Symptoms of physical deformity in cauliflower crop
Symptoms of physical deformity in cauliflower crop 
कृषी सल्ला

फ्लाॅवर पिकातील विकृतीची लक्षणे

योगेश भगुरे

भाजीपाला पिके ही अन्य पिकांच्या तुलनेत नाजूक असतात. वातावरणातील बदल, अन्नद्रव्याची कमतरता इ. बाबींमुळे पिके शारीरिक विकृतीला बळी पडतात. वातावरणातील बदल उदा, जास्त तापमान, कमी तापमान, जास्त पाऊस किंवा पावसाचा खंड, अन्नद्रव्यांची कमतरता, जमिनीतील कमी - जास्त ओल इ. कारणांमुळे वनस्पतींमध्ये शारीरिक विकृती निर्माण होतात. काही वेळा रोग - किडींचा प्रादुर्भावाची लक्षणे आणि शारीरिक विकृती यांची लक्षणे अनेक वेळा सारखी दिसतात. हे ओळखण्यात फसगत होऊन वेगळ्याच उपाययोजना केल्या जातात. त्यातून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढतो. समस्येवर नियंत्रणही मिळत नाही. बटनिंग (गड्डा अतिलहान राहणे) नत्राची कमतरता, लागवडीसाठी जास्त वयाची रोपे वापरल्यास, चुकीच्या वाणांची निवड इ. कारणांमुळे ही विकृती दिसून येते. यामध्ये गड्ड्याचा आकार छोटा राहतो. उत्पादनात घट येते. उपाय

  • माती परीक्षणानुसार अन्नद्रव्य व्यवस्थापन करावे.
  • योग्य वयाची रोपे लागवडीसाठी वापरावी.
  • हंगामनिहाय योग्य जातींची निवड करावी.
  • रायसीनेस या विकृतीमध्ये फुलकोबीच्या गड्ड्याचा पृष्ठभाग तांदूळ पसरल्यासारखा खडबडीत किंवा फुलांच्या बारीक कळ्या पसरल्यासारखा दिसतो. फुलकोबीच्या गड्ड्याची प्रत खालावते. विशेषत: फुलकोबीच्या ठरावीक हंगामातील जातींसाठी पोषक तापमानापेक्षा कमी अथवा अधिक तापमान असल्यास ही विकृती दिसून येते. काही जाती तापमानातील बदल सहन करू शकतात, तर काही संवेदनशील जातीत तापमानात थोडासा बदल झाला तर ही विकृती दिसून येते. नत्रयुक्त खतांचा जास्त वापर, जास्त आर्द्रता, गड्डा तयार होण्याच्या काळात जास्त तापमान, गड्ड्यांची काढणी उशिरा इ. कारणामुळे ही विकृती निर्माण होते. काही प्रमाणात हा आनुवंशिक दोष समजला जातो. उपाय

  • प्रतिकारक्षम व हंगामनिहाय योग्य जातींची निवड करावी.
  • माती परीक्षणानुसार योग्य प्रमाणात अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन करावे.
  • योग्य अवस्थेत काढणी केली पाहिजे.
  • ब्लाइंडनेस (वांझ रोप) फुलकोबीच्या रोपाचा शेंडा खुडला गेल्यास अथवा कीड किंवा रोगांच्या प्रादुर्भावामुळे त्याला इजा झाल्यास अशा रोपाला गड्डा धरत नाही. खूप कमी तापमान, धुके इ. कारणामुळेही विकृती दिसून येते. अशा रोपांची पाने रुंद, मोठी, काळपट हिरवी आणि जाडसर राठ असतात. उपाय

  • फुलकोबीच्या लागवडीसाठी निवडक, जोमदार, निरोगी आणि शेंडा असलेली रोपे वापरावी.
  • कीड व रोगांचा वेळीच बंदोबस्त करावा.
  • संपर्क- योगेश भगुरे, ९९२२४१४८७३ (उद्यानविद्या विभाग, के. डी. एस. पी. कृषी महाविद्यालय, नाशिक.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Onion Export Duty : कांदा निर्यात शुल्क गोंधळाने कंटेनर खोळंबले

    Fertilizers Rate : दरवाढीच्या अफवेने खत उद्योग हैराण

    Indian Spices : भारतीय मसाल्यांच्या बदनामीचे षडयंत्र

    Turmeric Processing : विडालय टरमरीक प्रोसेसींग क्‍लस्टरसाठी दहा कोटींची तरतूद

    Weather Update : विदर्भात गारपिटीचा इशारा

    SCROLL FOR NEXT