रब्बी पिकांची पेरणी
रब्बी पिकांची पेरणी  
कृषी सल्ला

योग्य वेळेत करा रब्बी पिकांची पेरणी

डॉ. आनंद गोरे, डॉ. गणेश गायकवाड

रब्बी पिकांची जिरायती आणि बागायती क्षेत्रात योग्य कालावधीत लागवड करावी. लागवड करताना जल-मृद संधारणाच्या उपाययोजना कराव्यात. शिफारसीत खतमात्रा द्यावी. सुधारित यंत्राने लागवड करावी.

रोपांची प्रतिहेक्‍टरी योग्य संख्या असणे हे जिरायती शेतीत उत्पादनवाढीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. त्यासाठी बियाण्यांचे योग्य प्रमाण व योग्य अंतरावर पेरणी करावी.  पेरणी योग्य खोलीवर आणि पुरेशा ओलाव्यात केल्यास उगवण चांगली होऊन रोपांची संख्या योग्य राहते. याकरिता पिकाप्रमाणे शिफारस करण्यात आलेले बियाण्याचे प्रमाण व रोपांच्या दोन ओळीतील अंतर ठेवण्यात यावे. रासायनिक खतांचा वापर :

  • जिरायती परिस्थिती रासायनिक खतांची उपयोगिता, रासायनिक खते कशा पद्धतीने दिली, यावर अधिक अवलंबून असते. त्यासाठी रासायनिक खते रब्बी हंगामातील पूर्वमशागत झाल्यावर, पेरणीपूर्वी १ किंवा २ दिवस अगोदर सुधारित तिफणीच्या मदतीने १२ ते १५ सेंमी खोलीवर पेरून द्यावी. 
  • रासायनिक खते पुरेशा ओलीत पडून ती पिकाला जास्तीत जास्त प्रमाणात उपलब्ध होतात.
  • बियाण्यांची खोल पेरणी :

  • पावसाचे प्रमाण कमी असल्यास पृष्टभागावरील जमिनीत ओलाव्याचे प्रमाण कमी असते. परंतु जमिनीतील खालच्या थरात पुरेशा प्रमाणात ओलावा असतो. 
  • रब्बी पिकांची पेरणी ८ ते १० सेंमी एवढी खोल करावी. म्हणजे बी चांगल्या ओलीत पडून उगवण चांगली होते. अशा पद्धतीची खोल पेरणी करण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने सुधारित तिफण तयार केली आहे. या तिफणीने बी १० ते १२ सेंमी खोल पेरता येते. तसेच १५ सेंमी खोलीपर्यंत रासायनिक खते पेरून देता येते.
  • सुधारित पीकपद्धती  : रब्बी ज्वारी+करडई 

  • ही आंतरपीक पद्धती ज्या क्षेत्रात रब्बी ज्वारी मोठ्या प्रमाणात घेण्यात येते, अशा क्षेत्रासाठी शिफारस करण्यात आलेली आहे. 
  • वातावरणातील उष्णतामानाच्या तफावतीमुळे ज्वारी अथवा करडई सलग पिकात येणारी घट आंतरपीक पद्धतीत कमी होऊन उत्पादनात स्थिरता येते. 
  • ही आंतरपीक पद्धत ६ः३ या ओळीच्या प्रमाणात शिफारस करण्यात आलेली आहे. इतर शिफारशी ज्वारीच्या सलग पीकपद्धतीसारख्याच आहेत.
  • करडई+हरभरा :

  • मध्यम ते भारी जमिनीसाठी या आंतरपीक पद्धतीची शिफारस करण्यात आलेली आहे. 
  • ४ः२ अथवा ६ः३ ओळीच्या प्रमाणात ही आंतरपीक पद्धती घेतल्यास जास्त फायदा होतो.
  • पिकनिहाय पेरणीची वेळ
    पीक     पेरणीचा योग्य कालावधी
    रब्बी ज्वारी ३० सप्टेंबर ते २० ऑक्‍टोबर
    सूर्यफूल     २० सप्टेंबर ते १० ऑक्‍टोबर
    करडई     ३० सप्टेंबर ते १० ऑक्‍टोबर
    हरभरा     ३० सप्टेंबर ते २० ऑक्‍टोबर
    जवस     २० सप्टेंबर ते १० ऑक्‍टोबर

     संपर्क : डॉ. आनंद गोरे - ९५८८६४८२४२ (अखिल भारतीय समन्वयित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Karnataka Drought farmers : कर्नाटकातील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा; दोन-तीन दिवसांत मिळणार दुष्काळाचे पैसे 

    Monsoon 2024 : सलग अकरा महीने उष्णतेची| तीन नवीन ट्रॅक्टर बाजारात दाखल| राज्यात काय घडलं?

    Jambhul Season : जांभळाचा हंगाम लांबल्याने जांभूळ पिकाला फटका

    Crop Loan : पीक वाटपात विदर्भ आणि मराठवाड्याशी दुजाभाव का?

    Land Survey : कोल्हापुरातील सहा तालुक्यांत जमिनींची ‘ई-मोजणी’ सुरू

    SCROLL FOR NEXT