Tur Market  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Tur Procurement : हमीभावाने तूर विक्रीसाठी साडेतेराशे शेतकऱ्यांची नोंदणी

Tur Market : यंदा हमीभावाने तूर खरेदीसाठी परभणी जिल्ह्यासाठी प्रतिहेक्टरी १०.५० क्विंटल उत्पादकता निश्‍चित करण्यात आली असून, १० हजार २२५ टन तूर खरेदीचे उद्दिष्ट आहे.

Team Agrowon

Parbhani News : केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत (पिएसएस) खरीप हंगाम २०२४-२५ मधील तूर हमीभावाने (प्रतिक्विंटल ७५५०रुपये) विक्रीसाठी पणन महासंघ अंतर्गत परभणी जिल्ह्यातील १८ आणि हिंगोली जिल्ह्यातील १५ मिळून एकूण ३३ केंद्रांपैकी शुक्रवार (ता. २८) पर्यंत १९ केंद्रांवर १ हजार ३५२ शेतकऱ्यांनी ऑनलाइन केली आहे. परंतु तूर खरेदी सुरू झालेली नाही, अशी माहिती जिल्हा पणन अधिकारी कुंडलिक शेवाळे यांनी दिली.

केंद्रिय नोडल एजन्सी नाफेडच्या वतीने हमीभावाने तूर खरेदी करिता परभणी जिल्ह्यात राज्य सहकरी पणन महासंघ अंतर्गतच्या परभणी, पेडगाव, झरी, वरपुड, जिंतूर, बोरी, भोगाव, सेलू, मानवत, रूढीपाटी, पाथरी, देवनांदरा, सोनपेठ, पालम, चाटोरी, पूर्णा, एरंडेश्‍वर, ताडकळस या १८ केंद्रापैकी १० केंद्रावर ५८९ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे.

यंदा हमीभावाने तूर खरेदीसाठी परभणी जिल्ह्यासाठी प्रतिहेक्टरी १०.५० क्विंटल उत्पादकता निश्‍चित करण्यात आली असून, १० हजार २२५ टन तूर खरेदीचे उद्दिष्ट आहे. केंद्रिय नोडल एजन्सी एनसीसीएफच्या वतीने तूर खरेदी करिता हिंगोली जिल्ह्यात राज्य सहकारी पणन महासंघ अंतर्गंत हिंगोली, कन्हेरगाव, कळमनुरी, वारंगा, वसमत, जवळा बाजार, येळेगाव, सेनगाव, साखरा, शिवणी खुर्द, फाळेगाव, नागासिनगी, आडगाव, उमरा, पुसेगाव या १५ केंद्रापैकी ९ केंद्रांवर ७६३ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे.

हिंगोली जिल्ह्यासाठी प्रतिहेक्टरी ११.५० क्विंटल उत्पादकता निश्‍चित करण्यात आली असून ८ हजार ८६५ टन तूर खरेदीचे उद्दिष्ट आहे. ऑनलाइन नोंदणीकरिता शेतकऱ्यांनी सोबत २०२४-२५ मधील ७-१२ उताऱ्यावर ऑनलाइन पिकपेरा नोंद असावी, आधारकार्ड झेरॉक्स, बँक पासबुकची झेरॉक्स आणावी.

बँक पासबुकवर शेतकऱ्यांचे नाव, खाते क्रमांक, आयएफएससी कोड स्पष्ट असावा. जनधन बँक खाते क्रमांक किंवा पतसंस्थेतील खाते क्रमांक देऊ नये. संबंधित तालुक्यातील केंद्राच्या ठिकाणी शेतकऱ्यांनी नोंदणी करावी, असे आवाहन कुंडलिक शेवाळे यांनी केले आहे.

परभणी-हिंगोली जिल्हे हमीभावाने तूर विक्रीसाठी ऑनलाइन शेतकरी नोंदणी स्थिती

केंद्र ऑनलाईन शेतकरी नोंदणी

बोरी १५२

सेलू १९७

पेडगाव ९०

रुढीपाटी ५२

देवनांदरा ६२

सोनपेठ १

पालम ६

चाटोरी ८

पूर्णा १२

एरंडेश्वर ९

हिंगोली २६१

फाळेगाव ४४३

कळमनुरी २३

वसमत ५

जवळाबाजार १

साखरा ११

नागासिनगी १०

उमरा २

पुसेगाव ७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT