राज्यात थंडीचे प्रमाण सामान्य राहील
राज्यात थंडीचे प्रमाण सामान्य राहील  
कृषी सल्ला

राज्यात थंडीचे प्रमाण सामान्य राहील

डॉ. रामचंद्र साबळे

सह्याद्री पर्वतरांगांवर हवेचा दाब १०१४ हेप्टापास्कल तर महाराष्ट्राच्या मध्यापासून उत्तर-दक्षिण दिशेने पूर्वेस हवेचा दाब १०१६ हेप्टापास्कल राहील. त्यामुळे आठवड्याच्या सुरुवातीपासूनच महाराष्ट्रातील थंडीचे प्रमाण कमी अधिक राहील. उत्तर महाराष्ट्रातील पूर्व भाग, विदर्भ, मराठवाडा तसेच पश्‍चिम महाराष्ट्राच्या पूर्व भागात थंडीचे प्रमाण अधिक राहील. ७ जानेवारीपासून थंडीचे प्रमाण सामान्य राहील. पुन्हा १० जानेवारीस थंडीत वाढ होईल. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात ७ व ८ जानेवारीस पावसाची शक्‍यता आहे. नाशिक व गोंदिया जिल्ह्यांत पारा १० अंश सेल्सिअसपर्यंत घसरेल. कोकण ठाणे व रायगड जिल्ह्यांत कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस तर रत्नागिरी व ठाणे जिल्ह्यांत ३१ ते ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान ठाणे व रायगड जिल्ह्यांत अनुक्रमे १७ व २० अंश सेल्सिअस राहील. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत २१ अंश सेल्सिअस राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ठाणे व रायगड जिल्ह्यांत ६२ ते ७० टक्के तर रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ८२ ते ८६ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ३८ ते ४५ टक्के राहील. उत्तर महाराष्ट्र नाशिक, धुळे व जळगाव जिल्ह्यांत कमाल तापमान २७ अंश सेल्सिअस तर नंदूरबार जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान १० ते १४ अंश सेल्सिअस राहील. धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ६४ ते ६५ टक्के राहील. जळगाव जिल्ह्यात ५७ टक्के व नाशिक जिल्ह्यात ७५ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ३३ ते ३८ टक्के राहील. मराठवाडा बीड, परभणी, हिंगोली व औरंगाबाद जिल्ह्यांत कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद जिल्ह्यात किमान तापमान १२ अंश सेल्सिअस तर औरंगाबाद जिल्ह्यात १३ अंश सेल्सिअस राहील. नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत १५ अंश सेल्सिअस व लातूर जिल्ह्यात १६ अंश सेल्सिअस राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता उस्मानाबाद, लातूर व नांदेड जिल्ह्यांत ७० ते ७९ टक्के तर हिंगोली जिल्ह्यात ५५ टक्के राहील. पश्‍चिम विदर्भ अकोला जिल्ह्यात कमाल तापमान २५ अंश सेल्सिअस तर बुलडाणा, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत २६ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान वाशीम व अमरावती जिल्ह्यांत १२ अंश सेल्सिअस राहील. अकोला व बुलडाणा जिल्ह्यांत अनुक्रमे १३ व १४ अंश सेल्सिअस राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७५ ते ८२ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ६० ते ६५ टक्के राहील. अकोला जिल्ह्यात पावसाची शक्‍यता आहे. मध्य विदर्भ किमान तापमान वर्धा जिल्ह्यात ११ अंश सेल्सिअस तर यवतमाळ व नागपूर जिल्ह्यांत १२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. यवतमाळ जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ८८ टक्के राहील. पूर्व विदर्भ भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत कमाल तापमान २६ अंश सेल्सिअस तर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत २७ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान १० ते १२ अंश सेल्सिअस राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८० ते ८८ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६५ ते ७५ टक्के राहील. चंद्रपूर, गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांत १ ते २ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्र नगर व सातारा जिल्ह्यांत कमाल तापमान २८ ते २९ अंश सेल्सिअस राहील. कोल्हापूर जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस तर सांगली, सोलापूर व पुणे जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान १४ ते १८ अंश सेल्सिअस राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता कोल्हापूर जिल्ह्यात ८२ टक्के, नगर ६८ टक्के, सांगली, सातारा, कोल्हापूर व पुणे जिल्ह्यांत ७१ ते ७८ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ३८ ते ४२ टक्के राहील. कृषी सल्ला

  • १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या काळात भेंडी, दोडका, गवार, कलिंगड, उन्हाळी भुईमूग, ऊस या पिकांची लागवड करण्यासाठी जमिनीची पूर्व मशागत करावी.  
  • नांगराची पाळी देऊन योग्य प्रमाणात शेणखत घालून कुळवाची पाळी द्यावी. त्यानंतर रानबांधणी करून योग्य वेळेवर लागवड करावी.
  • संपर्कः रामचंद्र साबळे (ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ, सदस्य संशोधन परिषद वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी व सदस्य पर्जन्य कृती दल सुकाणू समिती

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

    Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

    Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

    Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

    Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

    SCROLL FOR NEXT