Dragon Fruit Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Dragon Fruit Rate : ड्रॅगन फ्रूटचे दर टिकून दररोज अंदाजे ५० टनाची होतेय विक्री; मागणी वाढली

Market Update : राज्यातील बाजारपेठेत अंदाजे ५० टन ड्रॅगन फ्रूटची विक्री होत आहे. ड्रॅगन फ्रूटचा पहिला बहार अंतिम टप्प्यात आला आहे.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Sangli News : राज्यातील बाजारपेठेत अंदाजे ५० टन ड्रॅगन फ्रूटची विक्री होत आहे. ड्रॅगन फ्रूटचा पहिला बहार अंतिम टप्प्यात आला आहे. बाजारपेठेत या फळाची मागणी वाढली असून गेल्या पंधरा दिवसांपासून दर टिकून आहेत.

त्यामुळे ड्रॅगन उत्पादकांमध्ये काहीअंशी दिलासा मिळाला आहे. ऑगस्टच्या मध्यापासून दुसरा बहार सुरू होईल. या दरम्यान, बाजारात फळांची आवक वाढणार असून दर टिकून राहतील, असा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला.

यंदा ड्रॅगन फ्रूटचा हंगाम वेळेत सुरू झाला आहे. परंतु वातावरणातील बदलामुळे पहिल्या बहारातील फळांची काढणी मागे पुढे झाली आहे. त्यामुळे बहुतांश भागातील पहिल्या बहरातील ड्रॅगन फ्रूटची काढणी आटोपली आहे.

अनेक ठिकाणी पहिल्या बहरातील काढणी सुरू आहे. पहिल्या बहरात फळांची संख्या कमी असल्याने बाजारात फारशी आवक होत नसते. त्यामुळे या वेळी बाजारात आवक कमी होती. मात्र दर अपेक्षित मिळाले. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पांढऱ्या ड्रॅगन फ्रूटला प्रति किलोस १००, तर लाल ड्रॅगन फ्रूटला १२० रुपये असा दर होता.

जुलैच्या मध्यापासून सद्यःस्थितीला मुंबई, पुणे, सांगली यासह अन्य शहरांतील बाजारपेठेत अंदाजे ड्रॅगन फ्रूटची आवक काही प्रमाणात वाढली आहे. या बाजारपेठेत दररोज ५० टन ड्रॅगन फ्रूट विक्रीसाठी दाखल होत आहेत.

गेल्या पंधरा दिवसांपासून ड्रॅगन फ्रूटचे दर टिकून आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना काही अंशी दिलासा मिळाला आहे. ड्रॅगन फ्रूटचा दुसरा बहार ऑगस्टच्या मध्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे.

या कालावधीत गणपती उत्सव असल्याने फळांना चांगली मागणी असून फळांचा चांगला उठाव होतो. यामुळे स्पर्धेतून दरही चांगले मिळतात. त्यामुळे या महिनाभरात ड्रॅगन फ्रूटचे दर टिकून राहण्याची शक्यता आहे.

दर स्थिती :

पांढरे ड्रॅगन फ्रूट : १०० रुपये प्रतिकिलो

लाल ड्रॅगन फ्रूट : १२० रुपये प्रतिकिलो

बाजारात ड्रॅगन फ्रूटची आवक वाढली असली तरी, हंगामाच्या प्रारंभापासून दर टिकून आहेत. पहिला बहार अंतिम टप्प्यात आला आहे. ऑगस्टमध्ये फळांची मागणी वाढून दरही चांगले मिळतील, अशी आशा आहे.
संभाजी कोडग, ड्रॅगन फ्रूट उत्पादक, आवंढी, ता. जत, जि. सांगली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT