Cashew Crop Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cashew Market : परवाना नसताना काजू बी खरेदी? आता होणार कडक कारवाई

Cashew Rate : जिल्ह्यातील काजू बी खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी काजू बी खरेदीकरिता आवश्यक परवाना घेऊनच खरेदी करावी, अन्यथा कारवाई करण्याचा निर्णय कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने घेण्यात आला आहे.

एकनाथ पवार

Sindhudurga News : जिल्ह्यातील काजू बी खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी काजू बी खरेदीकरिता आवश्यक परवाना घेऊनच खरेदी करावी, अन्यथा कारवाई करण्याचा निर्णय कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने घेण्यात आला आहे.

यावर्षीचा काजू हंगाम सुरू झाला आहे. काजू बी ला चांगला दर मिळावा याकरिता कृषी उत्पन्न बाजार समिती प्रयत्नशील आहे. परंतु जिल्ह्यातील अनेक आठवडा बाजारात व्यापारी कोणताही परवाना नसताना काजू बी खरेदी करतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. विक्रीची कोणतीही पावती शेतकऱ्याला दिली जात नाही.

त्यामुळे शासनाकडून शेतकऱ्याला अनुदान देताना अनेक अडचणी निर्माण होतात. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीने यावर्षी बाजार समितीचा परवाना घेऊनच व्यापाऱ्यानी काजू बीची खरेदी करावी.

विनापरवाना काजू बी खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची तयारी कृषी उत्पन्न समितीने दर्शविली आहे. त्यामुळे काजू उत्पादकांनी देखील परवाना असलेल्या व्यापाऱ्यांकडेच काजू बी ची विक्री करावी, असे आवाहन देखील समितीकडून करण्यात आले आहे.

शासनाने काजू उत्पादकांसाठी यावर्षी प्रतिकिलो दहा रुपये अनुदान जाहीर केले. अशा प्रकारचे अनुदान शेतकऱ्यांना घेताना अडचणी येऊ नये म्हणून परवानाधारक व्यापाऱ्यांकडे काजू बीची विक्री व्हायला हवी असा आमचा प्रयत्न आहे. विनापरवाना खरेदी करणाऱ्यांवर कारवाईची तरतूद आहे.
- तुळशीदास रावराणे, अध्यक्ष, कृषी उत्पन्न बाजार समिती, सिंधुदुर्ग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT