Cotton Market  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Market : सेलू बाजार समितीत कापूस प्रतिक्विंटल ६००० ते ७२८० रुपये

Cotton Bajarbhav : परभणी जिल्ह्यातील सेलू व मानवत या कापसाच्या प्रमुख बाजार पेठांमधील कापसाची आवक वाढली आहे.

Team Agrowon

Parbhani News : परभणी जिल्ह्यातील सेलू व मानवत या कापसाच्या प्रमुख बाजार पेठांमधील कापसाची आवक वाढली आहे. जाहीर लिलाव पद्धतीच्या कापूस खरेदीच्या दरात किंचित चढउतार होत आहेत. परंतु अजून दरात नरमाईच आहे. दरवाढीच्या अपेक्षेने जिल्ह्यातील अनेक गावांतील शेतकऱ्यांचा अजूनही कापूस घरातच आहे.

सोमवारी (ता. १९) सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला प्रतिक्विंटल किमान ६००० ते कमाल ७२८० रुपये तर सरासरी ७१८० रुपये दर मिळाले.

मागील सोमवारी (ता. १२) सेलू बाजार समितीत कापसाची ३१४८ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ६४५० ते कमाल ७१८५ रुपये तर सरासरी ७१३० रुपये दर मिळाले होते.

सेलू बाजार समितीत शुक्रवारी (ता. १६) कापसाची ३६७० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ६२०० ते कमाल ७१७० रुपये तर सरासरी ७१३० रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता. १५) कापसाची ३९७५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ५८०० ते कमाल ७०९० रुपये तर सरासरी ७०४० रुपये दर मिळाले.

मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. १६) कापसाची ४१०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ६००० ते कमाल ७१७५ रुपये तर सरासरी ७०५० रुपये दर मिळाले. शुक्रवारी (ता. १६) कापसाची ५३५० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ५८०० ते कमाल ७०९० रुपये तर सरासरी ७००० रुपये दर मिळाले.

गुरुवारी (ता. १५) कापसाची ५०५० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ५८०० ते कमाल ७१४० रुपये तर सरासरी ७००० रुपये दर मिळाले. खरिपाच्या पेरणीसाठी निविष्ठांची तजवीज करण्यासाठी अनेक शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत. दरात सुधारणा होत नाही. आणखीन घसरण होऊन नुकसान सोसण्यापेक्षा अनेक शेतकरी मिळेल त्या दरात कापूस विकून मोकळे होत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Interview with Dr. Homi Cherian: सेंद्रिय मसाला पीक उत्पादनाला प्रोत्साहन

Fake Success Story: फसव्या यशकथांचा सापळा

Tur Crop Disease: तुरीवरील वांझ रोगास कारणीभूत कोळीचे नियंत्रण

Vermicompost Production: गांडूळ खत निर्मितीतून आर्थिक स्वावलंबन

Agriculture Scheme: ट्रॅक्टरसाठी शेतकऱ्यांना १.५ लाख रुपयांपर्यंत अनुदान; लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारची योजना

SCROLL FOR NEXT