जरूर करा पेरणीपूर्व बीजप्रक्रिया
जरूर करा पेरणीपूर्व बीजप्रक्रिया  
कृषी सल्ला

जरूर करा पेरणीपूर्व बीजप्रक्रिया

विवेक सवडे, डॉ. धीरज कदम, रजनीकांत जाधव

बऱ्याच ठिकाणी पेरणीयोग्य पाऊस झाला असून, शेतकरी पेरणीच्या तयारीत आहेत. पेरणीपूर्वी बियाण्यांवर योग्य त्या कीटकनाशक, बुरशीनाशकाची प्रक्रिया केल्यास सुरवातीच्या दिवसामध्ये पिकाचे रोगकिडीपासून संरक्षण होण्यास मदत होते. रासायनिक बीजप्रक्रियेनंतर जिवाणू खतांची प्रक्रिया करावी. यामुळे अन्नद्रव्यांच्या उपलब्धता वाढून पिकांच्या वाढीला फायदा होतो. पिकांमध्ये रोगाची निर्मिती सर्वसाधारणपणे बीजांमार्फत, जमिनीमार्फत व हवेमार्फत होते. यामध्ये वेगवेगळे घटक कार्यान्वित असतात. जमीन व बीजांमार्फत होणाऱ्या रोगप्रसार टाळण्यासाठी बीजप्रक्रिया अत्यंत महत्त्वाची ठरते. सर्वसाधारणतः बियाण्याच्या मार्फत पिकांवर ३ प्रकारे रोग येतात. १) बियाण्याच्या बाह्य पृष्ठभागावरील रोगकारक सूक्ष्मजीव. २) बियाण्यांच्या अंतर्गत भागातील रोगकारक सूक्ष्मजीव. ३) रोगकारक बिया चांगल्या बियांमध्ये अनवधानाने मिसळणे. बीजप्रक्रिया म्हणजे काय? जमिनीतून किंवा बियाण्यांतून पसरणारे विविध रोग व किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी, तसेच बियाण्यांची उगवण क्षमता वाढविण्यासाठी बियाण्यांवर जमिनीत पेरणीपूर्वी रासायनिक व जैविक घटकांची प्रक्रिया करणे होय. फायदे १) जमिनीतून व बियाण्यांद्वारे पसरणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव टाळता येतो. २) बियाण्यांची उगवण क्षमता वाढते. ३) रोपे सतेज व जोमदारपणे वाढतात. ४) उत्पादनात वाढ होते. ५) कमी खर्चात रोग प्रतिबंधात्मक उपाय शक्य. रासायनिक बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया ः १) बुरशीनाशकाच्या द्रावणात बी भिजवणे : प्रथम १०० किलो बियाण्यांमध्ये साधारण १ लिटर पाणी टाकून बियाणे एक मिनिट घोळून ओलसर करावे. नंतर शिफारशीत प्रमाणात बुरशीनाशक टाकून पुन्हा हे बियाणे मिश्रण कोरडे होईपर्यंत ही घोळत राहावे. अधिक प्रमाणात बियाणांवर प्रक्रिया करावयाची असल्याचे पाण्याचे प्रमाण थोडे वाढवावे. प्रक्रिया केलेले बियाणे सावलीत वाळवून पेरणीसाठी वापरावे. २) बियाण्यास बुरशीनाशकाची भुकटी/ पावडर चोळणे ः बियाणे किंचित ओलसर केल्यानंतर शिफारशींनुसार प्रतिकिलो बियाण्यासाठी योग्य प्रमाणात बुरशीनाशक टाकून बियाण्यास चोळावे. प्रक्रिया करताना १. हातामध्ये रबरी किंवा प्लॅस्टिकचे हातमोजे वापरावेत. तोंडावर मास्क लावावा. २. अधिक प्रमाणात बियाण्यांवर प्रक्रिया करावयाची असल्यास त्यासाठी यंत्र उपलब्ध आहेत. त्यात १०० किलो बियाण्यांमध्ये सुमारे १ लिटर पाणी टाकून ते ओलसर बियाणे बीजप्रक्रिया ड्रममध्ये घ्यावेत. त्यात शिफारशीत प्रमाणात बुरशीनाशक मिसळून ३० ते ४० वेळा फिरवावे. बियाणे मिश्रण कोरडे होइपर्यंत ही घोळण्याची प्रक्रिया चालू ठेवावी. प्रक्रिया केलेले बियाणे सावलीत वाळवून पेरणीसाठी वापरावे. ३) बियाणे प्रक्रियेसाठी मातीचे किंवा प्लॅस्टिक भांड्यांच्या वापर करावा. त्याचे तोंड लगेच उघडू नये. ४) बीज प्रक्रियेनंतर शिल्लक राहिलेले बियाणे जनावरांच्या किंवा मनुष्याच्या खाण्यासाठी वापरू नयेत. ५) बीज प्रक्रिया करताना तंबाखू खाणे, पाणी पिणे, सिगारेट ओढणे टाळावे. कीटकनाशकांची प्रक्रिया ः विकत आणलेल्या बियाण्यांवर शक्यतो कंपनीद्वारे प्रक्रिया केलेली असते. त्यासाठी बियाण्यांचे लेबल व्यवस्थित वाचून कोणत्या बीजप्रक्रिया केल्या आहेत, ते जाणून घ्यावे. प्रक्रिया केलेली नसल्यास बीजप्रक्रिया करावी. बुरशीनाशकांची प्रक्रिया झाल्यानंतर कीटकनाशकाची प्रक्रिया वर नमूद केलेल्या पद्धतीने करावी. जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया २५० ग्रॅम जिवाणू संवर्धकाचे पाकीट १० ते १५ किलो बियाण्यास वापरावे. १ लिटर गरम पाण्यात १२५ ग्रॅम गूळ टाकून द्रावण तयार करावे. द्रावण थंड झाल्यावर त्यामध्ये २५० ग्रॅम जिवाणू संवर्धन टाकून बियाण्यास लेप समप्रमाणात बसेल असे हळुवारपणे लावावे. बियाण्यांचा पृष्ठभाग (साल) खराब होणार नाही, याची काळजी घ्यावी. बियाणे ओलसर करून जिवाणू संवर्धके बियाण्यास चोळावीत. नंतर बियाणे सावलीत स्वच्छ कागदावर सुकवावे. बीजप्रक्रिया केलेल्या बियाण्यांची पेरणी ताबडतोब करावी. जिवाणू संवर्धनाची प्रक्रिया करताना...

  • बुरशीनाशके किंवा कीटकनाशकांच्या प्रक्रियेनंतर जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया करावी.
  • जिवाणू संवर्धके लावण्यापूर्वी जर बियाण्यास कीडनाशकांची प्रक्रिया केलेली असल्यास जिवाणू संवर्धकाचे प्रमाण नेहमीपेक्षा दीडपट ठेवावे.
  • रायझोबियम जिवाणू संवर्धके एकदल, द्विदल किंवा नगदी पिके या साठी वेगवेगळी आहेत. आपल्या पिकानुसार योग्य गटाची निवड करावी.
  • ट्रायकोडर्मा या जैविक बुरशिनाशकासोबत रायझोबियम, ॲझोटोबॅक्टर, स्फुरद विरघळणारे जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करता येते.
  • बीजप्रक्रियेचा हा क्रम लक्षात ठेवा १) सर्वप्रथम रासायनिक बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी. २) कीटकनाशकाची प्रक्रिया. ३) त्यानंतर ३ - ४ तासांनी जैविक घटक (रायझोबिअम /अॅझोटोबॅक्टर) बीजप्रक्रिया करावी. ४) सर्वांत शेवटी पी.एस.बी.ची बीजप्रक्रिया करावी. डॉ. धीरज कदम (सहयोगी प्राध्यापक), ९४२१६२१९१० विवेक सवडे (आचार्य पदवी विद्यार्थी), ९६७३११३३८३ (कृषी कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

    APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

    Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

    Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

    Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

    SCROLL FOR NEXT