कृषी सल्ला कोकण विभाग
कृषी सल्ला कोकण विभाग 
कृषी सल्ला

कृषी सल्ला

कृषी विद्या विभाग, दापोली

वाल  फुलोरा अवस्था

  • वाल पिकावरील शेंगा पोखरणारी अळी, घाटे अळीच्या नियंत्रणासाठी पीक फुलोऱ्यात असताना शेतामध्ये पक्षी थांबे उभे करावेत. आवश्यकता भासल्यास क्विनॉलफॉस (२५ टक्के प्रवाही) २ मि. ली. प्रतिलिटर पाणी फवारणी करावी. किंवा निंबोळी अर्क ५ टक्के पीक फुलोऱ्यात असताना किंवा किडींचा प्रादुर्भाव आढळून आल्यावर फवारणी करावी.  
  • वाल पीक फुलोऱ्यात येण्याची व दाणे भरण्याची अवस्था ओलाव्यासाठी अति संवेदनशील असते. सध्या त्यातील महत्त्वाची फुलोरा येण्याची अवस्था असून, पाणी देण्याची व्यवस्था करावी. 
  • आंबा पालवी व बोंगे फुटणे अवस्था 

  • तापमानात वाढ संभवत असल्याने आंबा पिकावर तुडतुडे व फुलकिडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. यासाठी मोहोराचे तुडतुडे व फुलकीड आणि भुरी रोगापासून संरक्षण करण्याकरिता आंबा मोहोर संरक्षण वेळापत्रकानुसार दुसरी फवारणी करावी. 
  • बोंगे फुटताना, कीड व रोगाच्या नियंत्रणासाठी - लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के प्रवाही) ६ मि.ली. अधिक हेक्झाकोनॅझोल (५% प्रवाही) ५ मि.ली. प्रति १० लिटर पाणी.  
  • पालवी अवस्थेत असलेल्या आंबा पिकावर तुडतुड्यांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यापासून संरक्षणासाठी आंबा मोहोर संरक्षण वेळापत्रकानुसार पहिली फवारणी डेल्टामेथ्रीन (२.८% प्रवाही) १ मि.ली. प्रतिलिटर पाणी या प्रमाणे करावी.
  • काजू मोहोर अवस्था हवामान अंदाजानुसार, मोहोर अवस्थेतील काजू पिकावर ढेकण्या व फुलकिडींच्या वाढीसाठी हवामान अनुकूल दिसत आहे. या किडींच्या नियंत्रणासाठी मोहोर फुटण्याच्या वेळी प्रोफेनोफॉस (५० टक्के प्रवाही) १ मि.ली. प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.

    नारळ

  • नारळावर रूगोज स्पायर्लींग व्हाईट फ्लायचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. या माशीच्या प्रादुर्भावामुळे पानावर काळ्या बुरशीची वाढ दिसून येत आहे. यासाठी बागेचे नियमित सर्वेक्षण करावे. नियंत्रणासाठी, फवारणी प्रतिलिटर पाणी इमिडाक्लोप्रिड (१७.८ टक्के प्रवाही) ०.३ मि.ली. 
  • पानावरील काळ्या बुरशीच्या नियंत्रणासाठी, स्टार्च १ ग्रॅम प्रतिलिटर पाणी या द्रावणाची फवारणी करावी. 
  • कलिंगड वाढीची अवस्था

  • कलिंगड पिकास नत्र खताचा दुसरा हप्ता ११ ग्रॅम युरिया प्रती आळे व २० ग्रॅम युरिया प्रती संकरित कलिंगडाच्या आळ्यास लागवडीनंतर एका महिन्यांनी देण्यात यावा. 
  • कलिंगड पिकामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव आढळत असल्यास, नियंत्रणासाठी कार्बेन्डाझीम १ ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम प्रतिलिटर या प्रमाणात द्रावण तयार करावे. बुंध्याजवळ भिजवण करावी.
  • मिरची फुलोरा अवस्था 

  • मिरची पिकास नत्र खताचा दुसरा हप्ता ६५ किलो युरिया प्रती एकरी या प्रमाणात पीक फूल व फलधारण्याचा वेळी द्यावा. 
  • मिरची पिकावर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव होऊ शकतो. प्रादुर्भाव दिसून येताच नियंत्रणासाठी, डायमेथोएट (३०% प्रवाही) १ मि. ली. प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. पिकामध्ये पिवळे चिकट कागदाचे सापळे लावावेत.
  • काकडी  फुलोरा अवस्था  काकडी पिकामध्ये फुले येण्यास सुरुवात झाल्यावर फळमाशीच्या नियंत्रणासाठी क्यु ल्युर ‘रक्षक’ सापळे प्रती हेक्टरी ४ वापरावे. 

    पडवळ  फुलोरा अवस्था 

  • तापमानातील संभाव्य वाढीमध्ये पडवळ पिकावर मावा व तुडतुडे किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. प्रादुर्भाव दिसून आल्यास नियंत्रणासाठी डायमेथोएट (३०% प्रवाही) १ मि. ली. प्रतिलिटर पाणी मिसळून फवारणी करावी. 
  • पिकामध्ये पिवळे चिकट सापळे लावावेत.
  • पडवळ पिकामध्ये फुले येण्यास सुरुवात झाल्यावर फळमाशीच्या नियंत्रणासाठी क्यु ल्युर ‘रक्षक’ सापळे प्रती हेक्टरी ४ वापरावे.
  • कोबी वाढीची अवस्था कोबीवर्गीय पिकामध्ये लागवडीनंतर २० ते २५ दिवसांनी खुरपणी करावी. रोपांना मातीची भर द्यावी.

    वांगी  फळधारणा  वांगी पिकास प्रतिएकरी क्षेत्रास ४३ किलो युरिया खताची तिसरी मात्रा पुनर्लागवडीनंतर दोन महिन्यांनी द्यावी. 

    भुईमूग  वाढीची अवस्था विनाआच्छादानावर लागवड केलेल्या भुईमूग पिकामध्ये पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी गरजेनुसार एक खुरपणी करून नंतर पिकाला स्वस्तिक अवजाराच्या साह्याने मातीची भर द्यावी.   

    चवळी फुलोरा अवस्था चवळी पिकामध्ये मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून येताच नियंत्रणासाठी डायमेथोएट (३० टक्के प्रवाही) १.२ मि. ली. प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.  ः ०२३५८ -२८२३८७ (कृषी विद्या विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Hivre Bajar : हिवरे बाजार मॉडेल नेपाळ राबविणार

    Ethanol Production : केंद्राच्या निर्बंधांमुळे इथेनॉल निर्मितीत घट

    Turmeric Seed : पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांनी थांबवली हळद बियाणे खरेदी

    Agriculture Department : कृषी खात्याला गती देण्यासाठी ‘गेडाम पॅटर्न’

    Mango Market : नागपूर-अमरावतीत स्थानिक आंबा वाणांचे दर दबावात

    SCROLL FOR NEXT