Team Agrowon
भारत सरकारने यंदा केवळ ६० लाख टन साखर निर्यातीचा कोटा जाहीर केला आहे.
सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर तेजीत आहेत. भारतीय साखरेलाही मागणी वाढली आहे.
त्यामुळे देशातील साखर कारखान्यांनी जवळपास ३६ लाख टन साखर निर्यातीसाठी पाठवली आहे, अशी माहिती ऑल इंडिया शुगर ट्रेडर्स असोसिएशनने दिली.
जागतिक बाजारात सध्या साखरेचे दर तेजीत आहेत. यंदा युरोपमध्ये साखर उत्पाद कमी राहण्याचा अंदाज आहे.
यंदा भारतात साखर उत्पादन कमी राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे देशातून साखर निर्यातही कमी राहील, असा अंदाज निर्यातदार व्यक्त करत आहेत.ब्राझीलची साखर अद्याप बाजारात आली नाही. त्यामुळे साखरेच्या दराला आणखी आधार मिळाला. तसंच भारतीय साखरेला मागणीही मजबूत आहे.
ब्राझीलची साखर अद्याप बाजारात आली नाही. त्यामुळे साखरेच्या दराला आणखी आधार मिळाला. तसंच भारतीय साखरेला मागणीही मजबूत आहे.