तुरीवरील मरुका अळीचे नियंत्रण
तुरीवरील मरुका अळीचे नियंत्रण  
कृषी सल्ला

तुरीवरील मरुका अळीचे नियंत्रण

चांगदेव वायळ, डॉ. सात्ताप्पा खरबडे, डॉ. लक्ष्मण माने

पानाफुलांची जाळी करणारी अळी किडीचे सामाईक नाव ः मरुका इंग्रजी नाव ः Spotted pod borer शास्त्रीय नाव ः Maruca Vitrata नुकसानाचे प्रकार ः

  • पीक फुलोऱ्यापासून या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो.
  • कमी कालावधीत येणाऱ्या जाती, जास्त आर्द्रता व मध्यम तापमान असलेल्या भागात किडींचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळून येतो.
  • अळ्या पाने, फूलकळ्या आणि शेंगा एकत्र करून त्यांचा गुच्छ तयार करून त्यात लपून बसतात. त्या पाने, फूलकळ्या आणि शेंगा खातात.
  • किडींची आर्थिक नुकसानकारक पातळी ः 5 अळ्या प्रति 10 झाडे किंवा 5 टक्के शेंगांचे नुकसान. नुकसानाची लक्षणे ः

  • झाडाचे वाढणारे कोवळे शेंडे, पाने, फूलकळ्या व शेंगा एकमेकांना चिकटून मुख्य खोडाची वाढ खुंटते. शेंगांची वाढ होत नाही.
  • प्रादुर्भाव झालेल्या झाडाची पाने, फूलकळ्या, फुले व शेंगा एकमेकाला चिकटलेल्या असतात. तेथील फुले निस्तेज झालेली असतात. त्या ठिकाणी भुसा पडलेला असतो.
  • प्रादुर्भावास अनुकूल, हवामान व परिस्थिती ः

  • सप्टेंबर-ऑक्‍टोबरमधील अनुकूल हवामानात किडीचे पुनरुत्पादन जलद होते.
  • जास्त आर्द्रता असलेल्या ठिकाणी प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतो.
  • उपाययोजना ः (प्रतिलिटर पाणी) पहिली फवारणी ः 1) फूलकळी येताना ः अझाडिरेक्‍टिन 0.03 टक्के (300 पीपीएम) 5 मिलि. दुसरी फवारणी ः पीक 50 टक्के फुलोऱ्यावर असताना ः एच.ए.एन.पी.व्ही. (500 एलई) 1 मिलि. किंवा बॅसीलस थुरिन्जेंसीस 2 ग्रॅम. तिसरी फवारणी ः दुसऱ्या फवारणीनंतर 15 दिवसांनी ः इंडोक्‍झाकार्ब (14.5 टक्के प्रवाही) 0.7 मिलि. किंवा इमामेक्‍टिन बेंझोएट (5 टक्के दाणेदार) 0.4 ग्रॅम किंवा क्‍लोरऍट्रानिलिप्रोल (18.5 एस सी)0.25 मिलि.

    संपर्क ः चांगदेव वायळ, 9975541967 (कडधान्य सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Onion Rate : कांद्याचे बाजार शुल्क घटवले एक रुपयावरून ५० पैशांवर

    Crop Damage : गारपीट, वादळी पाऊस होऊनही पीक नुकसान नसल्याचा अहवाल

    Veterinary : पशुचिकित्सा पुनर्रचनेविरोधात पदविकाधारकांनी थोपटले दंड

    Crop Damage : अवकाळी पावसामुळे एक हजार हेक्टरवर नासधूस

    Onion Market : ‘एनसीसीएफ’द्वारे उद्यापासून सुरू होणार कांदा खरेदी

    SCROLL FOR NEXT