भात पीक सल्ला
भात पीक सल्ला 
कृषी सल्ला

भात पीक सल्ला

डॉ. बी. डी. शिंदे, डॉ. आनंद नरंगलकर

सध्याचे उष्ण व दमट हवामान रोग व किडीस पोषक आहे. सद्यस्थितीचा विचार करता भात पिकावर पिवळा खोडकिडा, सुरळीतील अळी आणि निळे भुंगेरे यांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. पिवळा खोडकिडा (स्किरपोफॅगा इन्सरटयुलस वॉकर) प्रादुर्भावाची लक्षणे ः

  • प्रादुर्भाव पीक वाढीच्या सर्व अवस्थांमध्ये होतो. अळी खोड पोखरून आतील गाभा खाते. परिणाम रोपे मरतात. फुटव्यांच्या अवस्थेत प्रादुर्भावामुळे फुटव्यांचा वाढणारा कोंब (गाभा) सुकून जातो. याला गाभामर म्हणतात.
  • मेलेले फुटवे हाताने सहज उपटून काढता येतात. पीक पोटरीच्या अवस्थेत असताना प्रादुर्भाव झाल्यास लोंब्या पांढरट पडून वाळतात. याला पळींज किंवा पांढरी पिशी म्हणतात. पळींजाचे प्रमाण वाढल्यास उत्पादनात घट येते.
  • एकात्मिक व्यवस्थापन ः

  • प्रकाश सापळा उभारून किडींचे पतंग नष्ट करावेत.
  • किडीचे अंडीपुंज वेळोवेळी गोळा करून नष्ट करावेत.
  • कीडग्रस्त फुटवे आणि पळींज उपटून नष्ट करावेत.
  • नर पतंग आकर्षित करण्यासाठी प्रति हेक्‍टरी २० कामगंध सापळे लावावेत.
  • जैविक नियंत्रण ः

  • लावणीनंतर ३० दिवसांपासून ट्रायकोग्रामा जापोनिकमची हेक्‍टरी ५०,००० अंडी ३ ते ४ वेळा १० दिवसांच्या अंतराने शेतात सोडावीत. मित्र किटकांचे संवर्धन करावे.
  • शेतात पक्षी थांबे उभे करावेत.
  • कीडनाशकांचा वापर : प्रति लिटर पाणी

  • क्विनॉलफॉस (२५ टक्के प्रवाही) २.५ मि.लि. किंवा
  • कारटॅप हायड्रोक्‍लोराईड (५० टक्के) २ ग्रॅम किंवा
  • क्‍लोरपायरीफॉस (२० टक्के प्रवाही) २.५ मि.लि. किंवा
  • फ्ल्युबेंडिअमाईड २० टक्के दाणेदार (डब्लूजी) ०.२५ ग्रॅम
  • सुरळीतील अळी (निंफुला डिपंक्‍टॅलिस) ः प्रादुर्भावाची लक्षणे ः

  • अळी कोवळे पान कापून त्याचे लहान तुकडे करून त्याची सुरळी करून त्यात राहते.
  • रात्रीच्या वेळेस अळी सुरळीतील हिरवा पापुद्रा खाते आणि फक्त बाहेरील पापुद्रा शिल्लक ठेवते.
  • सुरळ्या पानाच्या एका कडेस लटकत किंवा पाण्यावर तरंगत असलेल्या दिसतात.
  • आर्थिक नुकसानीची पातळी ः लागवडीपासून फुटवे येईपर्यंत/ फुटवे येण्याची अवस्था/ लोंबी निसवण्यापासून फुले येण्यापर्यंतची अवस्था : २ नव्यानेच नुकसान झालेली पाने प्रती चुड. एकात्मिक व्यवस्थापन ः शेतात पाणी बांधून ठेवावे. त्यानंतर कीडग्रस्त पिकावरती एक दोर आडवा धरून ओढत न्यावा. त्यामुळे सुरळ्या पाण्यात पडतात. त्यानंतर शेतातील पाणी बाहेर काढत असताना एका बाजूला बांध पाडून त्या ठिकाणी मच्छरदाणीची जाळी लावून सुरळ्या एकत्र करून माराव्यात. कीडनाशकांचा वापर : प्रति लिटर पाणी कारटॅप हायड्रोक्‍लोराईड (५० टक्के) १.२ ग्रॅम निळे भुंगेरे लेप्टीस्पा पिगमिया प्रादुर्भावाची लक्षणे ः

  • प्रौढ भुंगेरे पानाच्या वरच्या पृष्ठभागावरील हरितद्रव्य खातात. आळ्या पान पोखरून आतील हिरवा भाग खातात, त्यामुळे पानावरती समांतर पांढऱ्या रेषा उमटतात. अनेक रेषा एकमेकांत मिसळून त्या ठिकाणी पांढरा चट्टा तयार होतो. कालांतराने असे चट्टे तपकिरी होऊन पाने करपल्यासारखी दिसतात.
  • प्रादुर्भाव पीक फुटव्याच्या अवस्थेत व पसवण्यापूर्वी होतो. पाणथळ जमीन आणि नत्र खताच्या अती वापराने प्रादुर्भाव वाढतो.
  • आर्थिक नुकसान पातळी ः

  • पुनर्लागवडीच्या वेळेस ः १ भुंगेरा किंवा १ प्रादुर्भित पान प्रति चूड.
  • फुटव्यांच्या अवस्थेत ः १ भुंगेरा किंवा १ ते २ प्रादुर्भित पाने प्रति चूड
  • ही कीड भात पिकानंतर बांधावरील गवतावर आणि भाताच्या फुटव्यावर उपजीविका करते, पुढील हंगामात भात पिकास उपद्रव करते, त्यासाठी भात लावणीनंतर बांध स्वच्छ ठेवावेत.
  • शेतीतून पाणी निचरा होईल, याची काळजी घ्यावी.
  • कीटकनाशकांचा वापर ः प्रति लिटर पाणी क्विनॉलफॉस (२५ टक्के प्रवाही) ४ मि.लि. किंवा लॅम्ब्डासायहॅलोथ्रिन (५ टक्के प्रवाही) ०.५ मि.ली. संपर्क ः डॉ. बी. डी. शिंदे - ८००७८२३०६० डॉ. आनंद नरंगलकर - ९४०५३६०५१९ (कृषी कीटकशास्त्र विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Disaster Relief Fund : रायगडमध्ये आपत्ती बचावासाठी हजार कोटी

    Water Issue : शेतीसाठी ‘धनपूर’ धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा

    Orchard Planting : एक हजार हेक्टरवर सांगलीत फळबाग लागवड

    Onion Market : कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पुन्हा धुळफेक; सरकारने दिलेली ९९,१५० टन निर्यातीला परवानगी जुनीच

    Fertilizer Demand : चोपडा तालुक्याला २७ हजार टन खतांची गरज

    SCROLL FOR NEXT