कांदा पिकातील सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर
कांदा पिकातील सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर 
कृषी सल्ला

जाणून घ्या कांदा पिकातील सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर

डॉ. साबळे पी. ए., सुषमा साबळे

माती परीक्षणानंतर जमिनीमध्ये असलेल्या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता लक्षात घेऊन वेळीच त्यांची पूर्तता करावी. कांदा पुनर्लागवडीनंतर पिकात सूक्ष्मअन्नद्रव्यांची कमतरता दिसू शकते. प्रत्येक मुलद्रव्याच्या कमतरतेमुळे पिकावर दिसणाऱ्या लक्षणांची व्यवस्थित नोंद घ्यावी. अनेक वेळा कीड, रोगाचा प्रादुर्भाव आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरता यांच्या लक्षणांमध्ये समानता दिसून येते. या दोन्हीतील भेद लक्षात घ्यावा. आवश्यकता भासल्यास परिसरातील तज्ज्ञांची मदत घ्यावी. जमिनीत सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असल्यास लागवडीनंतर ३० आणि ४५ दिवसांनी सूक्ष्म अन्नद्रव्यांचे मिश्रण (ग्रेड -४) लोह (४ %), जस्त (६ %) ,मँगेनीज (१ %), तांबे (०.५%), बोरॉन (०.५ %) हे २ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे द्यावे. किंवा (ग्रेड -२) जस्त (३ %), लोह (२.५%), मंगल (१ %), तांबे (१ %) आणि बोरॉन (०.५%) हे ५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणीद्वारेही पूर्तता करता येते. बाजारात सूक्ष्म अन्नद्रव्यांची विविध प्रमाणातील मिश्रणे उपलब्ध आहेत. त्यातील घटक जाणून योग्य मात्रेमध्ये फवारणी करावी लागते. आपल्या जमिनीत ज्या अन्नद्रव्याची कमतरता आहे, किंवा पिकामध्ये लक्षणे दिसत आहेत, त्यानुसार योग्य त्या मिश्रणाची निवड करावी. कांदा वाढ आणि फुगवणीसाठी कांदा पुनर्लागवडीनंतर ३० आणि ४५ दिवसांनी १९:१९:१९ हे विद्राव्य खत ५ ग्रॅम प्रति लिटर पाणी आणि ६० ते ७५ दिवसांनी १३:००:४५ किंवा ०:०:५० यापैकी एक विद्राव्य खत ५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. यामुळे कांद्याची फुगवण चांगली होते. उत्पादन वाढीसाठी फायदा होतो. - डॉ. साबळे पी. ए., ८४०८०३५७७२ (सहायक प्राध्यापक, उद्यानविद्या विभाग, के.व्ही.के., सरदार कृषीनगर दांतीवाडा कृषी विद्यापीठ, साबरकांठा, गुजरात.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disaster Relief Fund : रायगडमध्ये आपत्ती बचावासाठी हजार कोटी

Water Issue : शेतीसाठी ‘धनपूर’ धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा

Orchard Planting : एक हजार हेक्टरवर सांगलीत फळबाग लागवड

Onion Market : कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पुन्हा धुळफेक; सरकारने दिलेली ९९,१५० टन निर्यातीला परवानगी जुनीच

Fertilizer Demand : चोपडा तालुक्याला २७ हजार टन खतांची गरज

SCROLL FOR NEXT