Tur Procurement Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Tur Procurement : हमीदराने हेक्टरी नऊ क्विंटल तूर होणार खरेदी

Tur Market : नांदेड जिल्ह्यात किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत एनसीसीएफच्या माध्यमातून पणन महासंघ, विदर्भ सहकारी पणन महासंघ तसेच काही शेतकरी उत्पादक कंपनीच्या संघाकडून मिळालेल्या खरेदी केंद्रावर तूर खरेदी करण्यात येणार आहे.

Team Agrowon

Nanded News : जिल्ह्यात किमान हमीदरानुसार तुरीची खरेदी होत आहे. जिल्ह्याची तुरीची अंदाजित उत्पादकता यंदा हेक्टरी नऊ क्विंटल जाहीर झाल्यामुळे शेतकऱ्यांना हेक्टरी नऊ क्विंटल तूर विक्री करता येईल.

यंदा जिल्ह्यात १३ हजार ७२६ टन तूर खरेदीचे लक्ष्यांक निश्‍चित करण्यात आले आहे. परंतु अनेक शेतकऱ्यांच्या सातबारावर तुरीचा पेरा नोंदला नसल्याची अडचण असल्यामुळे तूर विक्रीसाठी मर्यादा आली आहे.

नांदेड जिल्ह्यात किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत एनसीसीएफच्या माध्यमातून पणन महासंघ, विदर्भ सहकारी पणन महासंघ तसेच काही शेतकरी उत्पादक कंपनीच्या संघाकडून मिळालेल्या खरेदी केंद्रावर तूर खरेदी करण्यात येणार आहे. या केंद्रावर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी नऊ क्विंटल तूर विक्री करता येणार आहे.

प्रशासनाने अंदाजित उत्पादकता जाहीर केली. यात नांदेडला ४० हजार ९०२ टन एकूण उत्पादन होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. तर यापैकी २५ टक्के खरेदीनुसार नांदेड जिल्ह्यात १३ हजार ७२६ टन तूर हमीदरानुसार खरेदी होणार असल्याचे शासनाच्या आदेशात म्हटले आहे.

दरम्यान जिल्ह्यात तूर खरेदीसाठी २४ जानेवारीपासून तीस दिवसापर्यंत ऑनलाइन पोर्टलवर नोंदणीसाठी मुदत होती. या केंद्रावर तूर खरेदी १३ फेब्रुवारीपासून सुरू झाली. परंतु अपेक्षित नोंदणी झाली नसल्याने राज्य शासनाने पुन्हा ३० दिवसांची मुदतवाढ दिली. दरम्यान, शेतकऱ्यांच्या सातबारावर तुरीचा पेरा नोंद नसल्यामुळे नोंदणीची प्रक्रिया रखडली आहे.

सध्या राज्याच्या पणन विभागाने पेरा नोंदीबाबत पत्र काढून सोयाबीन, उडीद व मूग या क्षेत्रात आंतरपीक म्हणून तुरीचा पेरा नोंदविलेल्या शेतकऱ्यांचे संपूर्ण क्षेत तर कपाशीत आंतरपीक म्हणून तुरीचा पेरा लावलेल्या क्षेत्रापैकी अर्धे क्षेत्र तुरीचे गृहीत धरले जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी अनेक शेतकऱ्यांनी आंतरपीक म्हणून तुरीचा पेरा लावला नसल्याची माहिती पुढे आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT