    Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

    Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

    SCROLL FOR NEXT