importance of egg in diet
importance of egg in diet 
कृषी शिक्षण

आहारातील अंड्याचे महत्त्व..

डॉ. अनिता चपलवार, डॉ. रुपाली पठाडे

मानवी आहारामध्ये हजारो वर्षांपासून अंड्यांचा जास्त प्रमाणात वापर केला जातो. आपल्या शरीरासाठी पोषक असणारी सर्व जीवनसत्त्वे आणि खनिजे अंड्यामध्ये आढळतात. अंड्यातील प्रथिने आणि इतर पोषक घटकांमुळे त्यास विशेष महत्त्व प्राप्त होते. सुदृढ आरोग्यासाठी अंड्याचे नियमित सेवन करणे फायदेशीर आहे. आरोग्यविषयक फायदे ​

  • अंड्यामध्ये उच्च प्रकारचे प्रथिने असतात. ही प्रथिने स्नायूंसह शरीराच्या अंतकांची देखभाल आणि दुरुस्ती करण्यास मदत करतात.  
  • अंड्यातील जीवनसत्त्वे, खनिजे ही मेंदू आणि मज्जासंस्थेला प्रभावीपणे कार्य करण्यासाठी आवश्‍यक असतात.  
  • जीवनसत्त्व ड चा मुख्य स्रोत म्हणून अंडी ओळखली जातात. जीवनसत्त्व ड च्या कमतरतेमुळे हाडे कमकुवत किंवा ठिसूळ होतात.  
  • शरीरात ऊर्जा निर्मितीसाठी आवश्‍यक असणारी सर्व पोषक तत्त्वे अंड्यामध्ये असतात.  
  • रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी अंड्यातील जीवनसत्त्व-अ, जीवनसत्त्व ब-१२ आणि सेलोनियम फायदेशीर आहे.  
  • अंड्यामधील कोलिन हा घटक हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत करते. गर्भवती मातेच्या आहारात कोलिनचे योग्य प्रमाण असले तर नवजात शिशूची स्मरणशक्ती चांगली राहते.  
  • अंड्यातील झान्तोफील, ल्युटीन आणि झान्थिन हे घटक डोळ्यांचे आरोग्य उत्तम ठेवण्यास मदत करतात. डोळ्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी अंड्यांचे सेवन फायदेशीर ठरते.  
  • अंड्यामध्ये असलेली जीवनसत्त्वे आणि खनिजे त्वचेला उत्तेजन देतात.  
  • अंड्यास ओमेगा ३ फॅटी आम्लाचा प्रमुख स्त्रोत म्हणूनही ओळखले जाते. हे आम्ल मेंदूचे कार्य आणि दृष्टी राखण्यास मदत करते. मासे न खाणाऱ्या लोकांसाठी अंडी ओमेगा ३ फॅटी आम्लाचा मुख्य स्रोत आहे.
  • अंड्यातील पोषक घटकांचे प्रमाण

    पोषक घटक प्रमाण
    ऊर्जा ५२ कॅलरी
    प्रथिने ५ ग्रॅम
    एकूण चरबी ४.२ ग्रॅम
    सोडियम १८९ मिलिग्रॅम
    कॅल्शिअम २४.६ मिलिग्रॅम
    लोह ०.८ मिलिग्रॅम
    मॅग्नेशिअम ५.३ मिलिग्रॅम
    फॉस्फरस ८६.७ मिलिग्रॅम
    पोटॅशिअम ६०.३ मिलिग्रॅम
    झिंक ०.६ मिलिग्रॅम
    कोलेस्टेराॅल १६२ मिलिग्रॅम

    संपर्क - डॉ. अनिता चप्पलवार, ९५२०२४०५०९ (पशुजन्यपदार्थ प्रक्रिया तंत्रज्ञान विभाग, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, परभणी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Mahabeej Seed : महाबीजने बियाण्यात साधली विक्रमी वाढ

    Unseasonal Rain : नगरसह नेवासा, पारनेर, शेवगावमध्ये वादळी पाऊस

    Summer Groundnut Sowing : उन्हाळी भुईमुगाची लागवड यंदा कमी प्रमाणात

    Summer Sowing : नांदेड जिल्ह्यात उन्हाळी हंगामात २७ हजार हेक्टरवर पेरणी

    Gharkul Scheme : महिलांच्या सन्मानासाठी घरकुलाचे काम पूर्ण करा

    SCROLL FOR NEXT