Crop Damage Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Crop Damage Compensation: नोव्हेंबर, डिसेंबरमधील नुकसानीसाठी मदत ८५०० मिळणार की १३६०० रुपये; वाढीव मदत मिळणार का?

Crop Damage Update: नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले. पण नेमकी किती मदत मिळणार? यावरून अजूनही शेतकऱ्यांमध्ये संभ्रम दिसतो.

Anil Jadhao 

Pune News : नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले. पण नेमकी किती मदत मिळणार? यावरून अजूनही शेतकऱ्यांमध्ये संभ्रम दिसतो. कारण २०२२ मध्ये काही शेतकऱ्यांना हेक्टरी मदत कमी तर काही शेतकऱ्यांना जास्त मिळाली होती. यंदाही हाच गोंधळ होणार का? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला. पण यंदा तसं काही होणार नाही. कारण सरकारने आधीच जीआर काढून किती मदत मिळणार हे स्पष्ट केले. 

नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सुधारित निकषानुसार वाढीव मदत दिली जाईल, असा जीआर म्हणजेच शासन आदेश सरकारने एक जानेवारीलाच काढला आहे. त्यात स्पष्ट म्हटले आहे की, नोव्हेंबर २०२३ आणि त्यापुढील काळात अवकाळी पाऊस, गारपीट आणि इतर नैसर्गिक आपत्तीमुळे पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वाढीव मदत देण्यात येईल. म्हणजेच नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात झालेल्या पीक नुकसानीसाठी शेतकऱ्यांना वाढीव मदत मिळेल. 

मग ही वाढीव मदत किती आहे? तर कोरडवाहू पिकांसाठी हेक्टरी मदत ८ हजार ५०० रुपयांवरून १३६०० रुपये करण्यात आली. बागायती पिकांसाठी १७ हजारांऐवजी २७ हजार आणि बागायती पिकांसाठी २२ हजार ५०० रुपयांऐवजी ३६ हजार रुपयांची मदत मिळणार आहे. म्हणजेच नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात झालेल्या कोरडवाहू पिकांसाठी १३ हजार ६०० रुपये, बागायती पिकांसाठी २७ हजार रुपये आणि फळपिकांसाठी ३६ हजार रुपये मदत मिळणार आहे. 

मदतीसाठी क्षेत्र मर्यादाही वाढवण्यात आली. जुन्या निकषानुसार २ हेक्टरवर्यंतच मदत मिळत होती. पण वाढीव मदतीमुळे क्षेत्र मर्यादा ३ हेक्टरपर्यंत करण्यात आली. म्हणजेच एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त तीन हेक्टरपर्यंत मदत मिळणार. नुकसानग्रस्त क्षेत्र ४ हेक्टर असेल तरीही तीन हेक्टरसाठीच मदत मिळेल. शेतकऱ्याच्या नुकसानग्रस्त क्षेत्राची किती नोंद केली त्यावरून मिळणारी मदत ठरणार आहे. 

तुमचं नुकसानग्रस्त क्षेत्र किती ठरवलं गेलं याची चौकशी तुम्ही तालुका कृषी विभागात जाऊन करु शकतो. तुमचं क्षेत्र कोरडवाहू आहे, बागायती आहे की फळबागायती आहे हे तुम्हाला माहितच आहे. फक्त नुकसानग्रस्त क्षेत्राची किती नोंद झाली?

एक हेक्टर, दोन हेक्टर, तीन हेक्टर की एका हेक्टरपेक्षा कमी नोंद झाली. त्या क्षेत्राला सरकारने जाहीर केलेल्या मदतीच्या आकड्याने गुणाकार केला की तुम्हाला किती भरपाई यायला पाहीजे, हा आकडा तुम्ही काढू शकता. शेतकऱ्यांनी हा आकडा काढावा. जेणेकरून तुम्हाला योग्य मदत मिळाली का? हे समजण्यास मदत होईल.

आता तुमचा प्रश्न असेल की मदत कधीपासून खात्यात जमा होईल? पण आता कुठे पंचनामे पूर्ण झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकूण मदत किती द्यावी लागेल, याचा आकडा काढल्यानंतर त्या निधीला मंजूर मिळाल्यानंतर पैसे खात्यात जमा होण्यास सुरुवात होईल. पण निश्चित तारीख अजून आलेली नाही. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT