Betel Leaves  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Betel Leaves Market : खाऊच्या पानांच्या दरात २५ टक्क्यांनी सुधारणा

Betel Leave Rate : पानमळ्यांची उतरण झाल्यानंतर उन्हाळी पावसाने दडी मारली. याचा परिणाम पानांच्या फुटव्यावर झाला असून खाऊच्या पानांच्या उत्पादनात घट झाली आहे.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Sangli News : पानमळ्यांची उतरण झाल्यानंतर उन्हाळी पावसाने दडी मारली. याचा परिणाम पानांच्या फुटव्यावर झाला असून खाऊच्या पानांच्या उत्पादनात घट झाली आहे. बाजारात पानांची आवक कमी असून मागणी वाढली आहे.

यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा २५ टक्क्यांनी दरात वाढ झाली आहे. त्यामुळे पान उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सांगली जिल्ह्यातील मिरज पूर्व भाग हा भाग पान मळ्यांसाठी प्रसिद्ध आहे. या भागातील खाऊची पाने पंढरपूर, सोलापूर, कोकण यासह अन्य ठिकाणी विक्री होतात. मात्र गेल्या तीन वर्षांपासून अति पावसामुळे पान उत्पादक शेतकरी संकटात होते.

त्यातच बाजारपेठेत पानांची आवक वाढली, मागणी कमी झाली यामुळे पानांचे दर कमी होते. परिणामी उत्पादन खर्चही मिळणे मुश्कील झाले. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पानमळ्यांची शेती कमी केले असल्याचे चित्र आहे.

यंदा जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या तीन महिन्यांत नागवेलींची उतरण केली. त्यानंतर उन्हाळी पाऊस झाला नाही. त्यातच मॉन्सून पाऊस वेळेत सुरू झाला नाही. या साऱ्याचा परिणाम फुटव्यावर झाला आहे. त्यामुळे वेलींना पानांची संख्या कमी आहे. त्यामुळे उत्पादनात ४० टक्क्यांनी घट झाली आहे. यंदाच्या हंगामात पानांची विक्री सुरू झाली आहे. बाजारात पानांची आवक कमी असून मागणी अधिक आहे.

त्यामुळे गेल्या आठवड्यापासून दरात सुधारणा होऊ लागली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत पानांच्या दरात यंदा २५ टक्क्यांनी सुधारणा झाली आहे. दरम्यान, अधिकमास, गणपती, दसरा, दिवाळी या सणांच्या निमित्ताने पानांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यामुळे या दरम्यान, पानांच्या दरात आणखी सुधारणा होईल, अशी शक्यता पान उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

पानांचे दर

फाफडा ः ४००० ते १२ हजार रुपये (एक डाग)

कळी ः २००० ते ८०००

(एका डागात १२ हजार पाने)

यंदा वेलींची उतरण केल्यापासून पाऊस नाही. त्यामुळे वेलींना फुटवा कमी आहे. त्यातच उत्पादन घटले असून बाजारात मागणी अधिक आहे. त्यामुळे चांगले दर मिळत आहेत.
- भाऊसो नागरगोजे, पान उत्पादक शेतकरी, नरवाड, ता. मिरज.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Re-Sowing: दुबार पेरणीसाठी सरकार शेतकऱ्यांना मदत देणार, राज्य सरकारचा निर्णय, मंत्री बावनकुळेंची माहिती

Pandharpur Cycle Wari: पंढरपुरात रंगली ४ हजार सायकलस्वारांची आगळीवेगळी ‘सायकल वारी’

Kharif Sowing Delayed: पावसाच्या खंडामुळे खरिपाच्या पेरण्यांना ‘ब्रेक’

Farm Loan Waiver Scheme: लाखभर शेतकऱ्यांचा कोरा होणार ७/१२

Re Sowing Kharif: दुबार पेरणी करताना कोणती काळजी घ्यावी?

SCROLL FOR NEXT