Yellow Peas  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Yellow Peas Import : पिवळा वाटाण्यावर २०० रुपये किमान आयात मूल्य; आयातीवर ५० टक्के शुल्कही लागू

Yellow Peas Market Rate : पिवळा वाटाण्याची शुल्क मुक्त आयातीचा कालावधी २८ फेब्रुवारीला संपला. त्यामुळे आजपासून पिवळा वाटाणा आयातीवर ५० टक्के शुल्क लागू झाले. तसेच आयातीवर २०० रुपये किलो किमान आयात मूल्य असेल.

अनिल जाधव

Pune News : पिवळा वाटाण्याची शुल्क मुक्त आयातीचा कालावधी २८ फेब्रुवारीला संपला. त्यामुळे आजपासून पिवळा वाटाणा आयातीवर ५० टक्के शुल्क लागू झाले. तसेच आयातीवर २०० रुपये किलो किमान आयात मूल्य असेल.

शिवाय केवल कोलकाता बंदरावरच पिवळा वाटाणा आयात होणार आहे. सरकारच्या निर्णयामुळे हरभरा आणि तुरीच्या बाजाराला आधार मिळू शकतो. पण जास्त दर वाढल्यास सरकार पुन्हा आयातीविषयी धोरण बदलू शकते, अशी भीतीही बाजारात व्यक्त केली जात आहे.

देशात २०२३ मधील दुष्काळी परिस्थितीमुळे कडधान्याचे उत्पादन कमी झाले होते. परिणामी देशात काहीशी टंचाई निर्माण होऊन भावात सुधारणा झाली होती. कडधान्याचे भाव कमी करण्यासाठी सरकारने डिसेंबर २०२३ मध्ये पिवळा वाटाणा आयात खुली केली होती.

आयातीवरील सर्व शुल्क काढून टाकले. तसेच किमान आयात मूल्याची अटही काढली होती. त्यानंतर पिवळा वाटाण्याच्या मुक्त आयातीला तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. शेवटची मुदतवाढ २८ फेब्रुवारीपर्यंत होती.

मुक्त आयातीची मुदत २८ फेब्रुवारीला संपल्यानंतरही सरकारकडून कोणतेही नोटीफिकेशन आले नाही. त्यामुळे आयात मुक्त करण्याआधी जी बंधने होती ती आजपासून लागू झाली. देशात हरभरा, मसूर, तूर, मूग आणि उडीद या महत्वाच्या कडधान्याचे बाजारभाव हमीभावाच्या खाली आले आहेत.

राज्यासाठी महत्वाच्या असलेल्या तूर आणि हरभऱ्याचे बाजारभावही हमीभावाच्या खाली आले आहेत. मागील दोन महिन्यांपासून भावातील घसरण सुरुच आहे. मागील आठवडाभरापासून तूर ७ हजारांवर तर हरभरा सरासरी ५ हजार २०० रुपायांवर आला होता. त्यामुळे सरकारने पिवळा वाटाण्याच्या शुल्कमुक्त आयातीला मुदतवाढ देऊ नये, अशी मागणी शेतकरी आणि उद्योगांकडून केली जात होती.

५० टक्के आयात शुल्क

सरकारने २८ फेब्रुवारीपर्यंत पिवळा वाटाणा आयातीविषयी कोणताही धोरणात्मक निर्णय घेतला नाही. त्यामुळे पिवळा वाटाणा आयातीवर आजपासून (ता.१) ५० टक्के आयातशुल्क लागू झाले आहे. म्हणजेच आयात होणाऱ्या मालावर एकूण मुल्याच्या ५० टक्के शुल्क लावले जाईल. त्यामुळे आयात होणारा वाटाणा महाग होईल. तसेच पिवळा वाटाणा केवळ कोलकाता बंदरावर आयात करता येईल.

२०० रुपये किलो किमान आयात मूल्य

पिवळा वाटाणा आयातीवर केवळ ५० टक्के आयात शुल्क लागू झाले नाही. तर पिवळा वाटाण्याची आयात आता २०० रुपये किलोच्या खाली होणार नाही. कारण पिवळा वाटाणा आयातीवर २०० रुपये किमान आयात मूल्य आहे. यापेक्षा कमी दरात पिवळा वाटाणा आयात करता येणार नाही. त्यामुळे आतापर्यंत होणारी स्वस्त आयात होणार नाही. त्याचा आधार आपल्या स्थानिक बाजाराला मिळेल.

हरभरा दरात सुधारणा,पण बाजारात संभ्रव

पिवळा वाटाणा आयातीवर बंधने लागू झाल्यानंतर आज देशातील बाजारात हरभरा दरात क्विंटलमागे ५० रुपयांची सुधारणा झाली. हेच धोरण सरकारने कायम ठेवल्यास दराला चांगला आधार मिळू शकतो. पण सरकार जोपर्यंत धोरण स्पष्ट करत नाही तोपर्यंत बाजारात संभ्रमाची स्थिती राहणार आहे. आजही बाजारात सरकार आयातीच्या धोरणात बदल करू शकते, अशी चर्चा आहे. सरकारने धोरण स्पष्ट केल्यानंतर बाजारात त्यानुसार घडामोडी घडतील, असे काही अभ्यासकांनी सांगितले. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT