Silk Yarn Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Silk Yarn Production : मराठवाड्यात ३४२ टन रेशीम सूत उत्पादन

Silk Cocoon Production : मराठवाड्यात २०२२ २३ मध्ये उत्पादित २४०३ रेशीम कोषापासून अंदाजे ३४२ टन सुताचे उत्पादन झाल्याची माहिती रेशीम विभागाच्या सूत्रांनी दिली.

संतोष मुंढे ः ॲग्रोवन वृत्तसेवा

Chhatrapati Sambhajinagar News : मराठवाड्यात २०२२ २३ मध्ये उत्पादित २४०३ रेशीम कोषापासून अंदाजे ३४२ टन सुताचे उत्पादन झाल्याची माहिती रेशीम विभागाच्या सूत्रांनी दिली.

मराठवाड्यात उत्तम दर्जाचे रेशीम कोष उत्पादन केले जाते. या कोषांना राज्यातील बाजारपेठांसह इतर राज्यांतील बाजारपेठांमध्येही मोठी मागणी असते.

याशिवाय उत्पादित कोषापासून धाग्याची निर्मिती करणारे मोजके प्रक्रिया उद्योगही मराठवाड्यासह राज्यात कार्यान्वित आहेत. २०२२-२३ मध्ये मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात ३६ लाख १६ हजार अंडीपुंज पुरवठा करण्यात आला होता. या अंडीपुंजांपासून २४०३ टन रेशीम कोषांचे उत्पादन मराठवाड्यात झाले. या कोषांपासून अंदाजे ३४२.५२ टन सुताचे उत्पादन झाले.

मराठवाड्यात जालना जिल्ह्यात दोन त्यापैकी एक अलीकडच्या काळातील, लातूर जिल्ह्यात अलीकडच्या काळात एक ऑटोमॅटिक रेलिंग युनिट कार्यरत आहे. याशिवाय पूर्ण येथे एक ऑटोमॅटिक रेलिंग युनिट मंजूर आहे. राज्यात भंडारा, सांगली येथे प्रत्येकी एक ऑटोमॅटिक रेलिंग युनिट कार्यान्वित आहे.

याशिवाय छत्रपती संभाजीनगर व पूर्णा येथे प्रत्येकी एक मल्टी एंड युनिटही कार्यान्वित आहे. बीड जिल्ह्यात दोन मल्टी एंड युनिट कार्यान्वित आहेत. या मल्टी एंड युनिटची प्रतिदिन १० किलो सूत उत्पादनाची क्षमता आहे. तर ऑटोमॅटिक रेलिंग युनिटची एका शिफ्टची क्षमता किमान ४० किलो प्रतिदिन सूत उत्पादनाची आहे.

जिल्हानिहाय रेशीम कोष व सूत उत्पादन (टनांमध्ये)

जिल्हा..... कोष उत्पादन....सूत उत्पादन (अंदाजे)

छत्रपती संभाजीनगर... १८४.२१..... २६.३१

जालना........... २३९.८४...... ३४.२६

परभणी.......... १४७.३९.... २१.०५

हिंगोली............५३.३१...... ७.६१

नांदेड............. ९९.३५..... १४.१९

लातूर............. ११८.६९...... १६.९५

धाराशिव............ ४३६.३२ ......६१.४७

बीड.............. ११२४.८२ .....१६०.६८

रेशीम कोष उत्पादन व जालना बाजारपेठेतील खरेदी पाहता आणखी काही ऑटोमॅटिक रेलिंग युनिट कार्यान्वित करण्यास वाव असल्याचे दिसते.
- अजय मोहिते, जिल्हा रेशीम विकास अधिकारी, जालना

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT