कोकण व मध्य महाराष्ट्रात कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक राहील. या आठवड्यात उष्ण लहरींचा प्रभाव जाणवणार नाही. कमाल व किमान तापमानात होणाऱ्या वाढीमुळे सापेक्ष आर्द्रतेत मोठ्या प्रमाणात घट होईल. त्यामुळे उष्ण व कोरडे हवामान जाणवेल. महाराष्ट्रावरील हवेचे दाब सोमवार आणि मंगळवार (ता. २९, ३०) रोजी १००८ हेप्टापास्कलपर्यंत वाढतील. बुधवार (ता.३१) नंतर त्यात घसरण होऊन ते १००४ हेप्टापास्कल इतके कमी होतील. म्हणजेच कमाल आणि किमान तापमानात वाढ होईल. कोकण व मध्य महाराष्ट्रात कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक राहील. या आठवड्यात उष्ण लहरींचा प्रभाव जाणवणार नाही. कमाल व किमान तापमानात होणाऱ्या वाढीमुळे सापेक्ष आर्द्रतेत मोठ्या प्रमाणात घट होईल. त्यामुळे उष्ण व कोरडे हवामान जाणवेल. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने आग्नेयेकडून राहील. उत्तर महाराष्ट्रात वाऱ्याची दिशा नैॡत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग सामान्यच राहील. कोकण रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस तर ठाणे, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ४२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस तर सिंधुदुर्ग, ठाणे जिल्ह्यांत २५ अंश सेल्सिअस राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत ६५ ते ८० टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ११ ते २१ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ३ ते ७ किमी राहील. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील. हवामान उष्ण व कोरडे राहील. उत्तर महाराष्ट्र नाशिक, धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअस राहील. तर किमान तापमान २३ अंश सेल्सिअसपर्यंत राहील. कमाल व किमान तापमानात बुधवार (ता.३१) नंतर वाढ होईल. सकाळची सापेक्ष आर्द्रता १२ ते १४ टक्के इतकी कमी राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ७ ते ८ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ८ किमी आणि दिशा नैॡत्येकडून राहील. आर्द्रतेत मोठ्या प्रमाणात घट होत असल्याने बाष्पीभवनाचा वेग वाढेल. हवामान उष्ण व कोरडे राहील. मराठवाडा कमाल तापमान उस्मानाबाद, बीड, हिंगोली व जालना जिल्ह्यांत ४१ अंश सेल्सिअसपर्यंत तर लातूर, नांदेड, परभणी, जालना जिल्ह्यांत ४२ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. आकाश निरभ्र राहील. प्रखर सूर्यप्रकाश जाणवेल. औरंगाबाद जिल्ह्यात कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २० अंश सेल्सिअस राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता १३ ते १६ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६ ते ८ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग उस्मानाबाद जिल्ह्यात ताशी १२ किमी राहील. तर उर्वरित सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ७ किमी राहील. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने ईशान्येकडून राहील. वाऱ्याची दिशा जालना जिल्ह्यात आग्नेयेकडून आणि औरंगाबाद जिल्ह्यात नैॡत्येकडून राहील. हवामान अत्यंत उष्ण व कोरडे राहील. पश्चिम विदर्भ अकोला व वाशीम जिल्ह्यांत कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअस तर बुलडाणा, अमरावती जिल्ह्यांत ४१ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ११ ते १७ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ५ ते ९ टक्के इतकी कमी राहील. वाऱ्याचा ताशी वेग बुलडाणा जिल्ह्यात ११ किमी, तर उर्वरित जिल्ह्यांत ३ ते ५ किमी राहील. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील. मध्य विदर्भ कमाल तापमान यवतमाळ जिल्ह्यात ४३ अंश सेल्सिअस तर वर्धा, नागपूर जिल्ह्यांत ४२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता १६ ते १८ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ८ ते ९ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ६ किमी राहील. वाऱ्याची दिशा यवतमाळ जिल्ह्यात आग्नेयेकडून तर वर्धा, नागपूर जिल्ह्यांत ईशान्येकडून राहील. पूर्व विदर्भ चंद्रपूर जिल्ह्यात कमाल तापमान ४३ अंश सेल्सिअस तर गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ४२ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. किमान तापमान चंद्रपूर जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. गडचिरोली जिल्ह्यात ते २३ अंश सेल्सिअस, तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता १६ ते २१ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६ ते ८ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ५ किमी राहील. वाऱ्याची दिशा आग्नेय व ईशान्येकडून राहील. दक्षिण-पश्चिम महाराष्ट्र कमाल तापमान कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत ४० अंश सेल्सिअस राहील. सांगली, सातारा, पुणे व नगर जिल्ह्यांत किमान तापमान २३ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. तर कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यांत ते २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता १६ ते २६ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६ ते ९ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते १२ किमी व दिशा आग्नेयेकडून राहील. कृषी सल्ला
- (ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ व सदस्य, ॲग्रिकल्चर मेटरॉलॉजी फोरम फॉर साउथ आशिया.)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.