weekly weather by dr ramchandra sabale
weekly weather by dr ramchandra sabale 
कृषी सल्ला

पश्‍चिम महाराष्ट्र, कोकणात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्‍यता

डॉ. रामचंद्र साबळे

महाराष्ट्रावरील हवेचा दाब १००८ हेप्टापास्कल इतका राहणार असून उत्तर भारतात १००४ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब, अरबी समुद्र, हिंदी महासागर व बंगालच्या उपसागरावर कधी १००८ तर कधी १०१० हेप्टापास्कल आहे. यापुढे तो १०१० हेप्टापास्कल इतका राहून वाऱ्याची दिशा दक्षिणेकडून व नैऋत्येकडून निश्‍चित होण्यास थोडा कालावधी लागेल आणि मान्सून वाऱ्यासाठी मार्ग तयार होईल. हे आगामी काळात वेळेवर मान्सून दाखल होण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे. या आठवड्यात कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र व पूर्वविदर्भात पावसाची शक्‍यता राहील. वादळी वाऱ्यासह थोड्या कालावधीत तुरळक ठिकाणी अधिक पाऊस होईल.बंगालच्या उपसागरात दिनांक ७ रोजी चक्रीय वादळाची निर्मिती होईल. हिंदी महासागरामध्येही चक्रीय वादळाची निर्मिती होण्याची शक्यता आहे. कोकण  कोकणात पावसाची शक्‍यता असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात १३ ते २३ मि.मी., रत्नागिरी जिल्ह्यात ७ ते १३ मि.मी., रायगड जिल्ह्यात ५ ते ६ मि.मी., ठाणे जिल्ह्यात ७ मि.मी. या आठवड्यातील काही दिवशी तुरळक ठिकाणी पावसाची शक्‍यता आहे. दक्षिण कोकणात वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून तर उत्तर कोकणात वायव्येकडून राहील. कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २७ ते २८ अंश सेल्सिअस राहील. विशेषतः ठाणे जिल्ह्यात २७ अंश सेल्सिअस तर उर्वरित जिल्ह्यात २८ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८० ते ८८ टक्के राहील. तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ४० ते ४१ टक्के राहील. उत्तर महाराष्ट्र नाशिक व धुळे जिल्ह्यात दिनांक ३ मे रोजी ८ मि.मी. पावसाची तुरळक ठिकाणी शक्‍यता आहे. नंदुरबार व जळगाव जिल्ह्यात पावसाची शक्‍यता कमी आहे. जळगाव जिल्ह्यात कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअस तर उर्वरित नाशिक, धुळे व नंदुरबार जिल्ह्यात ४१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नाशिक जिल्ह्यात २५ अंश सेल्सिअस तर उर्वरित जिल्ह्यात २६ अंश सेल्सिअस राहील. नाशिक जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६४ ते ७० टक्के राहील तर दुपारची २९ टक्के सर्वच जिल्ह्यात राहील. मराठवाडा औरंगाबाद जिल्ह्यात या आठवड्यात काही दिवशी ४ ते १४ मि.मी. तुरळक ठिकाणी पावसाची शक्‍यता आहे. उर्वरित जिल्ह्यात पावसाची शक्‍यता कमी आहे. मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यात किमान तापमान २७ अंश सेल्सिअस राहील. तर उस्मानाबाद, लातूर, बीड व औरंगाबाद जिल्ह्यात किमान तापमान २६ अंश सेल्सिअस राहील. मराठवाड्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५८ ते ६५ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २३ ते ३२ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान उष्ण व कोरडे राहील. पश्‍चिम विदर्भ बुलढाणा जिल्ह्यात कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअस राहील. तर अकोला, वाशिम, अमरावती या जिल्ह्यात ४३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २७ अंश सेल्सिअस सर्वच जिल्ह्यात राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५३ ते ६१ टक्के राहील, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता अमरावती जिल्ह्यात २४ टक्के व उर्वरित जिल्ह्यात ती २४ ते २९ टक्के राहील. एकूणच हवामान उष्ण व कोरडे राहील. पावसाची शक्‍यता कमी आहे. मध्य विदर्भ मध्य विदर्भात हा आठवडा अति उष्ण असेल. सर्वच जिल्ह्यात कमाल तापमान ४३ अंश सेल्सिअस पर्यंत वाढेल. तसेच किमान तापमान यवतमाळ जिल्ह्यात २८ अंश सेल्सिअस तर वर्धा व नागपूर जिल्ह्यात २७ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता वर्धा जिल्ह्यात ५० टक्के, नागपूर जिल्ह्यात ५२ टक्के तर यवतमाळ जिल्ह्यात ५७ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता वर्धा व नागपूर जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता २० ते २३ टक्के व यवतमाळ जिल्ह्यात २७ टक्के राहील. या आठवड्यात हवामान उष्ण व कोरडे राहील. पूर्व विदर्भ पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यात कमाल तापमान ४३ अंश सेल्सिअस राहील. चंद्रपूर जिल्ह्यात किमान तापमान २८ अंश सेल्सिअस राहील. गडचिरोली, भंडारा व गोंदिया या जिल्ह्यात किमान तापमान २७ अंश सेल्सिअस राहील. तर चंद्रपूर जिल्ह्यात ते २८ अंश सेल्सिअस राहील. गडचिरोली जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यात ५४ ते ५९ टक्के राहील. तर दुपारची सापेक्ष आर्द्रता गोंदिया जिल्ह्यात १८ टक्के तर उर्वरीत चंद्रपूर, गडचिरोली व भंडारा जिल्ह्यात ते २२ ते २७ टक्के राहील. त्यामुळे हवामान अतिउष्ण व कोरडे राहील. दक्षिण - ‍पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर जिल्ह्यात काही दिवशी १० ते १२ मि.मी., सांगली जिल्ह्यात ५ ते १० मि.मी., सातारा जिल्ह्यात ७ ते १३ मि.मी., पुणे जिल्ह्यात ७ ते १८ मि.मी. व नगर जिल्ह्यात ७ ते १८ मि.मी. काही दिवस तुरळक ठिकाणी पावसाची शक्‍यता आहे. सोलापूर जिल्ह्यात कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअस राहील. सांगली व पुणे जिल्ह्यात ४१ अंश सेल्सिअस तर कोल्हापूर व सातारा जिल्ह्यात ४० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस तर सातारा व नगर जिल्ह्यात २६ अंश व सोलापूर व पुणे जिल्ह्यात २७ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ६६ ते ७४ टक्के राहील. कृषी सल्ला

  • पूर्व मोसमी पावसानंतर जमिनीची नांगरट करुन पूर्व मशागत करून कुळवाची पाळी द्यावी. धस्कटे वेचून जमीन तयार ठेवावी.
  • उष्णता वाढल्याने ठिबक सिंचन संचाचा कालावधी वाढवावा. पिकांची पाण्याची गरज पूर्ण करावी.
  • गाव शिवार आणि शेतीमध्ये जल-मृदा संधारणाच्या कामांना सुरवात करावी.
  • - (जेष्ठ कृषी हवामान तज्ञ, सदस्य, संशोधन परिषद, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी व सदस्य, प्रवृत्त पर्जन्य कृती दल सुकाणू समिती, महाराष्ट्र राज्य)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Mahabeej Seed : महाबीजने बियाण्यात साधली विक्रमी वाढ

    Unseasonal Rain : नगरसह नेवासा, पारनेर, शेवगावमध्ये वादळी पाऊस

    Summer Groundnut Sowing : उन्हाळी भुईमुगाची लागवड यंदा कमी प्रमाणात

    Summer Sowing : नांदेड जिल्ह्यात उन्हाळी हंगामात २७ हजार हेक्टरवर पेरणी

    Gharkul Scheme : महिलांच्या सन्मानासाठी घरकुलाचे काम पूर्ण करा

    SCROLL FOR NEXT