Cotton Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Market : ‘सीसीआय’कडून देशात ५०० कापूस खरेदी केंद्र

Cotton Rate : महाराष्ट्र सध्या १२० केंद्रे सुरू करण्यात आली असून, या केंद्रांवर अपेक्षित दर्जाचा कापूस आल्यास खरेदी केली जाईल अशी माहिती, भारतीय कापूस महामंडळाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक ललितकुमार गुप्ता यांनी ‘ॲग्रोवन’ला दिली.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : ‘सीसीआय’च्या माध्यमातून देशात यंदा ५०० केंद्रांच्या माध्यमातून कापूस खरेदी होणार आहे. महाराष्ट्र सध्या १२० केंद्रे सुरू करण्यात आली असून, या केंद्रांवर अपेक्षित दर्जाचा कापूस आल्यास खरेदी केली जाईल अशी माहिती, भारतीय कापूस महामंडळाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक ललितकुमार गुप्ता यांनी ‘ॲग्रोवन’ला दिली.

८ ते १२ टक्‍के ओलावा आणि लांब धागा (२९.५ ते ३०.५ मिमी) अशा दर्जाच्या कापसासाठी ७५२१ रुपयांचा दर निश्‍चित करण्यात आला आहे. धाग्याच्या लांबीनुसार (स्टेपल लेंथ) विचारात घेऊन ६६२१ ते एक्स्ट्रॉ लॉग स्टेपल (अधिक लांबीचा धागा)साठी ८७२१ रुपये असा हमीदर दिला जाणार आहे.

परंतु एक्स्ट्रॉ लाँग स्टेपल लेंथचा कापूस महाराष्ट्रात होत नाही. लाँग स्टेपल कापसाचे उत्पादन महाराष्ट्रात होते. मात्र या वर्षी पावसाची संततधार, कीड-रोगांचा प्रादुर्भाव त्यासोबत कापूस दरातील अनिश्‍चितता या कारणांमुळे गेल्या हंगामाच्या तुलनेत कापसाखालील लागवड क्षेत्रही कमी झाले.

देशाचे सरासरी कापूस लागवड क्षेत्र १३० लाख हेक्‍टर आहे. परंतु २०२३-२४ वर्षात हे क्षेत्र १२४ तर २०२४-२५ मध्ये ११३ लाख हेक्‍टर होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत लागवड क्षेत्रात घट झाल्याने देखील यंदाच्या हंगामात देशांतर्गत कापसाची उत्पादकता कमी होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. गेल्या वर्षीच्या हंगामात ३२५ लाख गाठींचे उत्पादन झाले होते.

या वर्षी ते कमी होत ३०२ लाख गाठींवर येण्याचा अंदाज कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाकडून व्यक्‍त करण्यात आला आहे. त्यातच कापूस बोंडात फुटल्यानंतर ऐन वेचणीच्या कालावधीत पाऊस बरसला.

त्यामुळे अनेक ठिकाणी कापूस भिजल्याने त्यात ओलावा अधिक आहे. सोबतच काही भागांत संततधार पावसामुळे कापसाची प्रतही खालावली आहे. त्यामुळेच यंदा सीसीआय पुरस्कृत खरेदी केंद्रावर कापसाची अत्यल्प आवक होण्याची शक्‍यता वर्तविला जात आहे.

देशात ५००, तर महाराष्ट्रात १२० कापूस खरेदी केंद्र आहेत. त्यातील ५९ मराठवाडा आणि विदर्भात ६१ केंद्र आहेत. शेतकऱ्याने एफएक्यू दर्जाचा कापूस विक्रीसाठी आणला, तर तो खरेदीची आमची तयारी आहे. बोंड फुटल्यानंतर पाऊस झाला आणि कापूस भिजला, अशा कापसात ओलावा अधिक असतो. सध्या केवळ तेलंगण राज्यातील तीन झोनमध्ये सीसीआय केंद्रांवर कापसाची आवक होत असून, ती रोज सरासरी २०० ते २५० क्‍विंटल इतकी आहे.
डॉ. ललितकुमार गुप्ता, अध्यक्ष, तथा व्यवस्थापकीय संचालक, भारतीय कापूस मंडळ (सीसीआय)
ओलावा मोजण्याकरीता गावस्तरावर मॉइश्‍चर मीटर उपलब्ध करून दिले पाहिजे. त्याआधारे शेतकऱ्यांना गावातच आपल्या कापसातील ओलाव्याचे प्रमाण कळेल. शेतकरी थेट कापूस विक्रीसाठी घेऊन जातात. परंतु ओलावा अधिक असल्याचे कळाल्यानंतर त्यांची निराशा होते. त्यामुळे मॉइश्‍चर मीटर कृषी विभागाकडून आत्मा यंत्रणेमार्फत उपलब्ध करून द्यावे. राज्यात १५ नोव्हेंबरदरम्यान कापसाची बाजारात आवक होण्याचा अंदाज आहे.
- गोविंद वैराळे, कापूस विपणन क्षेत्राचे अभ्यासक
खासगी खरेदीदारांना देखील बोली लावण्यासाठी बाजार समितीमध्ये येण्याची सक्ती करण्यात आली आहे. कापसाची लिलाव बाजार समितीचे नियंत्रणात होत असल्याने ही सारी प्रक्रिया पारदर्शी होते. एका खासगी जिनिंगचा अपवाद वगळता अद्याप बाजारात कापूस आला नाही. या मुहूर्ताच्या कापसाला ७२५० ते ७५२१ रुपयांचा दर मिळाला.
- ॲड. सुधीर कोठारी, सभापती, बाजार समिती, हिंगणघाट, वर्धा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ahilyanagar Market Update : अहिल्यानगरच्या बाजारपेठेत तेजी! रताळे, बटाट्यासह पालेभाज्यांना ग्राहकांची मोठी मागणी

Cattle Fodder Camps : पशुधनाचा जीव टांगणीला! चारा छावण्यांबाबत सरकारनं तातडीने निर्णय घ्यावा; बाळासाहेब थोरातांची मागणी

Fodder Management : दुष्काळाचे संकट! पशुधनाला वाचवण्यासाठी करा चारा-पाण्याचे असे अचूक नियोजन

Latur Gaal Upsa Parvanagi: लातूरमध्ये गाळ उपशास ऑनलाइन परवानगी

Marigold Price Crash : सणासुदीला झेंडूच्या फुलांची मातीमोल विक्री; बाजारात शेतकऱ्यांच्या कष्टाची होतेय अवहेलना!

SCROLL FOR NEXT