कृमीजन्य अाजाराची लक्षणे
कृमीजन्य अाजाराची लक्षणे 
महिला

कृमीजन्य अाजाराची लक्षणे

डॉ. विनिता कुलकर्णी

कोणत्याही अाजारात पथ्यपालन महत्त्वाचे असतेच. काही अाजारांची लहानसहान लक्षणे असतात. दुर्लक्ष न करता ती वेळीच अोळखावी लागतात. साधारणपणे लहान मुलांनाच जंताचा त्रास होतो, असा समज असतो. पण मोठ्यांमध्येही हा त्रास असू शकतो.

ल हानपणी कधी पोट दुखले, भूक कमी झाली किंवा वजन कमी झाले तर जंत झाले असतील असे प्राथमिक निदान केले जात असे. त्यात तथ्य होते. सामान्यतः सहज अाणि वैकारिक असे दोन प्रकारचे कृमी असतात. त्यापैकी जे शरीराच्या स्वास्थ्यासाठी मदत करतात त्यांना सहज कृमी म्हणतात. ज्यांच्यामुळे विविध आजार निर्माण होतात त्यांना वैकारिक कृमी म्हणतात.  

कारणे

  • फार गोड पदार्थ खाणे हे महत्त्वाचे कारण ठरते. गुळापासून बनवलेले पदार्थ अति प्रमाणात खाणे, शिळे पदार्थ, आंबट ताक, मांसाहार (विशेषतः मासे), माती खाण्याची सवय, दुपारी भरपूर झोपणे, व्यायाम न करणे या विविध कारणांनी जंत निर्माण होतात.
  • किडलेल्या न निवडलेल्या, न स्वच्छ केलेल्या पालेभाज्या हे सुद्धा कृमींचे महत्त्वाचे कारण आहे. त्यासाठी पावसाळ्यात पालेभाज्या खाताना विशेष काळजी घ्यावी.
  • लक्षणे

  • प्रत्येकातील लक्षणे भिन्न असतात. तापाची कणकण, मळमळणे, भूक कमी होणे, वजन कमी होणे, पोट बिघडणे, शाैचाच्या ठिकाणी (गुद्‌पाशी) खाज येणे, त्वचेवर पांढरे डाग पडणे, त्वचा निस्तेज बनणे अशी सामान्य लक्षणे कृमींची असतात.
  • आयुर्वेदानुसार कफप्रधान, रक्तप्रधान, मलज असे पोटप्रकार असतात. त्यापैकी दूध, मासे, गूळ यामुळे कफज कृमी निर्माण होतात. ज्यामुळे तोंडाला पाणी सुटणे, उलटी, तोंडाला चव नसणे अशी लक्षणे निर्माण होतात.
  • लहान मुलांत माती खाणे कारणीभूत ठरते. त्यामुळे शाैचाच्या ठिकाणी खाज, खा-खा होणे, वजन कमी होणे, तोंडावर डाग येणे अशी लक्षणे दिसून येतात. रक्तज कृमी त्वचेवर खाज निर्माण करतात.
  • काहींमध्ये पापण्या, भुवयांचे केसही गळू पडतात. पुरीषज कृमीमुळे ढेकर येणे, पोटदुखी, जुलाब, भूक कमी होणे या लक्षणांनी रुग्ण बेजार होतो. या सर्वांसाठी वेळेवर चिकित्सा करून घेणे आवश्‍यक असते.
  • उपचार

  • बाह्यकृमींमुळे केस गळती, उवा लिखा झाल्यास सीताफळाच्या बियांच्या चूर्णाचा चांगला फायदा होतो. ही पावडर केसांच्या मुळाशी लावावी. केसांसाठी योग्य शिकेकाईचा उपयोग करावा.
  • त्वचेवर खाज असल्यास करंज तेल कापूर मिसळून लावावे किंवा खोबरेल तेलात कापूर मिसळून ते तेल लावावे. निंब तेल पारिभद्र तेल लावावे. याचबरोबर आरोग्यवर्धिनीच्या गोळ्या योग्य मात्रेत पोटातून घ्याव्यात.
  • अन्य आयुर्वेदीय औषधांचाही तज्ज्ञांना विचारून उपयोग करावा. पोटातील कृमी कमी करण्यासाठी वीडांगरिष्ट जेवणानंतर घेतल्यास फायदा होतो.
  • वावडिंग घालून उकळलेले पाणी प्यायल्यासही फायदा होतो.
  • कृमीकुठार वटी, विडंगासव या औषधांचाही कृमिनाशक म्हणून फायदा होतो. दर महिन्याला ही कृमिनाशक औषधे सुरवातीला घेतली तर जुनाट त्रास कमी होतो.  
  • घेण्याची काळजी

  • पाणी उकळून प्यावे, मुलांना २-३ महिन्यांतून एकदा विडंगाचे (वावडिंग) पाणी द्यावे. गोड पदार्थ विशेषतः बर्फी, साखर, खवा, पेढा, श्रीखंड बासुंदी वारंवार खाणे टाळावे. फळे आणि दूध एकत्र करून खाणे टाळावे.
  • पालेभाज्या स्वच्छ धुवूनच घ्याव्यात.
  • शिळे पदार्थ, थंड लस्सी, दही घालून केलेले पदार्थ टाळावेत.
  • अपचन झाल्यास हलका आहार घ्यावा, लंघन करावे अन्यथा खाल्लेले अन्न नीट न पचून कृमीची वाढ होते.
  • (लेखिका पुणे येथे अायुर्वेद तज्ज्ञ अाहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

    Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

    Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

    Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

    Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

    SCROLL FOR NEXT