Gold Rate  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Gold Rate : सोनेदर प्रतितोळा ७५ हजार रुपये

Today's Gold Rate : गुढीपाडव्याला सकाळी सोन्याचा दर ७३ हजार ५४२ रुपयांवर (प्रतितोळा, जीएसटीसह) होता.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : सर्वसामान्यांना सोने घेणे आता आवाक्याबाहेर झाले आहे. एक तोळा सोन्याचा दर शुक्रवारी (ता. १२) ७५ हजार १९० रुपये (जीएसटीसह) होता, तर चांदीनेही ८६ हजार ५२० प्रतिकिलोचा टप्पा गाठला असून चांदीही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे.

गुढीपाडव्याला सकाळी सोन्याचा दर ७३ हजार ५४२ रुपयांवर (प्रतितोळा, जीएसटीसह) होता. त्यात लगेचच एक हजाराची वाढ होऊन सोने ७४ हजार ३६६ रुपयांवर पोहोचले आहे. चांदीच्या दरातही तीन हजारांची वाढ होऊन चांदी ८५ हजार ३८७ वर आली आहे.

महिनाभरात सोनेदरात सात हजार रुपयांची वाढ झाली आहे. चांदी दरातही सतत वाढ होत आहे. डिसेंबर ते जानेवारी या कालावधीत सोने व चांदी दरात मोठी वाढ दिसली नाही. किरकोळ वाढ व काहीशी घटही होती. फेब्रुवारीत सोने दरात रोज ३० रुपयांची घसरण दिसली होती.

परंतु मार्चमध्ये सोने दरात सतत वाढ झाली आहे. आखातातील युद्धजन्य स्थिती, अमेरिकेतील वित्तीय संकट, तेथील बँकांकडून सुरू असलेली व्याजदरवाढ यामुळे सोने दर सतत वाढल्याचे येथील सराफा व्यावसायिकांचे म्हणणे आहे. ऐन लग्नसराईत ही दरवाढ झाल्याने ग्रामीण भागातील मंडळींचे बजेट कोलमडले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज 

Farm Loan Waiver: कर्जमाफीबाबतच्या सरकारच्या निर्णयाचे स्वागत, पण नियमित कर्जदारांनाही दिलासा मिळावा- अजित नवले

Power Theft Cases: तीन महिन्यांत २८ हजार वीजचोऱ्या पकडल्या

Pending Works: प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा : खासदार डॉ. कल्याण काळे

limate Change Hits Marine Fisheries : हवामान बदलामुळे मासेमारीचे दिवस घटले; सीएमएफआरआयच्या संचालकांनी दिली माहिती

SCROLL FOR NEXT