Sesame crop should be given protected water during growth stage
Sesame crop should be given protected water during growth stage 
कृषी सल्ला

उन्हाळी पिकांसाठी सल्ला

एस. एन. देशमुख

विदर्भासह विविध ठिकाणी उन्हाळी पिकांमध्ये खालील स्थिती आहे. सध्याच्या कोवीड-१९ विषाणूंच्या प्रादुर्भाव व सोशल डिस्टंन्सिंगचा विचार करता मनुष्यबळाची कमतरता तीव्रतेने जाणवत आहे. अशा वेळी कमीत कमी माणसांसह खालील कामांना त्वरीत प्राधान्य देणे गरजेचे आहे. उन्हाळी भात

  • भात पीक निसवल्यानंतर दहा दिवस पाण्याची पातळी १० सेंमी ठेवावी. त्यानंतर हळूहळू पाण्याची पातळी कमी करावी. कापणीपूर्वी दहा दिवस बांधीतील पाणी पूर्णपणे काढून टाकावे. पीक फुलोरा अवस्थेत असताना ताण पडू देऊ नये.
  • सध्या भातावर करपा आणि मानमोडी या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या रोगांची लक्षणे आढळून येताच, प्रती लीटर पाणी कार्बेन्डाझीम (५० टक्के डब्ल्यूपी) १ ग्रॅम किंवा मॅन्कोझेब (७५ टक्के प्रवाही) २ मि.लि. किंवा हेक्साकोनॅझोल (५ टक्के प्रवाही) २ मि.लि. मिसळून फवारणी करावी.
  • भुईमुग

  • सुपर्ण उगवण झाल्यानंतर पीक फुलावर येईपर्यंत पाण्याचा थोडासा ताण द्यावा.
  • साधापणपणे झाडावरील ७५ ते ८० टक्के पाने पिवळी झाल्यानंतर शेंगा पक्व झाल्याचे समजावे. पीक काढणीस तयार असल्याचे समजावे.
  • गोदिंया जिल्ह्यामध्ये भुईमुगावर तांबेरा आणि टिक्का या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या रोगाच्या नियंत्रणासाठी टेब्युकोनॅझोल (२५ टक्के डब्ल्यूजी) १ ते १.५ ग्रॅम प्रती लीटर किंवा ५०० ते ७५० ग्रॅम प्रती हेक्टरी ५०० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • तीळ

  • उन्हाळी तीळ पिकास आवश्यकतेनुसार पेरणीपूर्वी व पेरणीनंतर जमिनीच्या मगदूराप्रमाणे १० ते १५ दिवसांनी ओलीत करावे. ओलीत करताना पाणी साचून राहणार नाही, याची काळजी घ्यावी.
  • पीक परिपक्वतेचा कालावधी पूर्ण होताच कापणी करून पेंढ्या बांधाव्यात. या पेंढ्या तीन ते चार दिवस वाळवल्यानंतर पेंड्या झटकून तीळ वेगळा करावी.
  • संपर्क-. एस. एन. देशमुख, ०७१८२-२८०१८० (कार्यक्रम समन्वयक (प्र.), कृषी विज्ञान केंद्र, हिवरा, पो. रतनारा, ता. जि. गोंदिया.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Agriculture Policy : धोरण विसंगतीने होतेय शेतकऱ्यांची माती

    Sugarcane Industries Problems : साखर उद्योगातील समस्येवर मुख्यमंत्री चर्चा करणार, शिष्टमंडळाला आश्वासन

    Bogus Seed : सीमाभागात बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी तपासणी

    Soil Conservation : ‘भूमी सुपोषण-संरक्षण’चा दीडशे गावांत संकल्प

    Hapus Mango : सिंधुदुर्गातील बापर्डे येथे ६०५ ग्रॅमचा हापूस आंबा

    SCROLL FOR NEXT