कृषी सल्ला
कृषी सल्ला 
कृषी सल्ला

कृषी सल्ला

कृषी विद्या विभाग, राहुरी

कापूस अवस्था ः फुले उमलणे ते बोंडे धरणे फुलकिडे या रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी फवारणी प्रति लिटर पाणी फिप्रोनील (८० डब्ल्यू. जी.) १.३३ ग्रॅम 

तूर अवस्था ः फुलोऱ्याची अवस्था शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी ५% निंबोळी अर्क किंवा कडूनिंब आधारीत कीटकनाशक (१० हजार पीपीएम) २ ते ३ मि.लि. प्रति लिटर या प्रमाणे फवारणी करावी.

गहू अवस्था ः पेरणीपूर्व तयारी गव्हाची पेरणी १५ ऑकटोबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत करावी.  गव्हाच्या खालीलपैकी एका वाणाची पेरणी करावी.  वेळेवर पेरणीसाठी एन.आय.ए.डब्लू.-३०१ (त्र्यंबक),  एन.आय.ए.डब्लू.-९१७ (तपोवन),  एन.आय.डी.डब्लू.-२९५ (गोदावरी)  बागायती उशिरा पेरणीकरिता, एन.आय.ए.डब्लू.-३४.  रायत पेरणीकरिता एन.आय.डी.डब्लू.-१५ (पंचवटी).  हेक्टरी १०० ते १२५ किलो बियाणे वापरावे.  पेरणीवेळी हेक्टरी ६० किलो नत्र, ३० किलो स्फुरद आणि ४० किलो पालाश द्यावे. पेरणीनंतर ३ आठवड्यांनी खुरपणीनंतर ६० किलो नत्र, ३० किलो स्फुरद द्यावे.

कांदा अवस्था ः वाढ फुलकिडे : बारीक पिले पानातील रस शोषून घेतात, त्यामुळे पाने खरवडल्यासारखी दिसतात.  या किडीच्या नियंत्रणासाठी फवारणी प्रति लिटर पाणी डायमेथोएट (३०टक्के ईसी) १.५ मि.लि. किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के ई.सी.) ०.६ मि.लि. फवारणी करताना चिकट द्रव्याचा वापर जरूर करावा. करपा रोग पानावर पिवळसर भुरकट रंगाचे ठिपके दिसतात.  यांच्या नियंत्रणासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी  मॅन्कोझेब ३ ग्रॅम किंवा टेब्युकोनॅझोल १ ग्रॅम  पुढील फवारणी १० ते १५ दिवसांच्या अंतराने बुरशीनाशक बदलून करावी. 

टोमॅटो अवस्था ः फळे लागणे टोमॅटोवरील रस शोषणाऱ्या किडी (फुलकिडे, पांढरी माशी व मावा) यांच्या नियंत्रणासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी इमिडाक्लोप्रिड (१८. एस.सी.) ०.५ मिली किंवा फिप्रोनील (५ इसी) १.५ मिली. करपा रोगाच्या नियंत्रणासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी कार्बेन्डाझीम १ ग्रॅम. 

सीताफळ पिठ्या ढेकणाचा प्रादुर्भाव दिसून येताच, व्हर्टिसिलियम लेकॅनी ४०० ग्रॅम अधिक १ लिटर दूध प्रति १०० लिटर पाणी या प्रमाणे संध्याकाळी फवारणी करावी.  ः ०२४२६-२४३२३९ (कृषी विद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT