Silk Farming
Silk Farming agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Silk Farming : कोष खरेदीला प्रतिकिलो ९५० ते १००० रुपये दर

माणिक रासवे

परभणी ः गडहिंग्लज (जि. कोल्हापूर) येथील शासकीय अंडीपुंज निर्मिती केंद्रांतर्गत तुती रेशीम बीज कोष खरेदी (Silk Cocoon Procurement) दरात प्युपेशन टक्केवारीनुसार ९५० ते १००० रुपये प्रतिकिलो अशी सुधारणा करण्यात आली आहे. त्याबाबतचा शासन निर्णय सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागातर्फे सोमवारी (ता. १४) काढण्यात आला. सुधारित दर हे शासन निर्णयाच्या दिनांकापासून अमलात येतील. २०१३ पासून हे दर (Silk Cocoon Rate) प्रतिकिलो ६०० ते ६५० रुपये होते.

राज्यातील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना गडहिंग्लज (जि. कोल्हापूर) येथील शासकीय अंडीपुंज निर्मिती केंद्रामार्फत अंडीपुंजाचा पुरवठा करण्यात येतो. अंडीपुंज निर्मितीसाठी कर्नाटकातील म्हैसूर येथून सीड (बीज) अंडीपुंज आणून स्थानिक बीज कोष उत्पादकांना पुरवठा करण्यात येतो. त्यांनी उत्पादित केलेले बीज कोष गडहिंग्लज येथील केंद्रामार्फत खरेदी केले जातात.

त्या बीज कोषाचा उपयोग करून अंडीपुंज निर्मिती करण्यात येते. रेशीम संचालनालयाच्या दरपत्रकानुसार प्युपेशन टक्केवारीनुसार ६०० ते ६५० रुपये प्रतिकिलो दराने शेतकऱ्यांकडून रेशीम बीज कोष खरेदी केले जात होते. स्थानिक कोषांना मिळणारा दर हा केंद्रीय रेशीम मंडळाच्या दरापेक्षा कमी असल्याने शेतकरी बीज कोष उत्पादन घेण्यास तयार होत नाहीत. त्याचा परिणाम अंडीपुंज निर्मितीवर होत आहे.

राज्यातील कोष उत्पादकांची दरवाढ करण्याची मागणी होती. त्यामुळे राष्ट्रीय रेशीम कीट बीज संगठण (एनएसएसओ), केंद्रीय रेशीम मंडळ, बंगळूर यांच्या संदर्भाधीन २९ डिसेंबर २०२१ रोजीच्या परिपत्रकाधारे सुधारित दराच्या धर्तीवर शासकीय अंडीपुंज निर्मिती केंद्र, गडहिंग्लज (जि. कोल्हापूर) येथेल रेशीम अंडीपुंज निर्मितीसाठी कोषाच्या खरेदी दरात प्युपेशन टक्केवारीनुसार ९०० ते १००० रुपये प्रति किलोप्रमाणे सुधारणा केली आहे.

राज्यात रेशीम बीज कोष उत्पादन कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे जिल्ह्यांतील ५० ते ६० शेतकरी घेतात. औरंगाबाद येथे रेशीम कोष बीजनिर्मिती केंद्र सुरू झाल्यानंतर मराठवाड्यातील कोष उत्पादकांना फायदा होईल. २०१३ नंतर रेशीम बीज कोष खरेदी दरात वाढ केली आहे. त्यामुळे कोष उत्पादकांमध्ये समाधान आहे.

बाय व्होल्टाइन कोषाचे सुधारित खरेदी दर

प्युपेशन टक्केवारी...प्रतिकिलो दर

८०...९५०

८१...९५३

८२...९५६

८३...९५९

८४...९६२

८५...९६५

८६...९६८

८७...९७१

८८...९७४

८९...९७७

९०...९८०

९१...९८३

९२...९८६

९३...९८९

९४...९९२

९५...९९५

९६ च्यावर...१०००

निवडक जिल्ह्यातील शेतकरी रेशीम बीज कोष उत्पादन घेतात. खरेदी दरात सुधारणेमुळे दर्जेदार कोष उत्पादनास चालना मिळेल. शेतकऱ्यांचा फायदा होईल.
अनिल संकपाळ, रेशीम विकास अधिकारी, अंडीपुंज निर्मिती केंद्र, गडहिंग्लज, जि. कोल्हापूर
दर वाढ केल्यामुळे मराठवाड्यातील शेतकरी रेशीम बीज कोष उत्पादनाकडे वळतील. औरंगाबाद येथील अंडीपुंज निर्मिती केंद्र लवकर कार्यान्वित करण्याची गरज आहे.
सोपान शिंदे, पांगरा शिंदे, जि. हिंगोली

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Golden Jubilee : मातीच्या सन्मानाने ‘स्वराज ट्रॅक्टर्स’चा सुवर्ण महोत्सव साजरा

Crop Nutrient Management : पीक उत्पादन वाढीसाठी अन्नद्रव्ये व्यवस्थापन

Fishery Employment : मत्स्य व्यवसायातील रोजगाराच्या विविध संधी

Raju Shetti Vs Eknath Shinde : 'शेतकरी तुम्हाला दहशतवादी वाटला का'? राजू शेट्टींच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून नोटीसा

Bird flu : केरळमधील बर्ड फ्लूने कर्नाटक अलर्टमोडवर; सीमावर्ती भागात तपासणी वाढवली

SCROLL FOR NEXT