Cotton Market Agrowon
ॲग्रोमनी

Cotton Market : कापूस दरात काहीशी सुधारणा

Cotton Arrival : बाजारातील कापूस आवक आजही सरासरीपेक्षा जास्त होती. काही भागात शेतकऱ्यांनी कापूस विक्री कमी केली. त्यामुळे कापसाच्या सरासरी भावात काही ठिकाणी सुधारणा दिसली.

Team Agrowon

Cotton Bajarbhav : बाजारातील कापूस आवक आजही सरासरीपेक्षा जास्त होती. काही भागात शेतकऱ्यांनी कापूस विक्री कमी केली. त्यामुळे कापसाच्या सरासरी भावात काही ठिकाणी सुधारणा दिसली.

तर बहुतेक ठिकाणी दरपातळी स्थिरावली होती. कापसाला आज सरासरी ६ हजार ७०० ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला होता.

मागील दोन दिवसांपासून कापसाच्या दरात काहीसे चढ उतार दिसत आहेत. तर सरासरी दरपातळीही काहीशी वाढली.

कापसाची बाजारातील आवक आजही सरासरीपेक्षा अधिकच होती. याचा दबाव दरावर आहेच. शिवाय अनेक भागात पाऊस होत असल्याने शेतकरीही कापसाची विक्री करत असल्याचं सांगितलं जातं. देशातील काही भागात कापसाची आवक कमी झालेली दिसते.

पण एकूण देशभरातील आवक आजही सरासरीपेक्षा जास्त आहे. आज देशभरातील बाजारांमध्ये १ लाख ८ हजार गाठींची आवक झाली.

आवकेचा दबाव असल्याने दरावरील दबाव कायम दिसतो. पण सरासरी दरपातळी काहीशी वाढली. काही भागांमध्ये आज कापसाच्या भावात क्विंटलमागे १०० रुपयांपर्यंतची सुधारणा दिसली. तर बहुतेक ठिकाणी कापसाचे भाव स्थिर होते.

कापसाला आज सरासरी ६ हजार ७०० ते ७ हजार ५०० रुपयांचा भाव मिळाला. फरदड कापसाला आजही ६ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. आजही गुजरातमध्ये सर्वाधिक आवक होती. त्यानंतर महाराष्ट्रातील बाजारात कापूस आला. आवकेचा दबाव आणि पावसाळी वातावरणाचा परिणाम बाजारावर दिसतो.

वायद्यांवर कशाचा दबाव?

महिन्याचा शेवट असल्याने वायद्यांमध्ये कापूस भावात नरमाई दिसली. वायदे जून महिन्याचे वायदे ३४० रुपयांनी कमी होऊन ५८ हजार ६४० रुपयांवर आले होते. तिकडे आंतरराष्ट्रीय बाजारातही वायद्यांमध्ये चढ उतार सुरुच होते.

कापूस वायदे ८३.५९ सेंट प्रतिपाऊंडवर होते. वायद्यांमद्ये नरमाई दिसत असली तरी प्रत्यक्ष कापूस खरेदीचा सरासरी भाव म्हणजेच काॅटलूक ए इंडेक्स ३ सेंटने वाढून ९४ सेंट प्रतिपाऊंडवर पोचला होता.

सरकीचे भावही दबावात

कापसाबरोबरच सरकीचे भावही कमी झाले आहेत. सरकीचे भाव आज सरासरी २ हजार ९०० ते ३ हजार २०० रुपयांच्या दरम्यान होते. सरकीला सध्या सरकी तेलाचा फटका बसत आहे. खाद्यतेलाचे भाव पडल्याने सरकी तेलही कमी झाले. तसेच तेलबिया पेंडेचे भावही नरमले आहेत. परिणामी सरकी तेल आणि सरकी पेंडेमुळे कापसावर दबाव वाढला.

पुढचा अंदाज काय?

मागील दोन दिवसांपासून काही बाजारांमध्ये कापसाच्या दरात काहीशी सुधारणा पाहायला मिळाली. अनेक बाजारात दराने ७ हजारांचा टप्पा पुन्हा पार केला. तर काही ठिकाणी ७ हजार ५०० रुपयांचाही भाव पाहायला मिळाला. खरिपाची गरज भागल्यानंतर शेतकरी पुन्हा विक्री कमी करत असल्याचे व्यापारी सांगत आहेत.

तसेच शेतकऱ्यांकडील कापूस येत्या काही दिवसांमध्ये कमी होईल. परिणामी बाजारातील आवक मर्यादीत होऊन दरात सुधारणा दिसू शकते. तसेच पाऊस कसा होतो आणि कापूस लागवडीची काय स्थिती राहते, यावरही बाजार अवलंबून असेल, असे जाणकारांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT