Papaya Rate  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Papaya Rate : पपईदर परवडेना; किलोला तीन ते पाच रुपये

Papaya Market : खानदेशात पपईची आवक वाढत असतानाच दरही सतत कमी झाले आहेत.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : खानदेशात पपईची आवक वाढत असतानाच दरही सतत कमी झाले आहेत. सध्या तीन ते पाच रुपये प्रतिकिलोचा दर जागेवर किंवा शिवार खरेदीत शेतकऱ्यांना मिळत आहे. हे दर मात्र परवडत नसल्याचा मुद्दा शेतकरी उपस्थित करीत आहेत.

पपई दरांचा तिढा मागील ४५ ते ५० दिवसांत तीन वेळेस तयार झाला आहे. दिवाळीपूर्वी पपईदर जागेवर ३० ते ३५ रुपये प्रतिकिलो, असा मिळाला होता. परंतु मागील ४५ ते ५० दिवसांत पपईच्या दरात सतत घट झाली आहे. मध्यंतरी २५ ते ३० रुपये प्रतिकिलोचा दर होता. त्यानंतर दर १८ ते १५ रुपये प्रतिकिलो, असे झाले.

नोव्हेंबरमध्ये पपईला सरासरी २० रुपये प्रतिकिलोचा दर जागेवर शेतकऱ्यांना मिळाला. परंतु या महिन्यात दर १५, १०, नऊ, आठ, पाच व तीन रुपये प्रतिकिलो, असे खाली आले. दरात सतत घसरण झाल्याने शेतकऱ्यांची मोठी वित्तीय हानी या महिन्यात झाली आहे.

पपईदराचा तिढा या आठवड्यातही तयार झाला होता. यात शहादा (जि. नंदुरबार) बाजार समितीने खरेदीदार व शेतकरी आदींची बैठक घेतली व पाच रुपये प्रतिकिलोचा दर जाहीर केला. परंतु खरेदीदार तीन ते चार रुपये प्रतिकिलो या दरात खरेदी करीत आहेत.

तीन ते चार रुपये प्रतिकिलोचा दर शेतकऱ्यांना परवडत नसल्याने नंदुरबार, धुळे जिल्ह्यांत काही शेतकरी पीक मोडून त्यात रब्बी पिके किंवा इतर फळ पिकांची लागवड करण्याचे नियोजन करीत आहेत. खानदेशात पपईची सर्वाधिक ५४०० हेक्टर एवढी लागवड नंदुरबार जिल्ह्यात झाली आहे.

एकट्या शहादा तालुक्यात सुमारे पाच हजार हेक्टरवर पपई पीक आहे. जळगाव जिल्ह्यात सुमारे पावणेदोन हजार हेक्टर आणि धुळ्यातही सुमारे १२०० हेक्टरवर पपई पीक आहे. पपई दरांची तक्रार धुळे व नंदुरबारात अधिक येत आहे. जळगाव जिल्ह्यातही कमी दरांची तक्रार आहे. परंतु बाजार समित्या यासंबंधी ठोस निर्णय घेऊन कारवाई करीत नसल्याचाही मुद्दा आहे.

आवक वाढतीच

खानदेशात सध्या पपईची प्रतिदिन ६० ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) एवढी आवक होत आहे. पपईची पाठवणूक उत्तरेकडे म्हणजेच पंजाब, राजस्थान, दिल्ली, हरियाना आदी भागांत केली जात आहे. तसेच स्थानिक भागातही पपईला उठाव आहे. आवकेत मागील १० दिवसांत सुमारे सात ट्रकने वाढ झाली आहे. जशी आवक वाढत आहे, तसे दर खरेदीदार सतत कमी देत असल्याचे पपई उत्पादकांचे म्हणणे आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangola Water Crisis: सांगोल्यातील बंधारे कोरडे; जलसंकट वाढले

Farmer Compensation: बाधित शेतकऱ्यांच्या मोबदल्यासाठी खलबते

Fruit Drop Subsidy Issue: संत्रा, मोसंबी, फळगळ अनुदानामध्ये गोंधळ

Fund Delay: स्थगितीला वाव देण्यासाठी निधी वर्ग करण्यास उशीर?

Maharajasva Campaign: महाराजस्व अभियान यशस्वी करण्यासाठी समन्वयाने काम करा: जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

SCROLL FOR NEXT