कृषी सल्ला (कोकण विभाग)
कृषी सल्ला (कोकण विभाग) 
कृषी सल्ला

कृषी सल्ला (कोकण विभाग)

कृषी विद्या विभाग, दापोली

भात रोप अवस्था : उन्हाळी भात रोपवाटिकेस नियमित पाणी देण्याची व्यवस्था करावी. वाल फुलोरा व शेंगा अवस्था : पीक फुलोऱ्यात येण्याची व दाणे भरण्याची अवस्था ओलाव्यासाठी अतिसंवेदनशील असते. या काळात वाल पिकास सिंचनाचे नियोजन करावे. भुईमूग वाढीची अवस्था : भुईमूग पिकास पाणी व्यवस्थापन करावे. आंबा मोहोर अवस्था : 

  • आंबा पिकामध्ये मोहोर संरक्षण वेळापत्रकानुसार तिसरी फवारणी मोहोर फुलण्यापूर्वी इमिडाक्लोप्रीड (१७.८ टक्के प्रवाही) ०.३ मि. ली. प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. त्यामुळे तुडतुडे व मिजमाशीचे नियंत्रण होऊ शकेल. पुढे मोहोराच्या अवस्थेत परपरागीकरण करणाऱ्या कीटकावर होणारा परिणाम टाळता येईल.
  • बागेमध्ये भुरीचा प्रादुर्भाव असल्यास वरील फवारणी द्रावणामध्ये हेक्झाकोनॅझोल (५ टक्के) ०.५ मिली. किंवा गंधक ( पाण्यात विरघळणारे ८० टक्के) २ ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणात मिसळून वापरावे.
  • काजू फळधारणा अवस्था : 

  • काजूमध्ये फळधारणेच्यावेळी ढेकण्याचा (टी माॅँस्कीटो बग) आणि फुलकिडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यांच्या नियंत्रणासाठी फवारणी प्रतिलिटर पाणी लॅम्बडा सायहॅलोथ्रीन* (५ टक्के प्रवाही) ०.६ मि. ली.
  • काजूमध्ये रोठा (खोडकिड) या किडीचा प्रादुर्भाव झाडाचे खोड व उघडी मुळे यावर दिसून येतो. हा कीड झाडाची साल पोखरून आतील गाभा खाते. रोठ्याचा प्रादुर्भाव दिसून येताच नियंत्रणासाठी खालील उपाययोजना करावी.
  • १५ एम. एम. पटाशीच्या साह्याने प्रादुर्भाव झालेली साल काढूनन झाडातील रोठ्याला बाहेर काढून मारून टाकावे.
  • क्लोरपायरीफॉस (२० टक्के प्रवाही) ५ मि. ली. प्रति लिटर पाणी या प्रमाणात द्रावण तयार करून प्रादुर्भावित भाग द्रावणाने चांगला भिजवावा. उर्वरित द्रावण झाडाच्या बुंध्यालगत मुळाशी ओतावे.
  • झाडाला कोणत्याही प्रकारे इजा करू नये. कामकाजावेळी इजा झाल्यास बोर्डो पेस्ट लावून जखम झाकावी.
  • भाजीपाला/ फळबाग रोपवाटिका फलधारणा अवस्था :  वांगी पिकावर शेंडा व फळे पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यांच्या नियंत्रणासाठी - फवारणी प्रति लिटर पाणी

  • ॲझाडिरेक्टिन (१ टक्के) २ मि.लि. किंवा इमामेक्टिन बेन्झोएट (५ एसजी) ०.४ ग्रॅम
  • कीडग्रस्त फांद्या व फळे जमा करून नष्ट करावीत.
  • कलिंगड पिकामध्ये फुले येण्यास सुरवात झाल्यावर फळमाशीच्या नियंत्रणासाठी क्यु ल्युर ‘रक्षक’ सापळे प्रती हेक्टरी ४ वापरावेत. वेळोवेळी कीडग्रस्त फळे जाळून नष्ट करावीत.
  • फळबाग रोपवाटिकेस नियमित पाणी देण्याची व्यवस्था करावी.
  • संपर्क ः ०२३५८-२८२३८७ (ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि कृषी विद्या विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली) (* सदर कीटकनाशकास लेबल क्लेम नाही. तथापी ही ॲग्रेस्कोची शिफारस आहे.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Agriculture Policy : धोरण विसंगतीने होतेय शेतकऱ्यांची माती

    Sugarcane Industries Problems : साखर उद्योगातील समस्येवर मुख्यमंत्री चर्चा करणार, शिष्टमंडळाला आश्वासन

    Bogus Seed : सीमाभागात बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी तपासणी

    Soil Conservation : ‘भूमी सुपोषण-संरक्षण’चा दीडशे गावांत संकल्प

    Hapus Mango : सिंधुदुर्गातील बापर्डे येथे ६०५ ग्रॅमचा हापूस आंबा

    SCROLL FOR NEXT