Mango Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Mango Market : रत्नागिरी, सिंधुदुर्गमधून १४ हजार हापूस पेट्या वाशीत

Hapus Mango Rate : रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हापूसची आवक दिवसेंदिवस वाढू लागली आहे. दिवसा उन्हाचा ताप जाणवत आहे.

राजेश कळंबटे

Ratnagiri News : रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हापूसची आवक दिवसेंदिवस वाढू लागली आहे. दिवसा उन्हाचा ताप जाणवत आहे. त्यामुळे आंबा काढणीयोग्य झालेला आहे. दोन्ही जिल्ह्यांतून दिवसाला १४ हजार पेट्या वाशी बाजार समितीमध्ये पाठविल्या जात आहेत. आवक स्थिर असल्यामुळे पेटीचे दर २ हजारांपासून ६ हजार रुपयांपर्यंत आहेत. पहिल्या टप्प्यातील आंबा मार्च अखेरपर्यंत मिळेल, असा अंदाज वर्तविला जात आहे.

हापूसला मागणी वाढत असल्यामुळे लवकरात लवकर फळ यावे आणि त्याला चांगला दर मिळावा, यासाठी बागायतदारांचे प्रयत्न असतात. त्यासाठी बागायतीचे योग्य नियोजन केले जाते. यंदा रत्नागिरीमधून फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून आंबा पेट्या पाठविण्यास आरंभ झाला.

पहिल्या पंधरवड्यात पेट्यांची संख्या कमी होती; मात्र त्यानंतर त्यात वाढ होऊ लागली. मार्चच्या सुरवातीला उन्हाचा कडाका जाणवू लागल्यानंतर फळे तयार होण्याचा वेगही वाढला. परिणामी आंबा काढण्यासाठी बागायतदारांची कसरत सुरू झाली.

पहिल्या टप्प्यातील उत्पादन मार्चअखेरपर्यंत राहील, असे बागायतदारांचे म्हणणे आहे. एप्रिल महिन्यात काही दिवस पेट्यांची संख्या कमी राहील. पुन्हा काही दिवस आंबा मिळेल, पण ते प्रमाणही तुलनेत कमी राहील. गेल्या काही दिवसांत पुन्हा झाडांना मोहोर येऊ लागला आहे. त्यामधून प्रत्यक्ष उत्पादन मे महिन्याच्या अखेरीस मिळेल, असा बागायतदारांचा अंदाज आहे.

सध्या कोकणातून येणाऱ्या हापूसची आवक वाढत आहे. दोन्ही जिल्ह्यांतून समान पेट्या येत आहेत. आखाती देशांमधील मागणी वाढल्यामुळे स्थानिक बाजारातील हापूसचे दर स्थिर आहेत. आवक वाजेपर्यंत बाजारातील दर स्थिर राहतील, असा अंदाज आहे.
- संजय पानसरे, संचालक, वाशी बाजार समिती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT