weekly weather by dr ramchandra sabale
weekly weather by dr ramchandra sabale 
कृषी सल्ला

उष्ण कोरडे हवामान अन् पावसाची शक्‍यता

डॉ. रामचंद्र साबळे

महाराष्ट्रावरील हवेचा दाब १००८ हेप्टापास्कल इतका राहील. हवेचा दाब उत्तर भारतात १००२ हेप्टापास्कल काश्मीर भागात तर राजस्थान, उत्तर प्रदेश भागावर १००४ हेप्टापास्कल आणि मध्य भारतावर १००६ हेप्टापास्कल राहील. त्यामुळे वारे नैऋत्य, आग्नेय दिशेकडून उत्तर भारताचे दिशेने वाहतील. अशाप्रकारे वाऱ्याच्या दिशेत बदल होऊन मान्सूनसाठी हे वारे अनुकूल ठरतील. मान्सूनचे आगमन वेळेवर होईल. तसेच मान्सून वेगाने उत्तर भारताच्या दिशेने सरकण्याचे संकेत आहेत. या आठवड्यात विदर्भातील अकोला भागात तापमान ४८ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदले जाईल. संपूर्ण विदर्भात तापमान ४५ ते ४६ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. दिवसाचा कालावधी जवळपास १३ तास राहील. त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढेल. दिवसा व रात्री उष्णता जाणवेल. उष्णलहरी व उष्णतेच्या लाटा जाणवतील. महाराष्ट्राच्या दक्षिण कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातील औरंगाबाद व नांदेड तसेच विदर्भातील पश्‍चिम महाराष्ट्रात सोमवार (ता.११) रोजी मेघगर्जनेसह अल्पशा पावसाची शक्‍यता आहे. मात्र महाराष्ट्रातील काही भागात हवामान अल्पकाळ ढगाळ राहील. अतिउष्ण व कोरडे हवामान हे या आठवड्याचे वैशिष्ट्य राहील. काही भागांत वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून तर काही भागात वायव्येकडून राहील. बीड, परभणी व जालना जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग ११ ते १५ किलोमीटर राहील. किमान तापमानातही या आठवड्यात वाढ होईल. कोकणातील रायगड व ठाणे जिल्ह्यांत कमाल तापमान ४५ ते ४६ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. कोकण सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअस तर रायगड व ठाणे जिल्ह्यांत ४५ ते ४६ अंश सेल्सिअस इतके अधिक राहील. सिंधुदुर्ग, रायगड व ठाणे जिल्ह्यांत किमान तापमान २८ अंश सेल्सिअस तर रत्नागिरी जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सिंधुदुर्ग जिल्ह्यात ९० टक्के, रत्नागिरी जिल्ह्यात ७७ टक्के तर रायगड व ठाणे जिल्ह्यांत ६८ ते ६३ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३१ टक्के तर रत्नागिरी, रायगड व ठाणे जिल्ह्यांत २५ ते २७ टक्के राहील. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग ६ किलोमीटर तर रायगड व ठाणे जिल्ह्यांत ३ ते ४ किलोमीटर राहील. दक्षिण कोकणात वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून तर उत्तर कोकणात आग्नेयेकडून राहील. सोमवार ता.(११) रोजी ४ ते १२ मि.मी. पावसाची शक्‍यता राहील. उत्तर महाराष्ट्र  उत्तर महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २७ ते २९ अंश सेल्सिअस राहील. नाशिक, धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत रविवार व सोमवार (ता.१० व ११) रोजी ३ ते ४ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. नाशिक जिल्ह्यात वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून तर उर्वरित जिल्ह्यांत वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ८ किलोमीटर राहील व हवामान ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ४५ ते ५४ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २० ते २२ टक्के राहील. मराठवाडा मराठवाड्यातील नांदेड व औरंगाबाद जिल्ह्यांत सोमवार (ता.११) रोजी पावसाची शक्‍यता असून औरंगाबाद जिल्ह्यात ३० मि.मी. पर्यंत पाऊस पडेल. उस्मानाबाद, लातूर व नांदेड जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून तर उर्वरित जिल्ह्यांत वायव्येकडून राहील. कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस राहील. नांदेड, परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यांत ४५ अंश सेल्सिअस राहील. तसेच उस्मानाबाद, लातूर, बीड या जिल्ह्यांत ते ४४ अंश सेल्सिअस राहील. नांदेड जिल्ह्यात किमान तापमान ३० अंश सेल्सिअस, औरंगाबाद जिल्ह्यात २६ अंश, लातूर जिल्ह्यात २७ अंश, उस्मानाबाद व बीड जिल्ह्यांत २८ अंश तर परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यांत २९ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ४९ ते ६४ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २० ते २५ टक्के राहील. त्यामुळे हवामान उष्ण व कोरडे राहील. पश्‍चिम विदर्भ  अकोला जिल्ह्यात रविवार व सोमवार (ता.१० व ११) रोजी ३ ते ४ मि.मी. तर अमरावती जिल्ह्यात ५ ते ७ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ८ ते ११ किलोमीटर राहील. कमाल तापमान बुलढाणा, अकोला व अमरावती जिल्ह्यांत ४५ अंश सेल्सिअस तर वाशिम जिल्ह्यात ४६ अंश सेल्सिअस राहील. अकोला जिल्ह्यात कमाल तापमान ४८ अंश सेल्सिअस राहील. अमरावती व अकोला जिल्ह्यांत किमान तापमान २८ अंश सेल्सिअस तर बुलढाणा व वाशिम जिल्ह्यांत २९ ते ३० अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ४८ ते ५३ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २२ ते २५ टक्के इतकी कमी राहील. मध्य विदर्भ  मध्य विदर्भातील यवतमाळ, वर्धा व नागपूर जिल्ह्यांत कमाल तापमान ४६ अंश सेल्सिअस राहील. यवतमाळ जिल्ह्यात किमान तापमान ३० अंश सेल्सिअस तर वर्धा व नागपूर जिल्ह्यांत २७ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ४८ ते ४९ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता वर्धा व नागपूर जिल्ह्यांत १७ ते १८ टक्के व यवतमाळ जिल्ह्यांत २२ टक्के राहील. पूर्व विदर्भ  चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत सोमवार (ता.११) रोजी ३ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा चंद्रपूर, भंडारा व गोंदिया जिल्ह्यात नैऋत्येकडून तर गडचिरोली जिल्ह्यात आग्नेयेकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ६ किलोमीटर राहील. गडचिरोली जिल्ह्यात कमाल तापमान ४७ अंश सेल्सिअस, चंद्रपूर जिल्ह्यात ४६ अंश सेल्सिअस तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ४५ अंश सेल्सिअस राहील. चंद्रपूर जिल्ह्यात किमान तापमान २८ अंश सेल्सिअस तर उर्वरित गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत २७ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ४७ ते ५६ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता १४ ते २४ टक्के राहील. दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्र  कोल्हापूर जिल्ह्यात रविवार व सोमवार (ता.१०,११) रोजी ३ ते १३ मि.मी., पुणे जिल्ह्यात ४ ते ७ मि.मी. तर नगर जिल्ह्यात ४ ते ९ मि.मी. पावसाची शक्यता आहे. तसेच सोमवार (ता.११) रोजी सांगली जिल्ह्यात १३ मि.मी. व सातारा जिल्ह्यात ४ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैऋत्य व वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते १० किलोमीटर राहील. कोल्हापूर जिल्ह्यात कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअस, सातारा जिल्ह्यात ४२ अंश सेल्सिअस, सांगली जिल्ह्यात ४३ अंश सेल्सिअस, सोलापूर जिल्ह्यात ४४ अंश सेल्सिअस तर पुणे व नगर जिल्ह्यांत ४५ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस, सोलापूर जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस तर उर्वरित सातारा, पुणे व नगर जिल्ह्यांत २७ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५० ते ८५ टक्के व दुपारची सापेक्ष आर्द्रता २२ ते २४ टक्के राहील. कृषी सल्ला 

  • आंबा पिकाची काढणी करताना देठाजवळ फळे फुगताच व रंग पिवळसर होताच फळे काढणीस सुरवात करावी.
  • हळद, आले लागवड करावी. पावटा लागवड करावी.
  • बागायती कापूस लागवडीचे नियोजन करावे.
  • (ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ, सदस्य, संशोधन परिषद, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी व प्रवृत्त पर्जन्य कृती दल सुकाणू समिती, महाराष्ट्र

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Drip Irrigation : ठिबक सिंचनासाठी ‘जीएसआय’ प्रणालीचा वापर

    Agriculture Success Story : हवामान बदलाला सुसंगत शेती वरकड बंधूंची...

    Rice Research : ‘बी१’ जीवनसत्त्व अधिक असलेला भात विकसित

    Waghad Project : ‘वाघाड’ने घडविला कायापालट

    Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

    SCROLL FOR NEXT