Sugar Production Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Sugar Production : देशात २२८ लाख टन साखर उत्पादन; १७ कारखान्यांचा हंगाम संपला

देशाने साखर उत्पादनाचा २२५ लाख टनांचा टप्पा पार केला आहे. फेब्रुवारी मध्यापर्यंत ५०५ साखर कारखान्यांनी २२८ लाख टन साखर उत्पादित केली आहे.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Sugar Season कोल्हापूर ः देशाने साखर उत्पादनाचा (Sugar Production) २२५ लाख टनांचा टप्पा पार केला आहे. फेब्रुवारी मध्यापर्यंत ५०५ साखर कारखान्यांनी २२८ लाख टन साखर उत्पादित केली आहे. या कालावधीतही महाराष्ट्राने उत्पादनात (Maharashtra Sugar Production) निर्विवाद आघाडी घेतली आहे.

८५ लाख टन साखर उत्पादन करीत महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे. उत्तर प्रदेशात ६१ लाख, तर कर्नाटकात ४५ लाख टन साखर या कालावधीत तयार झाली. देशातील १७ साखर कारखान्यांनी आपला हंगाम संपवला आहे.

गेल्या वर्षीपेक्षा जादा साखरनिर्मिती होईल या अंदाजाने देशातील साखर कारखाने सुरू झाले खरे, पण हंगाम मध्यावर येताच हे अंदाज चुकू लागले. उसाची तोडणी गतीने होत असली तरी एकरी उत्पादनात मात्र ५ ते १० टक्क्यांनी घट येऊ लागली.

ती तात्पुरती राहील, असे वाटत असताना कारखाने बंद होण्यास सुरुवात झाली तरी घट कमी झाली नाही. अखेर आता कारखाने बंद होण्यास सुरुवात झाली आहे.

साखर उत्पादनात आघाडीवर असणाऱ्या पहिल्या तिन्ही राज्यांमध्ये म्हणजे महाराष्ट्र, उत्तर प्रदेश व कर्नाटकातही हीच परिस्थिती राहिली. यामुळे अंतिम टप्प्यात साखर उत्पादनाचा वेग मंदावला.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा केवळ ६ लाख टनांनी उत्पादन जास्त आहे. जसा हंगाम पुढे जाईल तसा हा फरक कमी होऊन उत्पादनात घट येईल, असा अंदाज साखर उद्योगातील सूत्रांचा आहे. विविध संस्थानीही याला दुजोरा दिला आहे.

महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटकमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत साखर जादा तयार झाली असली, तरी तुलनेमध्ये केवळ एक ते दीड लाख टनांचा फरक आहे. हा फरक नजीकच्या पंधरवड्यात कमी होइल. कदाचित, मार्चमध्ये गेल्या हंगामाच्या तुलनेत उत्पादन कमीही झालेले असेल असे चित्र आहे.

ऊस तोडणीची गती मंदावली

गेल्या पंधरवड्यापासून उस तोडणीची गती मंदावली आहे. मजुरांच्या कमी संख्येमुळे शेवटच्या टप्प्यातही जेवढी गती अपेक्षित होती तेवढी झाली नाही. गेल्या वर्षी जूनपर्यंत साखर कारखाने सुरू होते.

विशेष करून महाराष्ट्रतील साखर हंगाम जूनला संपला. या कालावधीपर्यंत साखर उत्पादन सुरूच होते. यंदा मात्र ही परिस्थिती राहण्याची शक्यता नाही. राज्यातील कारखाने यंदा मेपर्यंत फारसे चालणार नाहीत, अशी स्थिती आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pune Rainfall: पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला

MKCL Investment: ‘एमकेसीएल’ने सरकारमध्ये गुंतवणूक करावी; शरद पवार यांची अपेक्षा

Market License Cancellation: पणन संचालकांचा खासगी बाजारांवर कारवाईचा धडाका; ‘रामेश्वर, ‘कसमादे’, ‘जय गजानन’ बाजारांचे परवाने रद्द

Indigenous Livestock Breeds: सोळा नव्या देशी पशुजातींना मान्यता

Agro-Service Federation's Protest: प्रस्तावित आकृतिबंधाविरोधात कृषी सेवा महासंघाचे आंदोलन

SCROLL FOR NEXT