Sugar Export  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Sugar Export : कारखान्यांकडून निर्यातीसाठी ३६ लाख टन साखर रवाना

भारत सरकारने यंदा केवळ ६० लाख टन साखर निर्यातीचा कोटा जाहीर केला आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर तेजीत आहेत. भारतीय साखरेलाही मागणी वाढली आहे.

Team Agrowon

Sugar Market News पुणे ः भारत सरकारने यंदा केवळ ६० लाख टन साखर निर्यातीचा कोटा (Sugar Export Quota) जाहीर केला आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर (Sugar Rate) तेजीत आहेत. भारतीय साखरेलाही मागणी (Sugar Demand) वाढली आहे.

त्यामुळे देशातील साखर कारखान्यांनी जवळपास ३६ लाख टन साखर निर्यातीसाठी पाठवली आहे, अशी माहिती ऑल इंडिया शुगर ट्रेडर्स असोसिएशनने (All India Sugar Traders Association) दिली.

जागतिक बाजारात सध्या साखरेचे दर तेजीत आहेत. यंदा युरोपमध्ये साखर उत्पाद कमी राहण्याचा अंदाज आहे. यंदा भारतात साखर उत्पादन कमी राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे देशातून साखर निर्यातही कमी राहील, असा अंदाज निर्यातदार व्यक्त करत आहेत.

यंदा केंद्र सरकारने केवळ ६० लाख टन साखर निर्यातीला परवानगी दिली. याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारातील साखर दरावर झाला.

ब्राझीलची साखर अद्याप बाजारात आली नाही. त्यामुळे साखरेच्या दराला आणखी आधार मिळाला. तसेच भारतीय साखरेला मागणीही मजबूत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात दर तेजीत आहेत आणि मागणीही चांगली असल्याने देशातील साखर कारखान्यांनी निर्यातीसाठी गतीने हालचाली सुरू केल्या आहेत.

देशातील कारखान्यांनी ३५ लाख ८३ हजार टन साखर निर्याताठी बंदरे आणि विशेष आर्थिक क्षेत्रातील रिफायनरिंकडे पाठवली आहे, अशी माहिती ऑल इंडिया शुगर ट्रेडर्स असोसिएशन दिली.

म्हणजेच सरकारने परवानगी दिलेल्या एकूण कोट्याच्या निम्म्यापेक्षा अधिक साखर निर्यातीच्या प्रक्रियेत आहे.

शुगर ट्रेडर्स असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, कारखान्यांनी निर्यातीसाठी पाठविलेल्या एकूण ३५ लाख ८३ हजार टन साखरेपैकी २७ लाख ८३ हजार टन साखर प्रत्यक्ष निर्यात झाली.

तर ३ लाख ७० हजार टन साखर ‘एसईझेड’मधील रिफायनरिंना देण्यात आली. तसेच ४ लाख २४ हजार टन साखर निर्यातासाठी जहाजांमध्ये चढविण्याचे काम सुरू आहे.

बांगलादेश सर्वांत मोठा खरेदीदार

ऑल इंडिया शुगर ट्रेडर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रफुल्ल विठलानी यांनी दिलेल्या माहितीनुसार भारताकडून बांगलादेश आणि इंडोनेशियाने सर्वाधिक साखर खेरदी केली. बांगलादेशने २ लाख ७० हजार टन भारतीय साखर आयात केली.

इतर देशांना निर्यात

इंडोनेशियाने २ लाख ६१ हजार टन साखरेची खरेदी केली. जिबुतीने २ लाख ४७ हजार टन, सोमालिया २ लाख ४६ हजार टन, यूएई २ लाख ६ हजार टन, सुदान १ लाख ६६ हजार टन, सौदी अरेबिया १ लाख ६५ हजार टन आणि मलेशिया, श्रीलंका आणि चीनने १ लाख १२ हजार टन साखर भारताकडून आयात केली. तसेच इराण, अफगाणिस्तान आणि कॅमेरून या देशांनीही भारताकडून साखर आयात केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orange Fruit Drop: शुक्लकाष्ठ फळगळीचे!

Pimpalapur Farmer Death Assistance: पिंपळापूर येथील आत्महत्याग्रस्त कुटुंबाची प्रशासनाकडून भेट; शासकीय योजनांचा लाभ देण्याची कार्यवाही

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT